द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग...' भाग २

  द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग...' भाग २


पहिला भाग इथे वाचा- पहिला भाग

कुणाल त्या क्षणी काहीबाही बोलून गेला. अनिकेश मात्र अजूनही शांत त्याच्याकडे बघत होता. मिश्कील हसला.
“ए... बस खाली!”
कुणाल अजूनही उभा होत, ताडकन म्हणाला, "माझ्या बायकोबद्दल अशी भाषा बोलायची हिंमत झालीच कशी तुझी?"
अनिकेश मात्र अजिबात विचलित झाला नाही. त्याने सिगारेट संपवली आणि तिला अॅशट्रेमध्ये कुचकरली. पाठमोरा उठला. काचातून बाहेर बघत होता. इकडे कुणाल त्याची फाईल आवरत गप्प होता. जरा वेळ शांतता होती खोलीत. अनिकेश अजूनही शांत उभा आहे ह्याचे कुणाला आश्चर्य वाटत होते. पण अनिकेशला तर कणिका हवी होती... तो परत टेबलजवळ आला, त्याने कुणालच्या प्रोजेक्टची फाईल उचलून खाली फेकली... आणि हसला...
“तू... आणि मला शिकवणार... नको रे. तुझी तर नजर कित्येक दिवसांपासून माझ्या बायकोवर आहे. त्या दिवशी पार्टीत तू आकृतीभोवती किती घुटमळत होतास, ते मी पाहिलं नाही असं वाटतंय का तुला? साल्या तुझ्या साख्याला माझा सारखाच ओळखू शकतो. आला मोठा वर तोंड करून मला बोलणारा.”
कुणाल काही बोलणार इतक्यात अनिकेश पुन्हा म्हणाला, “मी तेव्हा तुला काहीच बोललो नाही. कारण मला माहिती आहे... सुंदर गोष्टीकडे नजर जातेच. जे सुंदर ते सुंदरच ना सगळ्यांसाठी... मग मी जरा तुझं एका दिवसासाठी मागितलं, एवढचं! टपोरी कुठला, चांगुलपणाचा आव आणू नको आणि हे तुझं संतापायचं नाटक करू नकोस माझ्यासमोर.”
कुणाल फाईल उचलत होता. त्याने अलगद मुठ आवळली. आता अनिकेशही खाली झुकला, “अबे ए, नाटक्या, तुझ्या बायकोला माहित आहे का... तुझ्या लग्नाआधीच्या त्या सुहागराती? की अजूनही ती 'झुमकेवाली' तुझ्या आयुष्यात आहे? भेटवलीस कधी कणिकाला तिच्याशी? की अजूनही लपूनछपून जातोस तिच्याकडे? लफडेबाज... ह्याला लग्नासाठी गावराण माल हवा... वर्जिन... त्यावर बायको एवढी सुंदर तरीही जवळपासच्या बायकांवर ह्याची नजर... माझ्यासोबत काम आणि माझ्या बायकोला चोरून बघणं... चल निघ रे.... तुझ्यासारखा तर नाही मी. माझ्या मनात जे तेच मागितलं...”
कुणालचा चेहरा पांढराफटक पडला. अनिकेश काही पान उचलली आणि रूमभार फेकली.... आणि पुढे कडक आवाजात म्हणाला, “जा... नाही करत तुझा प्रपोझल पास. बघतो तुला कसं प्रमोशन मिळतं ते."
कुणाल त्याच्याकडे टक लावून बघत होता... तसा अनिकेश ओरडला, “निघ... मला कामं आहेत.”
अनिकेश रागात आला होता हे कुणालच्या लक्षात आलं होतं. त्याच्या मनातही बोलायचं होतं पण त्याला हवी ती पहल अनिकेशकडून हवी होती... आता जरा वातावरण तापलं होतं. त्याने फाईल उचलली आणि तो निघाला. अनिकेश निवांत आता त्याच्या खुर्चीत बसला. स्वतःशीचं पुटपुटला, “कुणाल... तुझी चूक ही आहे की तू मला नकार दिला... आणि तेही चांगुलपणाचा आव आणत...”
तो मिश्कील हसला... आणि त्याने हातात मोबाईल घेतला. एक कॉल लावला, “हॅलो... ह्या क्षणापासून के. इन्फ्राचा सर्व व्यवहार माझ्या परवानगीशिवाय पुढे जाऊ देऊ नका... मी म्हणेपर्यंत सगळं होल्डवर. गॉट इट.”
कॉल कट करत अनिकेश खुर्चीत मागे रेलला. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही कणिकाचा फोटो होता... इकडे कुणाल संतापाने केबिनमधून बाहेर पडला. पावलं भराभर पडत होती, पण मनात विचारांचं वादळ उठलं होतं. अनिकेशने केलेली मागणी त्याच्या डोक्यात घणासारखी घुमत होती. पण जरा मनाला काहीतरी जाणवतही होतं... मनातलं पूर्ण करण्याची वेळ येत आहे असेही वाटत होते... तो पार्किंगकडे निघालाच होता तर तेवढ्यात मोबाईल वाजला. समोरून बॉस बोलत होता की हे टेंडर मंजूर झालं तर कुणालची पोस्टिंग पुढच्या महिन्यापासून प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून होईल. कॉल झाला आणि कुणाल काही क्षण तिथेच स्तब्ध उभा राहिला.... परत अनिकेशकडे जावं आणि.... असा विचार त्याच्या मनात एकदम चमकला... प्रोजेक्ट डायरेक्टर... इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर त्याच्या करिअरमधील सर्वात मोठी संधी त्याच्या दारात उभी होती. पण... अनिकेश ते टेंडर सहजासहजी पास होऊ देणार नव्हता. 'आता काय करायचं...?' तो विचारातच पुढे चालत होता. तेवढ्यात समोरून आकृती येताना दिसली. तिला पाहतच त्याला एकदम फ्रेश वाटलं. ती नेहमीप्रमाणे देखणी दिसत होती. हातात फाईल, मनगटात एक नवं डिझायनर ब्रेसलेट आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. तिने दुरूनच हात दाखवत विचारलं, “अरे, कुणाल, तू इथे कसा?”
कुणालने स्वतःला क्षणभर सावरलं, "तुझ्या नवऱ्यासोबत मिटिंग होती, तू... तू छान दिसते आहेस, नवीन डिझाईनचे ब्रासलेट आहे ना हे?"
"हो. मीच डिझाईन केलंय. अजून मार्केटमध्ये लाँचच झालेलं नाही."
"खरंच? मग माझ्या बायकोसाठी करून दे ना. आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येतोय. कणिकासाठी काहीतरी खास गिफ्ट घ्यायचं आहे. तुझ्या डिझाइनमधलं एखादं युनिक ब्रेसलेट बनवशील का?”
"ओके... माझा कॅटलॉग बघायला ये मग. त्यातून मग जरा मोडीफाय करते."
"घरी की ऑफिसमध्ये?"
"घरी आलास तरी चालेल, नो प्रोब्लेम. अनिकेशही बहुतेक उशिराच येईल. निवांत बघता येईल.”
ती अगदीच सहज बोलून त्याला बाय केलं आणि नवऱ्याच्या कॅबीन मध्ये शिरली. कुणाल मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही क्षण पाहत राहिला.
कुणालच्या मनातल्या विचारांची चाबी एका विचारांवर लागली आणि तो तडक अनिकेशच्या कॅबीनकडे निघाला. बाहेर उभा राहून दारावर हलकंसं नॉक केलं. "कम इन..."
"अनिकेश... जरा बोलयचं होत मित्रा."
"अरे, सध्या मी माझ्या राणीसोबत आहे. आपण जरा नंतर बोलू... तू ये ना पाच मिनिटांनी."
"ओके, मी बाहेर वाट बघतोय." आणि मग मनातच पुटपुटला, "काय राणी म्हणे... दुसऱ्याच्या बायकोवर डोळा ठेवणारा हरामखोर."
काही क्षणांनी आकृती केबिनमधून बाहेर आली. कुणालकडे पाहून स्मितहास्य केलं, म्हणाली, “ये घरी वेळ मिळाला की कॅटलॉग बघायला...” आणि पुढे निघून गेली. मग कुणाला आत शिरला, अनिकेश पाठमोरा खिडकीतून बाहेरच दृश्य बघतच म्हणाला, "हे बघ मला तुझ्या आणि आकृतीच्या मैत्रीचा वगेरे दाखला देऊ नकोस, ती काही तुझी मैत्रीण नव्हतीच... आता काही वर्षाआधीपासून तुमची काय ते मैत्री."
"मी मैत्रीचा दाखला देतच नाही आहे. मी तर...”
“मग?”
अनिकेश पालटला, कुणालने थेट त्याच्याकडे पाहिलं, “ज्या प्रस्तावाबद्दल तू बोलला होतास... तो फक्त माझ्या बायकोपुरताच का?”
क्षणभर केबिनमध्ये शांतता पसरली... अनिकेश हळूहळू त्याच्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित हास्य होतं. त्याने सिगारेट ओठांत धरली, पेटवली आणि खोल झुरका घेत त्याच्या नजर रोखून बघू लागला. तसा कुणाल बोलला, “म्हणजे... व्यवहार दोन्ही बाजूंनी व्हावा, आकृती!!... उधार, देतो का एका रात्रीसाठी... बदल्यात..."
अनिकेश एकदम पलटला, सिगारेट तोंडात टाकत कुणालला नेहाळत हसला, " साल्या, टपरी... आता बोलला तू मनातलं, सरळ म्हण ना... वाएफ स्वॅपिंग करायचं आहे, मानलं बुवा तुला, माझाच प्रश्न मलाच मारला तू... साला... बस बस!!"
कुणाल बसला आणि अनिकेशने प्रोजेक्टची फाईल त्याच्याकडून घेतली. ती उघडत म्हणाला, "म्हणजे... शेवटी आपण एकाच पानावर आलो आहोत... चल मग कसं पुढे जायचं ह्याचा विचार करूया. आकृतीला मी ओळखतो. तिचा स्वभाव, तिच्या आवडी-निवडी, ती कशी विचार करते... सगळं मला माहिती आहे. पण कणिकाला मी अजिबात ओळखत नाही. ती तुझी जबाबदारी.”
कुणाल नुसता ऐकत होता, अनिकेश पुढे म्हणाला, “आणि ऐक... या विषयाची कुठेही वाच्यता नाही. आपल्या दोघांपुरतंच हे राहिलं पाहिजे. जे काही होईल, ते इथंच संपलं पाहिजे. रात गयी बात गयी असणार आहे तुझ्या माझ्यासाठी समजलं!!. एका रात्रीच सुख ते, तुही भोग मीही भोगतो. तेवढीच आपली मौज ... आता बायकांनी संमती दिली तर.... तर खूपच छान... काय?”
कुणाल त्याला दुजोरा देत म्हणाला, “हो हो... तू म्हणतोस ते अगदीच बरोबर आहे मित्रा.”
“हम्म, आणि ऑफिसमध्ये आपण पुन्हा दोन व्यावसायिक माणसं असू. कोणताही पुरावा नाही... कोणतंही स्पष्टीकरण नाही. हे लक्षात घे!!”
त्याच्या चेहऱ्यावर एक कुटिल हास्य होतं, “व्यवहार म्हणजे व्यवहार मित्रा. भावना मध्ये आणल्या की खेळ बिघडतो... त्या फक्त त्या रात्री ”
त्याने हात पुढे केला. आणि कुणालने हात मिळवला. तसा तो परत म्हणाला,
“आता दुसरा व्यवहार.”
कुणालने त्याच्याकडे पाहिलं.
“मागच्या वर्षीचं आमच्या कंपनीचं प्रलंबित टेंडर तू मंजूर कर. मी तुझ्या कंपनीचा हा प्रोजेक्ट मंजूर करतो. दोन्ही निर्णय कागदोपत्री पूर्णपणे वैध दिसतील. बोर्डलाही शंका येणार नाही. दोन कंपन्यांमधला व्यावसायिक समन्वय वाटेल... आपसातली डील समजतील.”
कुणालच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. त्याच्यासाठी कणिकाला सांभाळणं कठीण जाणार होतं. आणि आकृतीला तिच्या राहणीमानामुळे तो गृहीत घरून चालला होता. अनिकेशचा पुढे केलेला हात अजूनही हवेतच होता. त्या हस्तांदोलनात फक्त दोन प्रोजेक्ट नव्हते... तिथे दोन माणसांच्या नैतिकतेची किंमत ठरणार होती.
मग लगेच अनिकेशने कपाट उघडलं. आतून एक महागडी व्हिस्कीची बाटली बाहेर काढली. त्याने दोन ग्लास भरले. दोघांचे ग्लास एकमेकांवर हलकेच आपटले.
“चिअर्स!”
अनिकेश हळूच म्हणाला,” आजचा व्यवहार पक्का झाला, तर सेलिब्रेशन तर बनतंच.”
दोघांनी एकेक घोट घेतला. क्षणभरापूर्वी एकमेकांच्या अंगावर धावून जायला तयार असणारे आता अगदी जिवलग मित्रांसारखे समोरासमोर बसले होते. पैशाने आणि स्वार्थाने काही मिनिटांत नात्यांची व्याख्याच बदलून टाकली होती. व्हिस्कीचा आणखी एक घोट घेत कुणाल कपाळ चोळत म्हणाला, " पण एकच प्रॉब्लेम आहे यार... कणिकाला कसं पटवायचं? ती अगदी गावाकडच्या संस्कारांत वाढलेली आहे. सरळ, साधी... अशा गोष्टींचा विचारही करणार नाही... गावराण नार आहे ती.
आणि मग परत एकदम ग्लास रिकामा करत म्हणाला,"काही तरी सुचव मित्रा मला.. काही सुचत नाही.. कठीण आहे सारं... काहीतरी आयडिया दे. डोकंच चालत नाहीये यार."
अनिकेशने विस्की परत कुणालच्या ग्लासमध्ये ओतली आणि आता बॉटल परत जागेवर ठेवली, "हा शेवटचा पेग हा. ऑफिसमध्ये आहोत आपण." आणि तो हसायला लागला.
मग चेहरा गंभीर करत म्हणाला, “घाई केलीस तर सगळा खेळ बिघडेल. प्रत्येक माणसाची एक मानसिक किल्ली असते. ती शोधावी लागते. सरळ विषय काढलास तर नकार मिळेल. आधी विश्वास वाढव... परिस्थिती तयार कर... बाकीचं नंतर पाहू.”
कुणाल त्याच्याकडे एकटक पाहत होता. हळूच म्हणाला, “पण कणिका... ती खूप सरळ आहे. तिचा माझ्यावर अंधळा विश्वास आहे.”
अनिकेश त्याला पुढे म्हणाला, “तेही खरं म्हणा पण कसं ना, ह्या फाय सोसाईटतल सगळ चालत आपल्या बायकांना, आणि इथेच जरा नाक तोंड मुरळतात. सांग की जुन्या काळातही होतंच म्हणा, मोठं मोठे राजे महाराजे तर गेम खेळायचे आणि तेही सर्वांना माहित असायचं. आपण तर गुपचूप करणार. मग जरा गंभीर होत अनिकेश कुणालच्या अगदीच जवळ गेला, जरा रिस्क आहे, पण कस ना तनशांती साठी जरा मनशांती करावी लागेल, काही तरी करू या... आणि लक्षात गेह मोठ्या लोकांच्या जगात किती व्यवहार पडद्यामागे होतात, हो ना?”
कुणाल अनिकेशला समजला होता, तरीही त्याची काळजी कणिका होती, विचारांना आवरत म्हणाला, “हो करावं लागेल आता आपण दोघेही तयार असल्यावर त्या काय म्हणणार...पण कणिका जरा...”
आणि कुणाल विचारात मग्न झाला.
अनिकेश मिश्कीलपणे म्हणाला, "अरे, त्यात काय एवढं? जरा इंटरेस्ट निर्माण कर की माझ्याबद्दल तिच्या मनात. बायांना काय कौतुक तेवढं पाहिजे असतं. अटेन्शन सिकर असतात, तिचं म्हणणं ऐकून घे, थोडं लक्ष दे... बस! पण लक्षात ठेव, प्रत्येक स्त्री सारखी नसते.आता कणिकाला निदान बोलण्यातले हेवे दावे कळणारही नाही पण आकृती... शांत पाण्यासारखी वाटते. पण त्या डोहाची खोली मी ओळखतो. तिच्यासमोर प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागतं.”
दोघांच्याही गप्पा रंगत होत्या आणि दोघेही हसत होते. केबिनच्या बाहेरून पाहिलं, तर कुणाल आणि अनिकेश जणू जुने जिवलग मित्र गप्पा मारत बसले आहेत, असंच कुणालाही वाटलं असतं. पण त्या हसण्यामागे दोन चेहऱ्यांचे मुखवटे होते...आणि दोन स्वार्थी मनांचे व्यवहार.
--

आता कुणाल कसं मन वळवतो बायकोचे बघूया पुढील भागात... तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या विषयावर नक्की कळवा... प्रत्येकाच्या नजरेत एक प्रतिक्रिया नक्की असते... नक्की द्या... तेवढच माझ्या लेखणीला प्रात्साहन मिळेल आणि पुढचा भाग मांडायला मदत होईल...
आधीचा भाग भागाची लिंक पहिल्या commnet ला आहे. आणि भाग पेजवरही आहे.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @followers @topfans

Post a Comment

0 Comments