कधीच आपल्या आंतरिक सुखाचा गळा दाबू नका....

 

कधीच आपल्या आंतरिक सुखाचा गळा दाबू नका....

कामानिमित्त बाहेर गेले होते,  अचानक माझा जुना मित्र भेटला, त्याची बायको माझ्याच माहेरची आणि ओळखली होती म्हणून मी चौकशी केली. तर कळलं कि त्याने दुसरं लग्न केलंय आणि सीमाने तीन वर्षाआधी आत्महत्या केली.

क्षणभर शब्द हलवले आणि मी गरगरले, माझा विश्वासच बसत नव्हता,

सीमा, आणि आत्महत्या? शक्यच नाहीअसं मी सुहास च्या तोंडावरच बोलले. 

त्याचे डोळे पाणावले होते अलगत रूमाल खिशातून काढूत तो म्हणाला,  "कळलंच नाही ग, मी बिझी असायचो आणि तिच्याकडे कदाचित दुर्लक्ष झालं माझं पण स्वतःला संपवणं हा पर्यय नव्हताच."

अरे पण, काय हे!”

मला काय बोलावं कळलंच नाही. शब्द सुटत नव्हते आणि समोरून माझे सहकारी मित्र मला बोलावत होते. मी मुलीबद्दल चौकशी केली, “अरे मग चिनू?”

तर कळलं कि ती सीमाच्या माहेरी असते. एवढा चांगला नवरा आणि सगळंच चांगलं असतांना तिने स्वतःला का संपवलं. तिच्या मृत्यूच्या बातमीने मला विचार करायला भाग पाडलं. सीमा खुप चंचल होती. तिला आयुष्यात खुप काही करायच होतं. तिला प्रत्येक गोष्टीच आवड होती. सुहास सोबत अमेरिकेत राहायला जातांना ती खुपच आनंदी होती. मग असं काय घडलं कि तिने आत्महत्या केली, मुलींचाही विचार केला नाही.

काळजी घे असं हलकंस म्हणत मी माझ्या कामासाठी निघून गेलं. काय बोलणार होते. मित्र माझाच होता, ओळखून मी त्यालाही होते.

मी त्याच विचारात होते तर माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा फोन आला, आम्ही लग्नाआधी सोबत काम करायचो. जॉब करतांना एकाच रूम वर राहायचो. म्हणून घट्ट मैत्री होती आमच्यात, पण लग्नानंतर मी नवऱ्याच्या मागे फिरत जॉब बदलला आणि नंतर फारसं बोलणं होत नव्हतंच.

रेणूचा वाढदिवस होता आणि ती मला बोलवत होती. आणि बोलणं असं कि हातातलं काम सोडून ये. मी जोपर्यंत हो म्हटलं नाही तिने फोनच ठेवला नाही. मीही आश्चर्यात होते कि मला ही असं का बोलते म्हणून, पण जीव्ष्ट मैत्रीण होती नकळत होकार पडला माझा.

मी हयांना फोन करून मुलीला पाळणाघरातून पिक उप करायला सांगितलं आणि यायला उशीर होईल असं म्हणून तिच्याकडे निघाले. वाटलं, एवढ्या मोठ्या माणसाची बायको आहे, पार्टी मोठीच असणार म्हणून मोठा बुके आणि तिच्या मुलांसाठीही गिफ्ट घेतलं आणि गाडी वळवली तिच्या घराकडे.

घरी गेली तर विचार केला तस काहीच नव्हतं. मी दारावरची बेल वाजवली, तिच्या मुलाने दार उघडलं अँटी बसा तुम्ही आई तयार होत आहे असं बोलून लगेच पळून गेला.

स्वतःच्या इवल्या इवल्या हाताने फुगे फुगवत होता, मीही मदतीला लागले. तेवढ्यात रेणू छान तयार होऊन आली. मी म्हटलं "अग अजून कुणी आलं नाहीका?"

ती हसली आणि म्हणाली "कुणी कशाला हवंय, तू आलीस ना, मला पक्क माहित होत तू येणारच म्हणून."

मी स्मित हसतच म्हटलं "तुझे ते, कुठे आहेत?"

ती म्हणाली "त्याना तर माहीतही नाही माझाहि वाढदिवस असतो. बिसिनेस टूर वर आहेत. आज एवढ्या वर्षानंतर माझ्या मुलाने मला सकाळी वाढदिवसच्या शुभेच्छा दिल्या. मला जाणीव करून दिली कि मी तो साजरा करायला पाहिजे, नाहीतर जो आपल्या रूमवर माझा वाढदिवस आपण साजरा केला होता तोच शेवटचा आठवते मला. माझ्या मुलाचा उत्साह एवढा होता कि माझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करण्याचं ठरवलं. आजपर्यत माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी करेल ह्याच अपेक्षेत दिवस काढले. सात वर्ष झालीत ग लग्नाला स्वतःसाठी जगणंच विसरले होते मी. लग्न झालं तेव्हा सासूला माझं जॉब करणं पसंद नव्हतं, मलाही फारस वाईट वाटलं नाही कारण नौकरी व्यतिरिक्त मी खुप काही करेन हा विश्वास होता. 

पण संसारात एवढी गुरफटली कि स्वतःच ठरवलेलं काहीच करता आलं नाही. स्वतःच्या इच्छा मारायच्या आणि घरच्यांचं करायचं. दोन वर्षा आधी सासू आणि आई दोघीही वारल्या. सासू त्याग हाच स्त्रीच सर्वात मोठा गुण आहे असंच सांगायची आणि आई त्याला दुजोरा दयायची. मग माझी होणारी घुटमळ सांगणार कुणाला? आज माझा नवीन जन्म झालाय आणि तो तुझ्याशिवाय कसा साजरा होणार म्हणून तुलाच बोलवलं. माझ्या मनातल्या गोष्टी मलाच पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधावा लागेल ना."

ती बोलत होती आणि गुमान बघत, तेवढ्यात दारावर परत बेल वाजली, तिचा मुलगा ओरडला, “आई केक आलाय.” केक त्यानेच सजवला मीही मदत केलीच, आम्ही तिघानीही वाढदिवस साजरा केला.

केक खातांना अनेक प्रश्न गोंधळ घालत होते, सिमा वारंवार आठवत होती. एकीचा मृत्यू आणि एकीचा नवीन जन्म ह्या विचाराने गोंधळून गेले होते. सीमाच्या मृत्यूचं रहस्य मला गवसलं होतं. ति रोज मरत होती स्वतःच्या इच्छा गिळून आणि एक दिवस मृत्यूनेच तिला गिळलं. तिने रेनुसारखा विचार का केला नाही हा प्रश निरूत्तर होताच...

लग्न म्हजे स्वतःच्या इच्छा मारणं असतं का? कि मी ठरवलेलं का हो नाही ह्याचाच विचार करून घुसमटत राहणं असतं. मान्य आहे लग्नानंतर बरंच बदलतो आपण, जवाबदाऱ्याही आणि अपेक्षाही खूप असतात,  पण आपण स्वतःही आपलीच जवबादारी असतोच ना. वर वरच सुख सुखावत नाही त्यासाठी आंतरिक सुखाचा शोध घायवाच लागतो. मैत्रिणींनो, कधीच आपल्या आंतरिक सुखाचा गळा दाबू नका....

माझा मुद्दा जर पटला असेल तर तुमच्या भावना व्यक्त नक्की करा

धन्यवाद!!

 उर्मिला देवेन


माझ्या नवीन कथा तुम्ही माझ्या पेजेलाही वाचू शकता ...https://www.facebook.com/manatlyatalyat 


जोडीदार तू माझा कथेचा पुढचा भाग, नक्की बघा मनाला जोडीदार नसल्यानातर काय होत ते सांगून हळवा नक्की करेल.



Post a Comment

0 Comments