बायको शब्दातच वजन आहे, अर्धांगिनीला पत्नी हा शब्द मला खुप सौम्य
वाटतो... स्वतःला बायको म्हणून घेण्यात जी गुर्मी वाटते ना ती वाईफ किंवा पत्नी म्हणून
घेण्यात मला तरी वाटत नाही... बघा पटलं तर..
मानसीने पेशन्टला बघितलं आणि सर्वात आधी विचारलं, ह्यांच्यासोबत
कोन आहे, सर्व नातेवाईकांमधून
एक साधीशी स्त्री समोर आली आणि म्हणाली,
“मॅडम,
मी, मी बायको
आहे त्यांची.”
मानसी स्मित हसली, आणि
मग तिला तिच्या नवऱ्याच्या सर्व औषधी समजावत होती. मानसीची हॉस्पिटलची शिफ्ट संपली
आणि ती घरी निघाली होती पण तिच्या मनातून त्या बाईचं हे वाक्य जाताच नव्हतं “मी बायको आहे त्यांची” त्या स्त्रीचा चेहरा
तिला फक्त तिच्या शब्दांमुळे आठवत होता, साधीशी, गरीब आणि शांत असणाऱ्या
त्या बाईचा फक्त एका शब्दाने प्रभाव पडला होता, सोबत एवढे लोकं असतांनाही
सगळे कसे बाजूला झाले होते, तो शब्द होता मी
बायको आहे त्यांची.
मानसी, एक उत्तम डॉक्टर, बायको, आई आणि सून ह्या
सर्व जवाबदाऱ्या सांभाळत होती. घरी पोहचली तेव्हा तिला कळलं कि सासऱ्यांची बर नाही ते, त्यांना ताप होता. ती तशीच त्याच्या
खोलीत शिरली. सगळं तिचं डॉक्टरी सामान काढून त्याना चेक करायला लागली, मग म्हणाली,
"बाबा बीपी खुप आहे. मी लगेच बाहेर जावून मेडिसिन घेवून येते, तुमच्या
मेडिसिन बदलायच्या होत्या मला."
मग सासूला म्हणाली, "आई, मी बाबाना भात बंदच
म्हटलं होत ना, शुगर जरा जास्तच झालाय."
सासू, "तुला काय वाटतं मी खाऊ दिला असेल? बायको आहे मी त्याची,
रग रग
ओळखते मी त्यांचा, गेले होते ना त्या साखरपुड्याच्या समारंभात माझ्याशिवाय चांगले
गुलाबजाम खाल्ले असणार आणि सॉफ्ट ड्रिंक्स तर वीक पॉईंट आहे साहेबांचा. घरी आपण सगळं
बंद म्हणून, आपण सर्वानी ह्यांच्यासाठी
पथ्य पाळायची आणि हे असलं काही करून आपला अजून ताप वाढवणार. तुझ्या असल्या डॉक्टरी
इलाजाने हे काही बरे होणार नाहीत ह्यांचे इलाज मलाच माहित आहे... फुकटच एवढे वर्ष घालवली
नाहीत! सावलीसारखं मागे
राहवं लागणार.”
सासूबाईंच्या डोळ्यात बोलतांना जरा पाणी आलं पण ते त्यांनी वाहू दिलच
नव्हतं. उलट बायकोच्या तोऱ्याने त्या मानसीला परत म्हणाल्या, “माझ्या पेक्षा जास्त
कोन ओळखणार त्यानां, बायको आहे मी त्यांची, तू हो
बाजूला, कर काय करायचं ते मी चालली कडुनिंबाची कोवळी पान तोडायला, चांगली
चटणी बनवून भरवते, बघते कशी खात नाहीत ते, हो बाजूला ठेव आपल्याजवळ ते ओषधीच पुराण.”
मानसी, एका बायकोच्या अधिकाराला घाबरून दरवाज्याला टेकून उभी राहिली आणि सासूबाई
खोलीतून पोटतिडकीने बाहेर गेल्या. मानसी
सासऱ्यांना म्हणाली, “बाबा
काही खरं नाही तुमचं आता, तुम्हाला कडू निंबाच्या पाल्याची चटणी खावी
लागणारच.”
सासरे मिश्कीलपणे
म्हणाले,” बायको नावाच्या आजाराला काही औषध नाही का? किती वर्षाचा मागे
लागला आहे. सुटतच नाही, सारखं
आपलं जेव्हा तेव्हा उठून उभं असतं. सारखी वचक.”
मानसी हसतच, “बाबा.. आईने ऐकल् ना तर..
आणि काय हो, मीही
बायको आहे तुमच्या मुलाची.” आणि
मग मानसी बाहेर औषधी घेण्यासाठी निघून गेली.
महिना झाला होता आणि सासरेही बरे होते आता, घरात दोन बायका आणि
सासू सून नेहमीसारख्याच वागत होत्या. हे नातंच असं असतं कि त्याच शेपूट सिध होत नाही.
कमी जास्त होतच राहतं.
श्रीकांत त्या दिवशी ऑफिस मधून घरी आला तेव्हा मानसी यायचीच होती. तो
घरी आला आणि सारखं डोकं दुखतंय असं म्हणू लागला. मानसी घरी आली तेव्हा आई श्रीकांतला
आल्याचा चहा देत होत्या. मानसीने येताच दारातून तो कप
आधी खाली ठेवायला सांगितला. त्यावर सासू म्हणाल्या, “हे काय, त्याला बरं वाटेल
ना आल्याचा चहा घेतल्याने. आणि आवडतो त्याला माझ्या हातचा. माझं मुलगा आहे मला माहित
आहे त्याला काय होत ते, तू त्याला चहा देत नाहीस ना. चांगला आले विलायचीचा चहा घेतला कि बरं वाटेल
त्याला.”
मानसी मात्र टक
लावून श्रीकांत कडे बघत होती आणि तो गुमान होता. सासूबाई मग श्रीकांतला आग्रह
करत म्हणाल्या, “घे रे,
तिला
काय भीतोस, मी म्हणतेंना, बघ तुला लगेच बरं वाटेल. माझं डोकं दुखलं
कि मी हाच चहा पिते, अराम वाटतो. जेव्हा तेव्हा औषधी बरी नसते. अशीच आई नाही झाले मी.”
आता मानसीच्या हातात गोष्ट आली होती, आणि तिला महिन्या
भराआधीची सासूबाईंची गोष्ट आठवली, आणि ती म्हणाली, “आई मी बायको आहे त्यांची, ऍसिडिटीचा
त्रास आहे त्याला. चहा दिला तर आणखीनच वाढेल. डोकंही त्यानेच दुखत असेल. लागलीच औषध
देणार नाहीच मी. तुम्ही व्हा बाजूला,
मी बघते.”
मग तिने श्रीकांत साठी आणलेला
चहाचा कप स्वतःसाठी उचलत म्हटलं, “आणि चहाही पिऊ देणार नाही.”
तिने चहाचा एक सिप घेतला आणि म्हणाली, “आहा, काय मस्त चहा केलाय
आई.”
आज पाहियल्यांदा तिला बायको या पदाचा आनंद वाटत होता. नवऱ्याला आईच्या
हातचा चहा पिऊ दिला नव्हता आणि सासू काहीच म्हणू शकत नव्हती त्या तिच्या उत्तरावर कि
“मी बायको आहे त्यांची.”
बायको, सर्वात शक्तिशाली पात्र आहे संसाररूपी नाटकातील.
बायको असते तेव्हाच संसारातली सारीच पात्र नावा रूपास येतात. तीच असणंच अस्तित्त्व असत
नवऱ्याचं. बायको पेक्षा जास्त कुणीच नवऱ्याला जपू शकत नाही.. आणि हे सांगायला
बायकोला कुठलीही सिद्धता करण्याची गरज नाही .. कारण मी बायको आहे त्यांची हे वाक्यच खूप
वजनदार असत...
कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या नवीन कथेसाथी मला फब ला लाइक नक्की करा.
©उर्मिला
देवेन
धन्यवाद!!
लेख आवडला असेल तर
माझ्या नवीन लेखासाठी मला इथे like किंवा फॉलो करा https://www.facebook.com/manatlyatalyat/
जोडीदार ह्या कथेचा पुढचा भाग प्रकाशित झाला आहे निक्की बघा ... मराठीचा पहिलं प्रयोग - दीर्घ कथा मालिका
0 Comments