जेव्हा ex परत येतो...भाग ३

 


पहिला भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/09/ex.html

दुसरा भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/09/ex-2.html

जेव्हा ex परत येतो...भाग ३

अरुंधतीने ती रात्र अमितच्या आठवणीत काढली. अश्रू गाळणार नाही असं वचन तर तिने अमितला दिलंच होतं. पण आता उरलेलं आयुष्य त्याच्या आठवणीत आणि त्याच्या आणि तिच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी केलं होतं.

अर्थला तिच्यासारखं सर्जन व्हायचं आहे, आणि अवनीतर पिढीजात गुण आताच आला होता, अवध्या चार वर्षात ती घरात छोट्या छोट्या रायीम तयार करत घरात गोंधळ घालत असायची. आजोबा आणि तिची गट्टी होती. आता ह्या क्षणाला अरुंधती अवनीची गोष्ट येवून गदकण हसली. समोर ठेवलेल्या अमितच्या फोटोला बघत अमितच्या आठवणीत तिचा डोळा लागला. 

सकाळी अनवी तिला उठवायला आली, "म्हणाली लेझी मेरी विल यु गेट अप ..."

 मागेच अरुंधतीची सासूहि खोलीत शिरली, म्हणाली, "अरुंधती, आज हॉस्पिटला जायचं नाही का ग. वेळ होईल तुला." बोलताना त्यांनी तिच्या डोक्याला अलगत हात लावला, "अग बाई अंग तापलंय का ग,"

अहो, इकडे या बर," ती जोरात ओरडली"

अरुंधती उठली, "आई काही झालेलं नाही, जरा उशिरा झोपले मी... आता अंघोळ केली कि बर वाटेल. आज काही स्रजरी आहेत, जायचं आहे मला."

सासरेही खोलीत पोहचले होते, अर्थही आला होता, म्हणाला, “मम्मा तो कालचा पेशन्ट बरा आहे का ग? माहित झालय का कोण आहे म्हणून ?”

सासरे, अरे हो, बुवा आमची अरुंधती तर काल हिरो होती FB  आणि इन्स्टा वर, काय ग झालं त्या पेशन्टच?”

“काही नाही हो बाबा, दारू पिऊन ऍक्सीडेन्ट झालेला, काय सहानुभूती त्याच्यासाठी, कशाला प्यायची एवढी.” 

बोलतांना सासऱ्यांची नजर टेबलावरच्या फोटोवर पडली, अरे हा तुझा फोटो ना, तुझ्या सारखाच दिसतोय, खूप जुना वाटतोय, आपल्या कडे नाही हा... हू म्म्म .. अमितच्या कलेक्शन मधेही नाही.. “

अरुंधतीने तो धरला आणि टेबलच्या ड्रॉवर मध्ये टाकला, जुना आहे बाबा... जाऊद्या ना, मी तयार होते, आई काय करायचं आहे आज सांगा, पटकन करून निघते मी... आणि आज हॉस्पिटलला यायचं आहे तुम्हाला, चेकअप आहे ना?”

“अग बघू दे, आम्हाला, कशी दिसायची तू ते”  बाबा तिला थांबवत म्हणाले. तोच अवनी ने तो ड्रॉवर मधून काढला आणि अर्थ सोबत घेऊन खोलीतून निघून गेली.

“अवनी, बेटा ... अग तो मला परत करायचा आहे, दे बाळा...” अरुंधती तिच्या मागेच गेली. पण अवनी पाळली होती.

अरुंधतीने सर्वांचा नाश्ता लावला, आणि सर्वांनासोबत बसली, तर बाबा तिला हळूच म्हणाले, त्या पेशन्टच नाव, माधव पंडित ना?”

अरुंधती ब्रेड खाता खाता थांबली, म्हणाली, “हो... माधव पंडित.”

“अग, हि बघ न्यूज आली आहे पेपरला... मुंबई चे प्रसिद्ध बिजनेस मॅन ऍक्सीडेन्ट मध्ये जखमी म्हणून...”

“हम्म.. हो आहेत ते.. आता तेवढं माहित नाही मला.”

माधवच नावं घेताच सासूही टेबलवर येवून बसली. जरा वेळ शांतता होती सर्वांमध्ये. नंतर अर्थ आणि अनवी त्याच्या खोलीत शाळेसाठी तयार व्हायला निघून गेले. आणि बाबा अरुंधतीला म्हणाले, “अरुंधती तो फोटो त्याच्या कडून मिळाला काय ग?”

“हो बाबा, पोलिसांना त्याच्या बॅग मध्ये मिळाला, ते शुद्धीवर यायचे होते तेव्हा पोलिसांनी माझ्याकडे चौकशी केली होती पण मलाही फारसं काही माहित नव्हतं. मलाही अचानक समजलं सांर कि तो माधव आहे म्हणून.”

“मग बोलणं झालं का त्याच्याशी “

“काही खास नाही, बसं पेशंट ह्या नात्याने बोलले ना... अजून काय.”

“तसं नाही ग, बोल की.... काही हरकत नाही आमची, आम्ही काय तुला ओळखत नाही.?”

“बाबा आई, तुम्ही आहात ना माझ्या सोबत मग मला काही काही गरज नाही. काळजी करू नका. आई दोन वाजेपर्यंत या तुम्ही, माझ्या दोन सर्जरी आहेत एक वाजेपर्यंत. मला निघायचं आहे, मी सोडते अर्थला शाळेत. आई तुम्ही अवनीला सोडा.”

अरुंधती उठली आणि तयारी करून अर्थ घेवून निघून गेली. आई बाबा परत घरात एकटे होते. दोघांच्याही  मनात विचार शिरला होता पण विषय निघत नव्हता. शेवटी बाबाने पेपर हातात घेत आईला म्हटलं, “तू नको ना काळजी करू, अरुंधती भक्कम आहे. अजूनही खूप प्रेम आहे तिचं अमितवर.”

“हो, पण अमित हयात नाही... आणि तो परत आलाय... तोही आताचं... आता कुठे अरुंधती सावरली. सगळा पसारा तिने हाती घेतला, मला भिती ह्याची नाही कि माधव तिला भेटला...”

मग कसली ग?

“आपल्या अरुंधतीला त्रास होवू नये हो, काय योगायोग आहे? आता तो हिच्याचं हॉस्पिटल मध्ये कशाला यायला हवा होता, शहरात काय हॉस्पिटलची कमी आहे का? आणि हिनेच तिकडे पाठवला म्हणे काल, हिलाच भेटायचा होता?“

“जावूदे, परमेश्वराची जशी मर्जी ग, आपण काय करू शकतो, एवढा सोन्या सारखा मुलगा आपण अॅक्सिडेंट मध्ये गमावला. अरुंधती वाचली म्हणून आपले नातू पोरके झाले नाहीत. पण तिनेही मोठ्या हिमतीने स्वतःला उभं केलंय ना अमितच्या मागून. त्या दिवशी तिने काय गमावलय आपल्याला माहित आहे. तिच्या नशिबात आता अजून काही सुखं असेल तर... शेवटी तिची जशी इच्छा... आपण तिच्या सोबत राहायचं.”

“अहो काय बोलता तुम्ही... अनवीच ठीक आहे पण अर्थ तिचा पोटचा नाही...”

“सुमन.... आलंच कसं तुझ्या तोंडात हे... तिने कधी म्हटल का असं? मला कधी जाणवलं नाही... परत हे घरात बोलता कामा नये.”

“अहो पण सत्य आहे ते... आणि आता तो तिच्या आयुष्यात आला तर हो काय...”

“काही ही होणार नाही....

“बघू... प्रतेकाच्या प्रेमाची कसोटी आहे समज...” बाबा उठले आणि त्याच्या खोलीकडे निघाले. आईने घर आवरून अवनीला शाळेत सोडलं. तयारी केली हॉस्पिटलला जाण्याची, ती परत खोलीत येवून म्हणाली, “अहो ऐकाना, तुम्ही पण सोबत या, मला बाई हुरहूर वाटत आहे.”

“अग पण मी अवनीला घ्यायला जाईल ना? तिची काय शाळा दोन तासाची तर असते. आणि तू कशाला येवढ्या लवकर जातेस, थांब ना, येऊदे अवनीला, सोबतच जावू या.”

इकडे माधव घारीसारखी अरुंधतीची वाट बघत होता. सकाळपासून त्याच काहीदा स्टाफला विचारून झालं होतं. पण अरुंधती त्या वार्डात आलीच नव्हती. कुणी त्याला सांगत होतं कि मॅडम सकाळपासून सर्जरीत बिझी आहेत तर कुणी म्हणत होतं त्या ह्या वार्डात आज येणारं नाहीत. नर्स त्याला खोलीतून निघुही देत नव्हती.

शेवटी त्याने नायलाजाने स्वतःच्या सलाईन नकळत काढून फेकल्या. त्याला अस्वस्थ वाटत होतं आणि मग डॉ राणे ला तातडीने बोलवण्यात आलं.

तिने त्याला तपासलं, काही औषधी बदलल्या आणि सूचना देत होती तोच माधवने तिचा हात पकडला, “अरु मी चुकलो ग, नकोना मला सोडून जावू तू. आपण परत एकत्र येवूया. आपल्या प्रेमाचा गुलमोहर परत फुलवूया....”

“मिस्टर पंडित, तुम्ही डॉ राणेशी बोलत आहात, मी तुमची अरु नाही, काहीतरी चुकतंय.”

“काहीतरी चुकलय हे नक्की त्यासाठी मी तुझा अपराधी आहे ग, पण आता नाही. “

अरुंधती, रिपोर्ट मार्क करत होती, ती नर्सला म्हणाली, “ह्याच्या घरचं कुणी आलय का? असेल तर माझ्या कॅबीन मध्ये पाठवा. मी ह्यांच्या काही औषधी बदलल्या आहेत लगेच बोलवा. आणि आधी ह्याचे सर्व रिपोर्ट मला पाठवा, मी बघते काही गंभीर जखमा आहेत काय ते. नसतील तर ह्याच्या डिस्चार्जची तयारी लगेच करूया.”

माधव, “काही जखमा कधीच बऱ्या करायच्या नसतात काय ग? का अशी विरळ वागतेस तू...?”  

आता मात्र अरुंधतीने नर्सला जायला सांगितलं, समोरची खुर्ची ओढली, “काय म्हणणं आहे मिस्टर पंडित आपलं....”

“अग, आपण सगळं विसरून परत एकत्र येवूया ना... “

त्याने काय होईल

मला माहित आहे आता ते राणे जगात नाहीत.

पण मी आहे ना, त्याची बायको.... हुम्म बरीच माहिती गोळा केलेली दिसते.

अग पण तू किती दिसव असं दुसऱ्यांच करत राहशील... मला आता तू हवी आहेस. अरु विसर सांर.तुझ्या वीणा मी काहीही नाही ग. थकलोय आता, स्वतः पासून पळत होतो आणि तू समोर आलीस, ह्यात काही तरी त्या परमेश्वराचा इशारा असेल...

दुसऱ्यांच, माझा नवरा होता तो, आहे. आणि अंतिम क्षणा पर्यंत राहिलं.... इशारे कधीपासून तू ओळखायला लागलास... तब्बल दोन वर्ष वाट पहिली मी, तुझ्या परतीची...पण?”

तेवढ्यात नर्स अवनीला घेवून आली.... “मॅडम अवनी कॅबीनमध्ये थांबायला तयार नव्हती. तुम्हाला शोधात आली ही इकडे.”

“बऱ, आई बाबा आलेत का?”

“हो मॅडम, आपल्या आई चेकअप साठी गेल्यात आणि बाबा ते त्या पेशंट वार्ड मध्ये गेलेत कविता घेवून. मी हिला बघत होते पण ही काही थांबेना.”

अवनी पटपट खोलीतलं सामान बघू लागली, लगेच म्हणाली, “अंकलं, तुम्हाला किती इंजेक्शन दिलेत मम्माने, इ... दुखत असेल ना.”

माधव तिला बघून गोड हसला, म्हणाला, “तुझ्या माम्माने मला काहीच त्रास दिला नाही.”

“अरु तुझी मुलगी आहे का ग...”

“हो माझी आणि अमितची, मला मोठा मुलगा ही आहे, अर्थ, दहा वर्षाचा. माझं मोठं घर आहे, आणि सगळी लोकं माझी आहेत, ह्या हॉस्पिटलची ३०% मालकीण आहे मी.” 

आणि ती अवनीला घेवून निघून गेली. माधव अजूनही शून्यात बघत राहिला. पण त्याला तिच्याशी बोलायचं होतं.... पण अवनीसमोर नको म्हणून तोही गप्प झाला होता. त्याची घुसमट त्याला खात होती. पण बैचेन झालं होतं. अरुंधतीला सोडून तो तिथेच राहिला पण अरुंधती खूप पुढे निघून गेली होती, 

“अरु वेळ झाला ग मला यायला, पण हा काही तर संकेत असेल, तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला मी, दूर पळत राहिलो, माफी मागायची हिंमत झाली नाही आणि आज तुझ्या समोर आलो तर... तू माझी राहिली नाही... हे कसं मान्य करू मी... नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे.”

माधव घूसमटत रहिला आणि अरुंधती शांत त्याच्या समोरून निघून गेली.

पुढची कथा नक्की वाचा.... लवकरच पेजवर...


जोडीदार कथेचा पुढचा भाग इथे बघा ...आणि जोडीदार कथेच पुढचं पर्व लवकर पेजवर येतंय ...तेव्हा stay connect ...https://www.facebook.com/manatlyatalyat

 



पुढचा भाग पेजवर लवकरच..... तेव्हा स्टे connect टू मनातल्या तळ्यात. कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजलाही लाईक करू शकता.

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!

फोटो साभार in.pinterest.

Post a Comment

5 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)