जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १३

 


भाग उशिरा प्रकाशित करण्यासाठी क्षमा असावी...  आधीचे सर्व भाग वेबसाईटवर उपलब्ध आहे नक्की वाचा... जोडीदार ... संपूर्ण भाग इथे वाचा

आता पुढे....

सानू आणि सुमंत शिकागोला पहाटे पोहचले. तिकडे भारी थंडी होती, सानुला तशीही सवय नाही. गेल्यागेल्या तिला हूडहुडी भरली, सुमंत तिला बघून मिश्कील हसत होता, तिने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला, तोच त्याने बॅगमधून आधी तिचा कोट काढून दिला, त्याची नजर मासाहेबांवर पडली त्याने त्यांनाहि गरम कोट काढून दिला. स्वतः च जॅकेट मिजासात घातलं, एक डोळा सानुला मारला,

थंडी भारी बुवा इकडे, मज्जा माझी....

सानूने परत तिचा तो थंडीने हूडहूडनारा कटाक्ष त्याच्यावर टाकला. त्याने डोळे मिचकावले आणि सामान पटापट ट्रोलीवर ठेवलं. त्याचा मोबाईल सुरु केला. तोच वाजला, समोरून त्याची बहिण बोलत होती. सारेच विमानतळावर आले होते, सुमंत आणि सानुच्या स्वागताला. मासाहेब पुटपुटल्या,

“हुम्म्म, येणारच ना भावाला मस्का चढवायचा असेल, काय करून ठेवलं असेल त्या महाराणीने कुणास ठावूक....”

सानू थंडीत कुडकुडत म्हणाली, “मासाहेब आपण काही बोललात का?”

“नाही ग, आलेत सर्व, घे ओळख करून... चला राणीसाहेब घ्या आपली एंट्री नात्यांमध्ये आणि शिकागोतही.”

सुमंतला मात्र मासाहेबांच बोलणं कळालं होतं, तो जवळच होत्या त्यांच्या. त्याने मासाहेबांच्या खंद्यावर हात ठेवला, नजरेने आश्वस्त केलं. नंतर हलकीशी मान हलवत त्याने विषय थांबवला. त्यालाही घरचे सर्व माहित होते पण सानवीने त्या सर्वाना तिच्या नजरेने ओळखावं हेच त्याला पाहिजे होतं.

सुमंत सानुच्या जवळ आला,

“सानू तू ना आवरून घे, इथे सारा लाजमा असणारं, हवं तर तुझा तो टॉप क्लास मेकअप कर, नवीन कोरा ड्रेस बदल.”

“सुमंत,पण इथे, का? घरी जावूया ना, मला थंडी लागत आहे.”

“अग बसं येवढ ऐक माझं, मीही बदलतोय....”

सुमंतच्या शब्दांना मासाहेबांनी दुजोरा दिला आणि सानू स्वतःला आवरायला वाशरूम मध्ये गेली. त्याच्या बोलण्यातलं सुटलेलं सांर काही नकळत तिच्या लक्षात आलं होतं. त्या दिवशी तिची झालेली ऑनलाईन भेट तिला आठवली आणि मग स्वतःला टॉप क्लास तयार केलं तिने. सर्व आवरून त्यावर मखमली जॅकेट घातलं. बाहेर आली. सुमंत तिला बघूनच म्हणाला,

“बसं आता आज मि काही ऑफिसच काम करणार नाही.... काम, काम आणि बसं काम असणार् आज.”

“म्हणजे तू आजपण ऑफिस सुरु करून काम करणार होतास कि काय?”

“हो, पण आज सुट्टीवरच काम करेन...”

सानुने बारीक नजर करून त्याला बघितलं, तोच मासाहेबानी आवाज दिला, “आटोपलं ना ग, व्हा, मस्त दिसतेस. आहे हा सूनबाई, तोड आहे...

“म्हणजे हो मासाहेब...”

“चला सुनबाई, सर्व कळेल आपल्याला... राणे पॅलेस आपल्याच एंट्रीची वाट बघत आहे....”

समोर आलेच, तर सुमंतकडचे सर्व गेटवर हजर होते. चक्क बेंड लावला होता त्यांनी. राणे कुटुंब शिकागोतलं नावाजलेलं कुटुंब होतं. दरारा होता सुमंतच्या कंपनीचा. बेंडवाले अमेरिकन होते. दुरूनच सुमंतच्या बहिणीची मुलगी जसिका ओरडली,

“मामा केम मॉम....”

आणि बेंड जोरात वाजायला लागला तसं तसं सानूच हृदय धडधडायला लागलं, तिने सुमंतचा हात पकडला, त्यानेही तो आणखीन घट्ट केला. दोघेही पुढे आले. आता मात्र जसिका तिच्या मम्माच्या कानात म्हणाली,

“मॉम जस्ट awesome, लुक अट हर, शी इज नोट व्हीलेज टाइप.... शी इज जस्ट लाइक अस, बेटर देन अस मॉम...”   

सारंगी स्वतःला बघत सानुकडे बघत राहिली, आणि सानू आणि सुमंत जवळ आले सुद्धा. सानू स्मित हसली आणि तिचं ते मधुर हसणं बघून सारंगीचा नवरा स्टेवीन अगदीच पुढे आला,

“वेलकम, सानवी टाई...”

त्याच्या त्या “टाई” शब्दाने सानुने आलेलं हसू आतमध्ये कोंबलं, आणि तिने शेकहेंड घेतला.

आणि मग अलगत सुमंतला मिठी मारत स्टेवीन म्हणाला,

“व्हॉट अ चॉइस शुमंत... लकी...”

लहान भावांच्या मुलांनी सुमंतला आणि सानुला मिठी मारली, तशी प्रज्ञा आरती घेवून पुढे आली, सानुने सुमंतकडे बघितलं, सुमंत तिला कानात म्हणाला,

“राणीसरकार घ्या करवून, घरी कुणाला वेळ नसणार... आणि रात्री पार्टी आहे.”

सानू तरीही आवक होवून बघत होती आणि प्रज्ञाने तिला अक्षद लावली,

म्हणाली, “स्वागत आहे आपलं, मी प्रज्ञा, तुमची लहान जावू बाई पण, आधीपासून आहे इकडे, तसं माझं माहेर इथेच आहे. पण मुळचे आम्ही नागपूरचे.”

सानू स्मित हसली, आणि तिने अलगत प्रज्ञाला न स्पर्शता मिठी मारली.

तिला असं बघून सुशीलचा लहान मुलगा लगेच बोलला,

“काकी तुला तर हेही येतं, हुम्म्म मी शिकवणार होतो तुला हे...”

सानू अलगत खाली बसली,

“हुम्म्म, मग रे आता तू काय शिकवणार... पण मला तर खूप शिकायचं आहे तुझ्याकडून...”

“काकी बघ ना तुला मेकअपपण मस्त येतो, तू इंग्लिशपण बोलतेस, तू ना मॉडेल दिसतेस... मग काय शिकवू मी....”

“हुम्म्म, आपण घरी गेलो कि यादी करूया मग तू मला शिकवणी दे... आय विल बी हॅपी टु बी युअर स्टुडंट... ओके सर...”

सुमित गद्कन हसला, त्याने इशाऱ्याने काकाला खाली बसायला सांगितलं, त्याच्या कानात म्हणाला,

“काका, मस्त आयटम आहे तुझा, मला पसंत आहे. मी आजपासून तुझ्या खोलीत...”

त्याला असं बघून त्याचा मोठां भाऊ शशांकहि म्हणाला,

“मी टु, काकी इज सो नाईस...”

जसिकालाहि राहवलं नाही, तीने पुढे येवून सानूला मिठी दिली,

“काकी वेलकम... मैत्री करशील माझ्याशी...?”

“शुअर डीअर...”

बच्चे पार्टीला सानू खूप आवडली होती. मासाहेबांनी सर्वांना म्हटल,

“निघायचं का, सानवी थकलीपण आहे... तिला इथली थंडी नवीन आहे. उगाच सर्दी झाली तर... बाकी आपण घरी बोलूया...”

सारेच आपल्या आपल्या गाड्यांमध्ये बसले, मुलांनी सानूसोबत बसण्याचा आग्रह धरला होता. आणि सारेच सानूसोबत गाडीत बसले. जसिकाला सानू का कुणास ठावूक खूप भावली होती, तिला मम्माने सांगितलेली एकही गोष्ट आता पटत नव्हती. सानूच बोलणं, तिचं हसणं सांर काही कसं तिच्यात ओढ निर्माण करत होतं. सानू तशी चेहरे वाचण्यात पटाईत होतीच, तिच्या बॅग मधून तिने हाताला बंधायच ब्रासलेट काढलं, जासिकाचा हात हातात घेतला,

“फ्रेंड्स?”

“व्हाव! काकी, सुपर, आय लाइक इट, नाईस डिझाईन, चॉइस मस्त काकी... या फ्रेंड्स.”

सानुने जासिकाच्या हावभावातून सांर काही भापलं होतं, अंदाज तिला आला होता, वडिलांनी दिलेली संपूर्ण मुबा आज तिला सुखावत होती. मनात बाबांचा विचार शिरला आणि ती सुमंतला बघत त्याचा मोबईलं मागायला लागली,

“सुमंत मोबईल देणा, जरा घरी सांगते, पोहचले म्हणून. बाबा वाट बघत असतील.”

“अग हो, मी टाकलाय मेसेज केव्हांच. बाळूने रिप्ल्यापण दिलाय, तुला बोलायचं आहे का? मी लिहिलं कि घरी घेल्यावर कॉल निवांत करू म्हणून...”

“ओके, मग चालेल...”

एअरपोर्टपासून घर तीन तास होतं, सानू विचारात मग्न होती, आज सांर काही बदलणार होतं, राजवाड्यात नाही तर प्यालेसमध्ये तिची एंट्री होणार होती. तिच्यासाठी प्रत्येकाने काहीना काही विचार करून ठेवलं होतं हेही तिने ओळखलं होतं. मासाहेबांची चिंता, सुमंतचा मोकळेपणा आणि घरच्यांची मस्ती सांर काही आजपासून ती अनुभवणार होती. विचारात सानुचा डोळा लागला, शेजारी सुमंत होता त्याने तिची मान खांद्यावर केली. जसिका हसली, शाशंक आणि सुमितहि स्मित हसले, सुमित पटकन म्हणाला,

“काकी टाइरड झाली ना?”

जसिका त्याला म्हणाली, “गप्प राहा रे, पार्टीपण आहे संध्याकाळी, आराम करू देत काकीला, मग आपण मज्जा करू तिच्यासोबत... काकी आवडली ना, मला तर जाम आवडली...”

दोघेही ओरडले, आणि मग गप्प झाले. पण मनातून ते वाट बघत होते सानुच्या उठण्याची. घर जवळपास आलं आणि सुमंतने सानुला जागं केलं. सानूने स्वतःला आवरलं. बच्चे पार्टी तिला नुसती बघत होती जणू तिची प्रत्येक हालचाल ते टिपत होते.

गाड्या पॅलेसच्या आवारात लागल्या. बाहेर प्रचंड थंडी होती. सानूला थंडी लागलाला लागली होती. जासिकाने तिला जाकेट देत म्हणाली,

“मामी, प्लीज घे हे पण घाल...”

सानुने हसत ठेवून घेतलं. सारेच घरात शिरले, क्षणात सांर कसं शांत झालं. जसं काही घडलंच नाही. सारेच त्याच्या त्यांच्या खोलीत पोहचले होते. मासाहेबांनी सानुला आणि सुमंतला दारावर थांबवलं. त्या घरात शिरल्या, त्यांनी मरीनाला आवाज दिला, आरती घेवून यायला सांगितलं. तिला आधीच त्यांनी स्वागताची तयारी सांगितली होती ती तिने करून ठेवेली होती.

ती आरती आणि माप घेवून आली. मासाहेबांनी रीतसर सानूच स्वागत केलं, बच्चे पार्टीने मस्त फोटो काढले. कुणीच बाहेर आलं नव्हतं पण सारेच त्याच्या खोलीतून चोरून बघत असल्याचा भास मात्र जाणवत होता.

भव्य मोठ्या घरात सानू एका कोपऱ्यात उभी असल्यासारखी वाटत होती, पाय पुढे जात नव्हता तिचा, सुमंतने तिचा हात धरला, आणि तिचा पाय पुढे आला, माप ओलांडल आणि ती आत आली... मासाहेब तिला म्हणाल्या,

“सुनबाई, बघा, ह्याला राणे पॅलेस म्हणतात, इथे सर्व राजे आहेत पण... आता तू समजून घे... इथल्या खऱ्या राणीची एंट्री आता झाली आहे... आजवर ह्या पॅलेसमध्ये किंग होता पण क्वीन आता शिरली आहे... माझ्या खूप काही अपेक्षा नाही पोरी... पण ह्या पॅलेसच घर होतांना बघायचं आहे...”

बोलतांना त्यांच्या डोळ्याच्या किनारीवर पाणी जमलं होतं. सुमंतने सानुला नजरेने खुणावत पुढ व्हयाला सांगितलं. ती तर अजूनही तो पॅलेस बघून आवक होती. मासाहेबांजवळ आली, आणि आशीर्वाद घेतला, तोच जसिका पुढे आली,

“मामी, आय विल शो यू यूअर रूम, धिस वे, समान राहूदे जॉन अंकल घेवून येतील.”

सुमंत आल्याआल्या त्याच्या स्टुडी मध्ये शिरला, खूप कागदपत्र त्याच्या टेबलावर होती. सांर काही बघत बसला, मासाहेब त्याला असं बघून खोली आल्या,

“सुमंत ती आजचं आली आहे, कळणार नाही काही, जा कि खोलीत, नंतर बघ सार, आणि संध्याकाळी पार्टी आहे. आराम कर जरा, मी जेवण मरीनाला पाठवायला सांगते.”

“अग नाही कळायला ती काही अशीतशी नाही, अगदीच उत्तर शोधलंय मी सर्व प्रश्नाचं.”

“असं! तू का मी रे?”

“म्हणजे तुचं ग माझी मा... खूप धन्यवाद... हा अनमोल हिरा माझ्या हातात आणून दिलास, आता मला बघायचं आहे मी किती जपून ठेवतो तिला...”

सुमंतने काही महत्वाचे पत्र हातात घेतले आणि खोलीतून निघणार होताच तर मासाहेबानी आठवण करवून दिली,

“मोहिते वाट बघत असतील, कॉल करायला सांग सानूला.”

“जी मासाहेब... आपणही आराम करा.”

सुमंत रीतसर नॉक करून त्याच्या खोलीत आला, सानू कपडे बदलत होती... येवून तो तिला तसाच बिलगला,

“काय राणीसरकार, कसा वाटला वाडा...?”

“वाडा? पॅलेस म्हणता तेच योग्य आहे बाबा. आज मला माझी खोली जसिकाने दाखवून दिली, उद्या कशी गवसणार काय माहित...”

सुमंतने तिला त्याच्या बाजूने पलटवलं, तिच्या मोकळ्या केसांना त्याने अलगत कुरवाळलं, राणी आता एन्ट्री झाली, उद्या सत्ता असेल, हा प्रश्न तर माल पडायला हवा... आज खोलीचं दार उघडल्या गेलं उद्या रीतसर राणीचं परवानगी घ्यावी लागेल.”

त्याने तिच्या माथ्यावर ओठ टिपलीत, तशी सानू शहारली, तिच्या अंगावर उठणाऱ्या रोमांच बिंदूला सुमंतने अलगत स्पर्श केला,

“राणी, काही काळजी करू नकोस, इथे मरीना आहे, ती स्वभावाने खूप छान आहे. ती तुला सगळी मदत करेन, उलट मासाहेबांना खूप मानते ती, मग त्यांच्या शब्दा बाहेर नाही... तुला तिची जास्त मदत होईल...”



आणि तिला परत मिठीत ओढलं त्याने,

“आणि माझ्या राणीला काय कुणाच्या मदतीची गरज ग, अरे ती जिथे उभी राहते तिथे सारे उत्तर असतात.”

आज दुपार प्रेममय झाली होती....

पुढचा भाग पेजवर लवकरच...


कथेचा पुढचा भाग लवकरच.... कथा टाकायला वेळ होत असल्यामुळे क्षमा असावी, यापुढे कथा नियमित असेल 

पुढच्या भागाच्या अपडेट साठी https://www.facebook.com/manatlyatalyat

पेजला लाईक करा आणि tele group ला जॉईन व्हा...

tele group लिंक- https://t.me/manatalyatalyat

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com


“द बुमरेंग”… एक डाव तिचा.... हि कथा इथे वाचा 

https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95?&max-results=8


Post a Comment

0 Comments