नको करूस रे शिरजोरी...

 


नको करूस रे शिरजोरी...

सुरज काय झालं, थांब रे जरा, आलेच मी.”

“काय हे संध्या, तुला कळत नाही का? आज अवार्ड फंकशन आहे ना!”

“हो हो, आलेच रे.”

“माझा आधी नेकटाय बांध ग, आणि नवीन पिन्स आणायला सांगितल्या होत्या ना तुला, ह्या काय जुन्याच ठेवल्या तू इथे.”

संध्या धावतच स्वयंपाक खोलीतून दुधाचा ग्लास घेवून आली, “काय रे थांब कि जरा, आधी दूध घे.”

सुरजने दूध घेतलं आणि सध्याच्या आग्रहाने त्याने ते एका दमात प्यायल, आज त्याला बेस्ट पर्फोर्मंस अवार्ड मिळणार होता आणि सोबत कंपनीत मेनेजमेंट म्हणून पदही. जाम खुश होता. स्वतःच्या कष्टावर खूप मान होता त्याला. आणि व्हावा पण का नाही, शून्यातून विश्व निर्माण केलं होतं त्याने.

सध्या नेकटाय बांधत होती, तर सुरज म्हणाला, “अरे, मला एकट्याला हा सन्मान मिळतोय. मेहनत, मेहनत किती केली मी. रात्र रात्र काम केलं तेव्हा कुठे आज हे सांर माझ्या वाट्याला आलं.”

तो बोलत होता आणि संध्या मनात हसत होती, हसतच तिने गळ्याला गांठ जोरात बांधली, तोच सुरज ओरडला, “संध्या, जपून... तू आता डायरेक्टरच्या गळ्याला नेकटाय बांधत आहेस.”

तिने अजून गांठ घट्ट केली आणि म्हणाली, “नको दाखवू तू शिरजोरी....मला तरी”  

तिने गांठ हलकी केली आणि हसली, सुरजने तिला रागवलही पण तिने लक्ष दिलं नाही. ती तिचं काम करत राहिली.

नंतर सुरज तिच्या जवळ आला आणि अलगत बिलगला, “संध्या आज छांन तयार होवून ये ऑफिसच्या जवळच्या हॉटेलमध्ये, संध्याकाळी. नक्की ये तुझ्या नवऱ्याच कौतुक बघायला.”

हो नक्कीच, म्हणत तिने त्याला ऑफिस साठी निरोप दिला. तो निघाला आणि ती परत त्यांच्या खोलीत शिरली, सुरज त्याचा पेनड्राईव विसरला होता, बघताच तिने तो घेतला आणि गेटकडे धावली, सुरज गाडी घेवून निघणार होताच तर ती समोर उभी झाली, तिच्या पाय लचकला, सुरज गाडीतून बाहेर आला, “काय ग तुला कळत नाही का, काय झालं आता?”

“अरे हा पेनड्राईव विसरला होता तू.”

सुरज, जरा शांत झाला, “अरे किती महत्वाचा data आहे ह्यात.” त्याने तो घेतला. सध्याच्या पायात दुखत होतं तेही त्याने दुर्लक्ष केलं. ती बोलणार होती पण तो निघून गेला. येवढ मोठं यश... तिच्यामुळे नव्हताच का?

जरा विचार करून सोडून दिला. नंतर मुलाला आणि मुलीला शाळेत सोडलं. घरात मग्न झाली. संध्याकाळी काय घालयचं म्हणून तयारी करत राहिली. सुरज साठी खूप खुश होती पण.... त्याला मिळालेलं यश हे फक्त त्याचं नव्हतं हे तिला सांगायचं होतं आणि मुलांनाही कळावं म्हणजे पुढची पिढी तसा विचार करेल हे तिच्या मनात होतं. असो, सुरजला बोलूच आणि वदवून घेवू ह्या विचारात तिने त्या विचाराला अर्ध विराम दिला.

इकडे सुरज ऑफिस मध्ये आल्या आल्या त्याच्यावर शुभेच्छा मिळायला लागल्या होत्या. दिवसभर तो एका गुर्मीत होता. मी केलंय, माझी मेहनत... दुपारी मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये आला, जवळच बायकांचा घोळका होता, कानावर शब्द पडले, “अग सुरज साहेबांचा सत्कार आहे आज.”

“हो ना, मेहनत ग त्यांची, खूप हुशार आहेत, मी काम केलंय त्यांच्यासोबत.”

“अग पण इतकं, बायको काय आहे कि नाही त्यांना. मला तर ते नेहमी ऑफिस मधेच दिसायचे.”

“अग आहे ना, मोठ्या माणसाची मुलगी होती म्हणे ती, पण लग्न ह्याच्याशी केलं मग काय चढली ह्यांना जिद्द... आज टक्कर देतात म्हणे सासऱ्यांना...”

“अग बाई, पण बायकोने साथ दिली म्हणून आज इथेवर आले.”

“हो ग, पण लोकांना बायकोच काहीच दिसत नाही, म्हणता स्वतःची मेहनत आहे म्हणून... मी बघितलंय गर्व गुर्मी दिसते त्यांच्यात”

“असो, त्यांची बायको आणि ते, आपल्याला काय, ज्याने मेहनत केली त्याला नक्कीच फळ मिळत असतं हे मी मानते.”

बायका बोलून निघून गेल्या पण सुरजला आता सध्याच्या सकाळच्या बोलण्याचा अर्थ कळाला होता, मनात म्हणाला, “कसा विसरलो, मी कसा तुझ्या समोर शिरजोरी दाखवू शकतो....मी तर उभाच तुझ्यामुळे आहे. तुझ्या विश्वासावर खरा उतरावा म्हणून इथवर आलो आणि तुलाच विसरलो.”

दुपारची सुट्टी टाकली, घरी निघाला, वाटेत दागिन्यांच दुकान होतं, त्याला आठवलं, संध्याने सुरजला कोर्सेस करता यावे म्हणून तिच्या आईने दिलेल्या पाटल्या मोडल्या होत्या, त्याने गाडी पार्क केली, नवीन डिझाईनचे कडे घेतले, मनात म्हणाला, “संध्या, आपण कधीच घेवू शकत होता, बोलली ही नाहीस.”

समोर गजरावला उभा होता, कधी नव्हे त्याने गजरा घेतला. मुलांच्या शाळेतून आज मुलानांनी घेतलं. घरी आला, संध्या साडीला प्रेस करत होती. मुलांनी घरात शिरताच कार्यक्रमाला जाण्यासाठी गोंधळ सुरु केला. दोघेही त्यांच्या खोलीत तयारीला लागले. संध्याला आश्चर्य वाटलं.पण तिला काही बोलू न देताच सुरजने तिच्या निवडलेल्या साडीवर कडे ठेवले, “हुम्म डायरेक्टरची बायको आहेस.”

“असं! माझ्यासमोर.... निमित्य मी होते कदाचित, बाबा....”

“बाबा डायरेक्टर होते तुझे... होणा?”

आणि ती परत हसली, जवळ आली त्याचा नेकटाय पकडत ती परत म्हणाली, “नको दाखवू तू मला शिरजोरी...”

“येवढ मोठं यश मेहनत लागली राणीसरकार...”

“मी कुठे नाही म्हणते.”

बोलतांना विषय संध्याला ओढायचा नव्हता. पण सुरजला सारं काही तिने बोलावं असं वाटत होतं. पण तसं झालं नाही... संध्याने अलगत विषय बदलला तिला सार काही बोलून त्याच्या आनंदाला कमी करायचं नव्हतं... शेवटी तिनेही सांर त्याच्यासाठी केला होतं. तयार झाली, मुलांना तयार केलं. सुरज मात्र तिला चिडवण्यासाठी सतत बोलत राहिला, साडी नीट कर ग, हा दागिना घाल तो घाल, पर्स ही घे ती घे, सारखं पाडून आणि रुबबाबी बोलणं सुरु होतं. एका क्षणाला तर संध्या फुगली होती पण....आवरून ती त्याच्या सोबत निघाली.

हॉल पोहचताच त्याने तिच्या नकळत तिचा हात हातात घेतला. समारंभ सुरु झाला, सुरज स्टेजवर होता, त्याला डायरेक्टर म्हणून जाहीर करण्यात आलं, आणि मग त्याच्या हातात माईक आला, आधी त्याने संध्याला बोलावलं, संध्या बावरली, कळालच नाही तिला, मुलांनी आईला पाठवलं. ती स्टेजवर येताच परत सुरजने तिचा हात हातात घेतला, म्हणाला,

“माझ्या यशाच श्रेय माझ्या आईबाबांना आहे. माझ्या सोबत असणार्‍या माझ्या प्रत्येक सहकार्याला आहे. माझे मित्र मैत्रिणी सर्वाना विसरून चालणार नाहीच, माझ्याशी निगडीत असणार्‍या प्रत्येकाला, वाईट गोड प्रत्येक अनुभवातल्या व्यक्तींना माझ्या आजच्या यशाच श्रेय आहेच पण ह्या यशात तेवढीच भागीदार माझी बायको आहे.  मी तर आज कॅम्प्नीत डायरेक्टरच्या पदावर पोहचलो पण हिच्या मुळे आयुष्याला दिशा मिळाली. माझी आणि माझ्या घराची डायरेक्टर तर ही आहे.”

म्हणत त्याने सन्मान पत्र तिच्या हातात ठेवलं, “संध्या तुझ्या समोर शिरजोरी करावी असं धाडस मी केलं, क्षमा कर. तुझ्या शिवाय हे शक्यच नव्हतं. हा येवढा मोठा यशाचा डोंगर मी चढलो कारण तू होतीस हे मी कधीच विसरता कामा नये.

तुझ्या समोर जराही शिरजोरी केली ना कि हमखास ह्या गुलामाचा नेकटाय पकडून तसचं म्हण जसं सकाळी बोललीस... निदान मला माझ्या कार्याचा अभिमान चढणार नाही.”

संध्या हळूच म्हणाली, “काहीही काय रे... “

“काहीही नाही, तू बोलली नाहीस पण तेच कर तू नेहमी, आता ह्या क्षणाला जरी तसं केलंस ना तरी मी लगेच जमिनीवर येईल,”

“हुम्म घरी ते, इथे नको.”

“असं ! मग घरी तर आज ह्या गुलामावर अत्याचार होणार तर...”

“सुरज... लोकं बघत आहेत.”

दोघही बोलत होते आणि, अख्खा हॉल उभा झाला होता, टाळ्यांच्या गळगळाटात सर्व कसं संध्यामय झालं होतं. सुरजला कळून चुकलं होतं कि संध्या समोर तरी शिरजोरी नकोच. तिनेच त्याची होणारी संध्या उजेडात आणली होती.

मग, तुम्हीही करत असाल अशी शिरजोरी तुमच्या जोडीदारासोबत तर समजून घ्या... तुम्ही आज जे आहात त्यात तुमच्या जोडीदाराचीही तेवढीच मेहनत आहे. यशाचा मनाचा तुरा तुमच्या जोडीदारसाठीही  तेवढाच असतो, कारण त्या नात्यात शिरजोरी कधीच नको... बघा पटलं तर...

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

©उर्मिला देवेन

धन्यवाद!

माझ्या कथा आता मनातल्या तळ्यात tele group वरही प्रकाशित होतील, कृपया नवीन कथा आणि बरच काही वाचण्यासाठी आणि कथेचे थेट अपडेट मिळवण्यासाठी telegroup ला ह्या लिंकनेjoin करा.

-> tele group लिंक- https://t.me/manatalyatalyat



माधुचद्राची रात्रचा पुढचा भाग प्रकाशित झाला आहे नक्की बघा.






Post a Comment

0 Comments