एक कोहिनूर सर्वांमध्येच असतो.साधनाच लग्न झालं आणि संसारत रमत गेली, वर्षा मागून वर्ष जात दहा वर्ष झाली. मुलगा मुलगी घरात अगदीच गोकुळ नांदत होतं. सासूच्या शिस्तेत अगदीच तयार झाली होती. रमत रमत स्वतःला गमावलं होतं. कधीकाळी स्वतः चकाकण्याचा प्रयत्न आता संपला होता. कुणीतरी यावं आणि मला मदत करावी, माझ्या कार्याला मान द्यावा ही भावना तिच्यात जन्माला आपसूकच आली होती. आपलंपण संपलं ह्या नादात तिने मीपण गिळून टाकलं होतं. कुठंतरी विचारांनी आणि कर्तव्यात डब झाली होती. सतत आस असायची की कुणीतरी पाठीशी असावं.


https://www.amazon.in/-/hi/Urmila-Deven/dp/9356115923/ref=tmm_pap_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr=


त्या दिवशी मुलाचा अभ्यास घेत होती. मुलाने प्रश्न केला, 

"आई कोहिनूर कसा मिळतो?"

आईने अलगत उत्तर दिलं, 

"कोळश्या च्या खाणीत, शोधावा लागतो, सुरुवातीला कोळसाच असतो, त्याला घासावा लागतो, पोलिश करावं लागते, तेव्हा कुठे तो चमकतो. आणि आपण त्या कोळश्याला कोहिनूर म्हणतो."

तेवढ्यात अरुणाने घरात एन्ट्री केली आणि साधनाचे शब्द उचलत म्हणाली, 

"बाळा, एक कोहिनूर प्रत्येकामध्ये असतो, पण तो शोधायला कुणीच येत नसतं आणि त्याला स्वतःच प्रकाशमान करावा लागतो."

अरुणा साधनाची बालमैत्रीण, परिस्थितीशी लढत स्वतःला कोहिनूर बनवलं होतं तिने. कुणाच्या मदतीची वाट कधीच बघितली नव्हती. साधना तिला थोडीफार मदत करायची, बसं, मग एक आपुलकीच नातं जुळल होतं अरूणाच तिच्याशी. 

अरुणाला नेहमी साधनासाठी वाईट वाटयचं कि ती का अशी बेसुध आहे म्हणून. स्वतः मधला कोहिनूर प्रकाशमान करतच नाही. आणि साधना तिला नेहमी उत्तर द्याची, 

"आता काय ग गरज, झालं माझंपण आता, आणि मला काय येतं."

खरं तर हि तिची समजूत बनली होती ती सतत घरच्यांच्या बोचणीमुळे, आणि आता तिने ते अंगीकारलं होतं. आयुष्य पुढे जात होतं की ढकलत होती हेही तिला कळत नव्हतं. स्वतः मध्ये दडून असलेल्या कोहिनूर अजूनच खोल शिरत होता.

अरुणा घरी आली म्हणून साधना तिच्यासाठी चहा टाकायला गेली आणि अरुणा मुलाशी बोलत होती, जवळच सुंदर कागदाची फुलं ठेवली होती, 


अरुणा  त्यांना बघत म्हणाली, 

"साधू हे तू बनवलेस काय ग? आठवते तुला अशीच फुलं तयार करायची तू वर्ग सजावट करतांना आणि गुरुजी तुझी स्तुती करायचे."

साधना स्वयपाक घरातून बाहेर येत म्हणाली, 

"हो ग, पण ती फुलं मी नाही तयार केलीत, कुठूनतरी ह्यांनी विकत आणलीत, कुठल्यातरी प्रदर्शनातून, मला काय वेळ नसतो ग असं काही बनवण्यासाठी, आता काय करायचं आहे, मिळतात सर्व विकत एक शे एक. मग काय करायचं"

"हो ग, विकत तर सर्वच मिळतं, पण अस्सल तर अस्सल असतं ना... हिरा तो हिराच ना.... जो तुझ्यात आहे ...बघ जरा घासून, कर जरा प्रकाशित... तुझ्या तेजाने कुणाची हिम्मत होणार नाही तुला उलटून बोलण्याची."

अरुणा ने मुलाचा अभ्यास घेतला आणि निरोप घेवून निघून गेली. साधना त्या टेबलावरच्या फुलांना नेहाळत बसली, दुसऱ्या दिवशी दुकानातून तिने भीत भीत वेगवेगळ्या प्रकारची कागद आणि सामग्री विकत आणली, हुबेहूब गुलाबाची आणि जास्वंदाची फुलं बनवली, नवऱ्याला तर फरकही जाणवला नाही खऱ्या आणि खोट्या फुलांमध्ये.

रोज नवीन काही तरी बनवायची, महिन्याभरात अगदीच प्रशिक्षित झाली होती. शेजाऱ्यांना भेट म्हणून देत देत सर्व कॉलोनीत फेमस झाली होती. लागलीच शेजारच्या काकूने तिला वाढदिवसासाठी सजावट म्हणून फुलं तयार करायला सांगितली आणि पैसे ही देवू केले. अरुणाने मनातून मेहनत घेत ते तयार करून सजावट करून दिली आणि काय... अरुणा कागदी फुलासाठी फेमस झाली. 

कोहिनूर प्रकाशित झाला होता....

आणि आज परत  मुलीने प्रश्न केला, 

"आई आयुष्यात प्रकाशित होणं म्हणजे काय ग?" 

साधना मुलाचा अभ्यास घेत असतांना तिला उत्तर देत म्हणाली, 

"एक कोहिनूर प्रत्येकामध्ये असतो, बसं.... आपल्याला तो शोधता यायला हवा, आणि तो प्रकाशित झाला कि आपसूकच आयुष्य प्रकाशित होतं आणि आनंदीही."

मुलगी चटकन बोलली, 

"आई तू तुझ्यातला कोहिनूर शोधला ना? तुला खूप छान जमतात कागदी फुलं तयार करणं..तोड नाही त्याची. तुझी स्तुती सगळ्या काकू करतात ना तेव्हां मला मस्त वाटते."

साधना हसली आणि मुलांना कवेत घेत म्हणाली, 

"मग तुम्ही कधी शोधतो तुमच्यातला कोहिनूर... स्वतःला प्रकाशित करायचं आहे कि नाही...? कोणी नाही हा मदत करणार...अगदी मी पण नाही ..आयुष्य तुमचं आहे कोहीनुरही तुम्हाला शोधावा लागेल."


----------

मग मित्र मैत्रिणिनो... शोधताय ना कोहिनूर स्वतः मधला... 

कारण एक कोहिनूर तर सर्वांमध्येच असतो... 

बस त्याला शोधून...  चमकवावा लागतो, आपल्यासाठी हो, आपल्या आनंदा साठी, मग आयुष्यही तुमचं आणि आनंदही तुमचा...

बघा पटलं तर...


कथा कशी वाटली नक्की कळवा, माझ्या नवीन कथेसाठी माझ्या पेजला लाईक करायला विसरू नका...

................

 ©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

धन्यवाद! 🙏🙏

(फोटो साभार गुगल )


प्रिय वाचक लवकर आपल्या भेटीस... नवीन कथा मालिका... द गेम ऑफ अफेअर...


Post a Comment

0 Comments