' द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग...'
"व्वा!! काय मस्त दिसते रे ती... कोण आहे? कुणाची बायको आहे? सॉलिड फिगर आहे यार! अरुण, जरा माहिती काढ... कुणाचा टॅग आहे तिच्यावर?"
"सर, ती निळ्या साडीतली का?"
"हो... तीच. बघ, , तिच्या उजव्या बाहूवर छोटासा तीळ आहे... तीच.”
अरुणने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, "सर, ती आपल्या कंपनीकडे जे टेंडर आलं आहे ना, त्या कंपनीच्या मॅनेजरची बायको आहे."
"अरेच्या!! कुणालची का?”
अनिकेश जरा आश्चर्याने बघू लागला, “आयला... एवढी सुंदर बायको ह्याला कुठून भेटली? टपरी दिसतो साला तो. ज्याला त्याला टापत असतो आणि स्वतः ची बायको मात्र लपवून ठवतो!" आजूबाजूला असलेले दोन दिन जण जरा मंद हसले. अरुण मात्र काही बोलला नाही. तो गुमान कुणालकडे गेला. कुणाल त्या वेळी काही पाहुण्यांशी बोलत उभा होता. अरुणने त्याला हळूच बाजूला केलं आणि हळू आवाजात अनिकेश सरांनी काय बोललं ते सांगू लागला. कुणाल सुरवातीला जरा गोंधळलाच, त्याचा चेहराही क्षणभर उतरला. तो त्याच्या बायकोकडे बघू लागला. पण एवढ्यात लोकांत त्याला काही सुचलं नाही. मग स्वतःला हलकंसं हसत म्हणाला, "नजर पडलीच माझ्या बायकोवर साल्याची. स्वतः ची बायको आयटम आहे. तरीही दुसऱ्याच्या बायकोकडेच नजर जाणार.”
परत त्याच्या बायकोकडे बघत म्हणाला, “चल, जातो आकृतीकडे जरा, मी पण घेतो नयनसुख... तिच्या शेजारीच उभा राहतो."
असं म्हणत त्याने कोटाचं बटण लावलं, चेहऱ्यावर नेहमीचं आत्मविश्वासपूर्ण स्मित आणलं आणि सरळ आकृतीच्या दिशेने चालू लागला. कुणालला त्याला असं बघून गंमत वाटत होती. तोही ग्लास घेत परत अनीकेशकडे आला.
आकृती... कधी काळाची टॉप मॉडेल, दागिन्यांची प्रसिद्ध डिझायनर, झिरो फिगर, आणि बोलणं वागणं जसं एकदम अट्रॅक्टिव्ह. नवऱ्यावर तिचं जीवापाड प्रेम, म्हणजे तिच्यासाठी जीव की प्राण. आणि त्याच्यावरचा तिचा विश्वासही तितकाच अंधळा होता. आकृतीच्या वडिलांनी बिझनेस वाढावा म्हणून आपल्या एकुलत्या एका मुलीच लग्न अनिकेशसारख्या हुशार, देखण्या आणि श्रीमंत उद्योगपती मुलाशी लावून दिलं होतं. इकडे, आकृतीला कुणाल आधीपासून ओळखत होता. दोघे कॉलेज मध्ये एकत्र होते पण त्या वेळेस काही फारसं बोलणं नव्हत. पण पुढे आता अनेक बिझनेस पार्टीत वारंवार भेटी होत गेल्या आणि त्यांची मैत्री झाली. अनिकेशाचा स्वभाव फितूर, कधी ह्या फुलावर तर कधी त्या फुलावर. म्हंटल तर एका फुलाचा सुगंध संपायच्या आत दुसऱ्या फुलाकडे वळणारा. प्रत्येक सुंदर स्त्री त्याच्यासाठी जणू एक नवीन शिकार होती. कुणाल तसा नव्हता. तो स्वतःला त्या मर्यादेपलीकडे जाऊ देत नसे. तरीही अनिकेशचं बेधडक जगणं पाहून त्याला कधी कधी हेवा वाटायचा. पण आज काहीतरी वेगळं घडलं होतं त्याच्या बाबतीत. अनिकेशच्या नजरेत आलेली कणिका, त्याची आकृतीसाठीची ओढ हे सारं बघून त्याच्या मनात एक विचार डोकावला होता. आज जाळं टाकलं गेलं होतं... पण त्यात अडकणार मासा कोण होता... आणि खरा शिकारी कोण? हा प्रश्न दोघांच्या सभोवताली फिरत होता.
कुणाल अनिकेशची बायको आकृतीच्या नजीक आला, "हॅलो, आकृती! कशी आहेस?”
"मी मस्त! तू कसा आहेस? आणि हो... तुझी बायको कणिका, खूप सुंदर आहे. म्हटल तर अगदीच टिपिकल नैसर्गिक सौदर्य लाभलं आहे तिला. आत्ताच भेटले मी तिला... गोड आहे खरंच."
“खूप थँक्स.”
ती जरा वळणार तोच त्याने प्रश्न केला, “ड्रिंक घेणार ?”
"नाही, आज मला ड्राइव्ह करायची आहे, अनिकेशच तर माहित आहे तुला... तू घे ना."
ग्लास हातात घेत तो अजूनही तिच्या जवळ उभा होता, “एक सांगू? मला तुझ्यातली एक गोष्ट खूप आवडते.”
“कोणती रे?”
“मला आवडतेस तू... म्हणजे तुझ्या बोलण्यात... आणि वागण्यात जी सहज लचक, आत्मविश्वास आणि ग्रेस आहे ना... ती फारच अॅट्रॅक्टिव्ह आहे?"
"आकृती हलकंसं स्मित हसली, “ओह... थँक्स. ते ऐकून बरं वाटलं... आणि तेही मित्राकडून."
ती जरा हुस्कारा देत आणि पुरुषांच्या अशा विकृत जातीला मनातच नावं ठेवत त्याच्या समोरून निघून गेली. आकृतीला असल्या पुरुषांची चांगलीच ओळखून होती. ती शहरात वाढलेली. आणि मोठं मोठ्या व्यावसायिक वर्तुळात वावरणारी स्त्री होती. गोड जहर होती ती. गोड बोलून अशा लोकांमधून बाहेर निघणं तिला चांगलच अवगत होतं. कुणालच्या नजरेत आता ह्या क्षणी काय सुरु आहे आणि कुणालच्या ह्या शब्दांमागे काय मनीषा असावी हे तिने भापलं होतं. पण व्यवसायात अनेकदा माणसांपेक्षा व्यवहार मोठे असतात. समोरच्याचा अहंकार दुखावायचा नाही आणि स्वतःची मर्यादाही ओलांडू द्यायची नाही, हा समतोल तिला साधता येत होता.
आकृती तिथून निघाली आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कुणाल मिश्कील हसला, ग्लासातील घोट संपवत स्वतःशीच पुटपुटला, "कशी काय पटली बुवा त्या फितुरला अनिकेशला, कोण जाणे! एकदा तरी भेटावी मला. काय चीज आहे यार..."
पार्टी संपली होती. कुणाल आणि कणिका घरी परतले होते. गाडीत बसल्यापासूनच कणिका जरा शांत होती. पार्टीतलं वातावरण तिला फारसं काही आवडलेलं नव्हतं. त्यात तिला तारणाऱ्या अनेक नजरा तिला अस्वस्थ करून गेल्या होत्या. विशेषत: कुणालच्या बॉसची ती घाणेरडी नजर तिला टोचत होती. घरात पोहोचल्यावर तिने दागिने काढतच म्हंटल,
"काय माणूस आहे रे तो तुझा बॉस की काय! सारखा टक लावून बघत होता माझ्याकडे. अगदीच विचित्र वाटला... काय बोलत होता नजरेतून मला तर बाई किळसवाणं झालं होतं."
कुणालाने विषय जरा हळूच उघडत म्हणाला, "तुझ्याशी बोलला का तो?"
"नाही, पण काही गोष्टी बोलाव्या लागत नाहीत, नजरेतून जाणवतं ना रे."
“अगं, तो असा थोडा बिनधास्त आहे. मनावर घेऊ नकोस.”
कणिकाने त्याच्याकडे रोखून पाहिलं, “बिनधास्त आणि बेशरम यात फरक असतो, कुणाल. काही नजरा अंगावर येतात... आज तसंच वाटलं मला.”
क्षणभर कुणाल गप्प झाला. कणिका आवरलं होतं. तसा तो जवळ येत म्हणाला, "पण तुझी स्तुती करत होता अनिकेश. म्हणाला, ‘तुझी बायको खूप सुंदर आहे. निळ्या साडीत अजूनच खुलून दिसते.’”
"असं बोलला तो, आणि तुला? मग तू काय म्हणालास?"
कुणाला सहजपणे म्हणाला, "त्यात काय एवढं? खरं ते खरंच ना.... आहेच ना तू सुंदर. आणि माझी बायको आहेस."
कानिकाही जरा लाडात आली होती. नवऱ्याच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून तिचा राग थोडा विरघळला. त्याने अलगद कानिकला मिठीत घेतलं. खोलीचा दिवा विझवला आणि मग प्रेममग्न झाला. काही क्षणांत दोघंही एकमेकांच्या सहवासात विरून गेले. रात्र बरीच सरली होती, तो उठला. कणिका गाढ झोपली होती. कुणालच्या डोळ्यात अजूनही झोप नव्हती त्याला आकृतीची आकृती डोळ्यासमोर दिसत होती.
त्याने मोबाईल हातात घेतला. आणि पार्टीतले आकृतीचे फोटो बघायला लागला. एका कुशीत स्वतःची बायको झोपलेली होती तर आणि दुसरीकडे त्याच्या नजरा मोबाईलच्या स्क्रीनवरून आकृतीचं सौंदर्य न्याहाळत होत्या.
जेमतेम त्याच्या लग्नाला सात महिने झाले होते. कणिकावर त्याचं प्रेम होतंच; पण आज मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. आजवर त्याने जाणूनबुजून कणिकाची ओळख आपल्या बॉसशी करून दिली नव्हती. आपल्या बायकोवर त्याची नजर पडू नये, असंच त्याला नेहमी वाटायचं.
पण आज...
आज त्याची नजर पडूनही त्याला काहीच राग येत नव्हता. उलट त्याच्या मनात वेगळेच हिशेब सुरू झाले होते. विचारात होता की टेंडर कस पास करवून घ्यायचं? विचारात त्याला एक गोष्ट आठवली, “अरे... मागच्या वर्षी अनिकेशच्या कंपनीचं मशीनचं टेंडर अजूनही क्लिअर झालेलं नाही ना. मग यंदा तो माझं टेंडर तो सहजासहजी कसं मंजूर करेल?”
कणिका... कुणालची बायको, गावाकडेची, पण गावातल्या इनामदाराची मुलगी. घरंदाज, सुंदर आणि गर्भश्रीमंत. एकदम संस्कारात वाढलेली. मनाने भावूक; पण प्रसंगी कडक लक्ष्मीही होती. म्हणूनच जरा तिखट होती. तिचा हाच तिखटपणा कुणालला आवडला होता. पण म्हणतात ना... जास्त तिखट खाऊन जिभेला सोसवत नाही मग जरा गोड खाण्याची इच्छा होते. शहरातल्या मुलींसारखा वागण्यात लडिवाळपणा, कृतीम गोडवा कणिकात नव्हताच. ती आपली अगदी साधी गृहलक्ष्मी होती. तिच्या जे मनात ,तेच आचरणात होतं. मनात एक आणि चेहऱ्यावर दुसरं, हे तिला कधीच जमत नव्हतं. जरा कुणी स्तुती केली की एकदम विरघळून गोड व्हयाची सवय तिची. आजही तसंच झालं होतं. कुणालच्या मनात वेगळंच वादळ घोंघावत होतं. त्याच्या विचारांची दिशा बदलू लागली होती. पण कणिकाला त्याच्या मनातला हा गोंधळ कणभरही जाणवला नाही. ती त्याच्या गोड बोलण्यात विरघळली... आणि नेहमीप्रमाणे त्याच्या मिठीत स्वतःला विसरून गेली.
सात दिवसांनी कुणाल आणि अनिकेशाची व्यावसायिक बैठक ठरली होती. पार्टीनंतर अनेकीशला मनात एक गोष्ट ठाण मांडून बसली होती की कुणालशी एकांतात विषय काढून बोलायचं.
इकडे कामाच्या व्यापात आणि बायकोच्या प्रेमात सगळं विसरला सुद्धा होता. त्याने नव्या दमाने प्रोजेक्टची पूर्ण तयारी केली होती. कंपनीचं टेंडर मंजूर व्हावं म्हणून तो दिवस-रात्र एक करून प्रयत्नात होता. कुणाल कॉन्फरन्स पोहोचला होता. पूर्ण आत्मविश्वासाने प्रोजेक्टचं प्रत्येक बारकाव्यासह त्याने सादरीकरण केलं होतं.संपूर्ण प्रेझेंटेशन अनिकेशने शांतपणे ऐकून घेतलं. ते संपल्यावर काही क्षण शांतता पसरली. इतर मेम्बर्सचं म्हणणं होतं की मागच्या वर्षीचे त्यांच्या कंपनीचा टेंडर अजूनही ह्या कंपनीने क्लिअर केला नाही मग आता ह्यांच्या कंपनीच्या टेंडरलाही होल्डवर ठेवायला हरकत नाही. अनिकेश फाईल चाळत म्हणाला, “तुमचं म्हणणं चुकीचं नाही. पण हा प्रस्ताव बाकीच्या कंपनीच्या प्रस्तावांपेक्षा जास्त फायदेशीर वाटतोय. केवळ जुन्या गोष्टी मनात ठेवून कंपनीचं नुकसान करणं योग्य वाटत नाही. मला जरा वेळ द्या. मी स्वतः मॅनेजरशी बोलतो.”
अनिकेशवर विश्वास ठेवून सर्व मेंबर कॉन्फरन्स मधून निघून गेले. कॉन्फरन्स रूम रिकामी होताच अनिकेशने खुर्चीवर रेलत कुणालकडे पाहिलं, “कुणाल जरा माझ्या कॅबीनमध्ये बोलूया.”
दोघेही हसत गप्पा करत अनिकेशच्या कॅबीनमध्ये आले, अनिकेश फाईल टेबलवर ठेवत म्हणाला,
"प्रोजेक्ट प्रपोझल खरंच उत्तम आहे, पण..."
"पण काय? काही त्रुटी असतील तर सांग, दुरुस्त करतो. आपली मैत्री आहे मित्रा. शिवाय तुझ्या बायकोचा मित्र आहे मी "
अनिकेश मोठ्याने हसला, "हाहा हाहा .. तसं काही नाही रे ...”
अनिकेशने विषय मुद्दाम बदलला, “अरे त्या पार्टीचे फोटो बघितले का तू? खूप छान आले आहेत"
आणि मग नेमका कानिकाचा फोटो त्याने कुणालला दाखवला, "बघ... किती सुंदर फोटो आलाय तुझ्या बायकोचा. पण ती ह्यापेक्षा जास्त सुंदर आहे... खरंच... कॅमेऱ्यालाही तिचं सौंदर्य पूर्ण टिपता आलेलं नाही. "
तो बोलत होता पण त्याची नजर मोबाईलच्या स्क्रीनवरून हटत नव्हती. त्याने फोटो दोन बोटांनी झूम केला. कणिकाच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर, स्मितहास्यावर त्याची नजर रेंगाळत राहिली. कुणालही त्याच्या अस्वस्थपणा बघत होता. आणि मग अनिकेशने खिशातून सिगारेटचं पाकीट काढलं. एक सिगारेट ओठांत धरली, लायटरने पेटवली आणि पहिला खोल झुरका घेतला. काही क्षणांनी धुराचं मोठं वर्तुळ नाकातून बाहेर सोडलं. केबिनमध्ये धुराचा मंद थर पसरू लागला.
अनिकेशला असं बघून कुणाल म्हणाला, "चल, डील करूया. तू माझा प्रोजेक्ट पास कर, मी तुझा."
अनिकेश नुसता हसला, "काय? तु आमचा पेंडिंग प्रोजेक्ट क्लिअर करणार! पण त्याने काही होणार नाही, मागच्याच महिन्यात आम्ही तुझी कंपनी उत्तर देत नाही म्हणून दुसऱ्या कंपनीकडे दिलाय. आणि तो पुढच्या महिन्यात मार्गी पण लागेल .. हाहाहा"
त्या सिगारेटचा शेवटचा सिप ओढला आणि तिला अॅशट्रेमध्ये कुचकारात तो परत खुर्चीवर बसला. त्याने पुन्हा टेबलावर पडलेलं प्रोजेक्ट प्रपोजल हातात घेतलं. प्रत्येक पान निवांत चाळत राहिला. परत दुसरी सिगारेट काढली आणि लायटर शोधात खिशे चाचपत होता. समोरून कुणालने स्वतःचं लायटर पुढे केलं. अनिकेशने सिगारेट पेटवली आणि पहिली झुरका जोरात घेतला. आणि मग टेबलावर ठेवलेला पेपरवेट गोल घुमवत कुणालला तीक्ष्ण नजरेने बघत होता. कुणालाही जरा घाबरला, त्याने जरा घसा खाकरला आणि म्हणाला, "काय मग.. किती घेणार तू ? प्रोजेक्ट पास करणं तुझ्याच हातात आहे, बोल बिनधास्त. एकतोय मी."
अनिकेश जरा गूढ हसला आणि खुर्चीत मागे रेलला. सिगारेटचा एक खोल झुरका घेत धुराचं वर्तुळ हवेत सोडलं आणि अगदी शांत आवाजात म्हणाला, "कणिका, फक्त एका रात्रीसाठी "
क्षणभर वेळ जसा थांबला... कुणालला काही सुचलं नाही. तो उठून उभाच राहिला. समोर ठेवलेली पाण्याची बॉटल उचलली आणि गटागट रिकामी केली. अजूनही कपाळावर घामाचे थेंब होते, "अरे ए... काय फालतूपणा करतोयस तू? मला आधीच वाटलं होतं... तुझी नजर पडलीच होती माझ्या बायकोवर.”
काय करेल कुणाल, आपलं करिअर वाचवण्यासाठी तो कोणता निर्णय घेईल? अनिकेशचा प्रस्ताव तो धुडकावून लावेल... की ... अजून काही.. वाचा पुढल्या भागात...
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @followers @topfans #मराठी #मराठीकथा #उर्मिलादेवेन #मनातल्यातळ्यात

0 Comments