अंतिम भाग - द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!

  भाग 5 - द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!


भाग १- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!

भाग २ भाग २- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!

भाग  ३- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!

भाग 4 भाग 4 -द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!


भाग ५

कुणाल ठरल्याप्रमाणे आकृतीकडे पोहोचला होता. सोबत आकृतीसाठी तिच्या आवडती वाईन घेऊन गेलेला. सुरवातीच्या प्रत्येक गप्पांमध्ये दोघेही रमले होते. कॉलेजच्या आठवणी, जुन्या ओळखी, व्यवसायाच्या गप्पा... वातावरण अगदी सहज वाटत होतं. दोघांनी एक नवीन डिझाईनचं ब्रासलेट फाईनल केलं. पण कुणालच्या मनात मात्र वेगळंच गणित सुरू होतं. तो अधूनमधून आकृतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. कधी बोलता बोलता तिच्या कमरेजवळ हात नेण्याचा प्रयत्न, तर कधी मुद्दाम तिच्या हाताला स्पर्श... पण आकृती प्रत्येक वेळी सहजपणे बाजूला होत होती. अनिकेशची वाट बघून आता आकृती थकली होती. जरा चौकशी करावी म्हणून ती अनिकेशला कॉल करायला तिच्या खोलीत गेली.

तिला खोलीत जाताना बघून कुणालने विचार केला आणि स्वतःलाच म्हणाला, "ही काही हाती लागायची नाही अशी..." आणि मग त्याने तिच्या वाईनच्या ग्लासमध्ये गुंगीच औषध टाकलं. आकृती परत आली, “काय रे कुणाल, हा काही बोलला होता का किती वाजता येणार ते? त्याचा काही फोन लागत नाही आहे.”

“अ... हा... अगं तो उशिरा येईल असं बोलला होता आणि मला जोर देऊन म्हणाला होता की मी इकडेच थांबावं तो येईपर्यंत... ट्रांव्लिंगमध्ये असेल. तो करेल ना तुला फोन.”

तिने नुसतीच मान हलवली आणि येऊन तिचा पेग उचलला. बोलता-बोलता तिने तोही संपवला. काही वेळाने ती म्हणाली, “तू बस इथे. मी स्टडी रूममध्ये आहे. काही लागलं तर सांग.”

कुणालने मान हलवत आपला लॅपटॉप बाहेर काढला. आणि तिच्या प्रतीक्षेत कामाला लागला. काही पावलं पुढे जाताच ती अचानक थांबली, जरा काही क्षणातच गरगरल्या सारखं झालं. त्या क्षणी आकृतीला काहीच नीट जाणवत नव्हतं. डोकं जड झालं होतं. कुणालने समोर जाऊन सांभाळत अगदीच तिला उचललं आणि खोलीत जायला लागला, तोच आकृतीचा तोल गेला. अनिकेश तिला अशाच प्रकारे कधी कधी उचलून खोलीत घेऊन जायचा. क्षणभर तिला कुणालच्या आधारातही अनिकेशचीच जाणीव झाली. आणि नकळत तिने स्वत:ला त्याच्या स्वाधीन केलं होतं. पण पुढच्याच क्षणी कुणालच्या तोंडून शब्द बाहेर पडले, भारी आहेस यार तू... कसं सहन करतोय अनिकेश तुला! पण अनिकेशला सवय आहे तुझी... कणिकाचे तर हाल होतील...” तो शब्द आकृतीच्या कानावर पडला. अर्ध्या गुंगीतही तिच्या मनाने तो शब्द पकडला. कणिका...?”

तिने कसाबसा डोळे उघडले, कणिका कशी आली मध्ये?” कुणाल थबकला... तिने कुणालच्या पाठमोऱ्या शरीराला वळवलं...  आकृतीने त्याच्याकडे नीट पाहण्याचा प्रयत्न केला. गरगरणाऱ्या नजरेतून त्याचा चेहरा हळूहळू स्पष्ट झाला. मनात जणू वीज कडकडाळली... कुणाल...?”

तिने स्वतःला सावरत ताडकन उभं राहण्याचा प्रयत्न केला. शरीर अजूनही साथ देत नव्हतं, पण डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं होतं. तिने खोलीकडे पाहिलं, मग कुणालकडे आणि परत स्वतःकडे... समोरची बेडशीट उचलत तिने प्रश्न केला, तू... माझ्या बेडरूममध्ये? अनिकेश कुठे आहे? तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची?”

आकृतीच्या डोळ्यात राग होता. जरा कुणालही तिच्या ह्या रुपाला घाबरला होता. तो जरा सावरासराव करू लागला.

अनिकेशला कळलं ना... तर जागीच मारेल तुला!”

बोलता बोलता जरा थांबली... तिच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू संशयात बदलला. ती कुणालकडे रोखून पाहत म्हणाली, “एक मिनिट.... त्याला माहित आहे?”

आकृतीच्या मनात आतापर्यंत वेगवेगळ्या दिशांनी पळणारे विचार एका बिंदूवर येऊन थांबले... तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. कुणालच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात हरवलं, तो तिला शांत करत म्हणाला, "अग शांत हो, अनिकेश कणिकासोबत आहे, हो त्याला माहित आहे, की तू आज माझ्यासोबत असणार आहे."

जवळ असणाऱ्या घडीवर आकृतीच लक्ष गेलं. रात्रीचे जवळपास बारा वाजले होते. आपण काहीतरी विचित्र वागलोय ह्याचा अंदाच तिला आला होता. स्वतःच्या मनाला तिने घट्ट केलं. डोळ्यांसमोरचं धूसरपण झटकत ती कुणालकडे रोखून पाहू लागली. तिच्या त्या आवाजात गुंगी नव्हती. तिने स्पष्ट प्रश्न केला, “तुम्ही वाइफ स्वॅपिंग केलंय ना? तेही ह्या मार्गाने... थांब... की कणिकाला  माहित आहे?"

कुणालने नजर चोरली, हळूच म्हणाला, "आता आहे ना तुझी रजामंदी... कणीकाला अनिकेश बघून घेईल." असं म्हणत  तो आकृतीच्या जवळ सरकला आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागला. आकृतीने स्वतःला आवरत दूर केलं त्याला. तिच्या सर्व लक्षात येत होतं. कणीका आठवत होती. कणिकाचा हसरा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर येत होता.  साधी, मनमोकळी गावातली मुलगी आणि हे अनपेक्षित कसं सहन करणार ह्या विचारात तिच्या काळजात कालवाकलाव झाली. अनिकेशच आतापर्यंतच बोलणं कानात घुमत होतं. आकृतीने डोळे मिटले आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. तिने स्वतःचा विस्कटलेला अवतार कुणालच्या सोमोरच बिनधास्त नीट केला. चेहऱ्यावरचे भाव आवरले. कुणालला काहीच संशय येऊ नये, याची तिने काळजी घेतली. सोडणार तर नव्हतीच त्याला ती. मनात धगधगनाऱ्या ज्वालामुखीला क्षणात तसच तप्त ठेवत तिने लागलीच होणाऱ्या उद्रेकाला शांत केलं. आता तिला सत्य हवं होतं, कणिकाबद्दल जाणून घायचं होतं. ती नुसती मिश्कील हसली... आणि हसून तिने कपाट उघडलं. आतली रमची बाटली बाहेर काढली.  तिला बऱ्यापैकी माहित होतं कुणालला रम लवकर चढते... त्याच्याकडे मधाळ बघत तिने दोन ग्लास भरले... कुणालच्या मनातला ताण हळूहळू कमी होत गेला. कुणालची जीभ सैल होत आहे असं बघून तने त्याला हळूच म्हणाली, “कणिका कुठे आहे रे?”

“ती... ऑफिसमधेच असणार बहुतेक... तुझा नवरा यार मानायला तयार नव्हता... टेंडरचा विषय होता ना गं...”

“म्हणजे तुमचं सगळं हे ठरलं होतं तर...”

“हो म्हणजे... अनिकेशचं.... माझं... कणिका तर मॉडेलिंगचं भूत शिरलं होतं... ती तयार झाली जायला...”

कुणाल नशेच्या भरात बडबडत सगळे पत्ते उघडत होता... आकृती तिचं तिचं सगळं समजून घेत होती.  काही वेळातच कुणाल नशेत बिनधास्त झोपून गेला. पण आकृती मात्र पूर्ण जागी झाली होती... अनिकेशने केलेला विश्वासघात आणि कुणालचं असं मैत्रीत वागणं तिला तिला पटलेलं नव्हतं. रागात तिने ग्लास फोडला... आणि मनाला शांत करत तिने त्याचा मोबाईल हातात घेतला आणि सर्वप्रथम कणिकाचा नंबर शोधला. कॉल लावला... एकदा... दोनदा.. मग तिसऱ्यांदा... पण कणिका फोन उचलत नव्हती. मग आकृतीने अनिकेशला फोन लावला... रिंग वाजत राहिली, कुणीच फोन उचलत नव्हतं.

आकृतीच मन वेगासारख विचारात धावत होतं. काय झाल असेल ह्या विचारात ती कासावीस झाली होती. कणीकाच्या जराश्या भेटीतून तिलाही कळलं होतं की ती जरा स्वभावाने तिखट मुलगी आहे,  स्वतःचं काही चुकलं ह्याची जाणींव तिला तोडू शकते. हा प्रकार तिला धक्कादायक असणारा आहे.. काही जीवाच केलं  तर तिने ह्या विचाराने काळजात धस्स झालं. तिने पुन्हा कणिकाचा नंबर लावला. उत्तर आलं नाही. फोन हातात घट्ट पकडला आणि उठली... कुणाल मात्र काहीच न कळल्यासारखा झोपला होता. आकृतीने त्याच्याकडे पाहिलं आणि  ती रागात  तडक ऑफिससाठी निघाली.

ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा संपूर्ण परिसर शांत होता. कॉरिडॉरमध्ये फक्त मंद दिवे लागले होते आणि तिच्या पावलांचा आवाजच त्या शांततेला भेदत होता. तिने कानोसा घेत अंदाच घेण्याचा प्रयत्न केला पण काहीच कळत नव्हतं. कुणाचाही कसला आवाज नव्हत. आता तिने कणिकाला हाक मारली. पण प्रतिउत्तर आलं नाही. मग अनिकेशला... पण फक्त तिचा आवाज घुमत राहिला... तिची नजर हळूहळू अनिकेशच्या कॅबिनच्या दाराकडे गेली. पर्समधून किल्ली काढली. सावधपणे दार ढकललं... आत पाऊल टाकताच ती जागच्या जागी थबकली. समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

अनिकेश रक्ताच्या थारोळ्यात निश्चल पडला होता आणि काही अंतरावर कणिका शून्यात नजर लावून बसली होती. तिच्या हातात विस्कीची रक्ताळलेली बाटली होती. चेहरा... डोळे पूर्णपणे हरवलेले. आकृती किंकाळीच.... अनिकेशला असं बघून ती पार कोसळली होती... कणिकाची नजर हळूहळू तिच्याकडे वळली. आणि तिला पाहताच तिच्या आत साठून राहिलेला सगळा बांध फुटला. ती हमसून हमसून रडू लागली. आकृती अजूनही स्तब्ध होती... सारं काही त्या कॅबिनमध्ये बघून तिच्या सगळं लक्षात आलं होतं... अनिकेशने विश्वासाची सीमा लांघली होती... त्याला असं समोर मेलेलं बघूनही आता तिचे अश्रू आटले होते... प्रेमावर लाज वाटत होती. विश्वासाची सीमा ओलांडली की प्रेमालाही श्वास घेता येत नाही… असचं काही तिच्यासोबत घडलं होतं, अनिकेशसोबत तिचं त्याच्यावरचं अतोनात प्रेमही रक्ताच्या थारोळ्यात पडून होतं... ज्याला पाहताच कधीकाळी त्याच्या कवेत शिरून रडावंसं वाटायचं, त्याच्याकडे आज जवळ जाण्याची इच्छाही तिच्या मनात उरली नव्हती.

प्रेमाच्या जागी घृणेने घेतली होती. आठवणींच्या जागी किळस उभी राहिली होती... ती किंचाळत राहिली...आणि तिला असं बघून कणिका पूर्ण तुटली होती... अर्धा तास आकृती तशीच राहिली.... शांत झाली... भानावर आली आणि आता रडणे नाही असं ठरवत होती, तोच तिला कणिकाचे हुंदके ऐकायला आले.  तिचं असं रडणंही तिला सहन होतं नव्हतं... ती धावत तिच्याजवळ गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. क्षणभर दोघींनाही काही बोलता आलं नाही. दोघीही रडत होत्या. पण आकृतीचे फक्त अश्रू वाहत होते ती मात्र कठोर होत चालली होती.

काही वेळाने आकृतीने स्वतःला सावरलं, कणिकाचा विस्कटलेला अवतार पाहून आकृतीच्या मनात पुन्हा एकदा वेदना उसळली. काय घडलं असेल आणि काय ह्या माणसाने केलं असेल ह्या कल्पनेत तिने मनाला घट्ट केलं,  तिने तिचे केस नीट करत म्हणाली, कणिका... आधी स्वतःला सावर.” आणि तिच्या हातातून विस्कीची बॉटल निट पुसून बाजूला केली.

आकृतीने स्वतः चे अश्रू पुसले आणि म्हणाली" स्वॅपिंग काय असतं... ते आपण सांगू ह्या माणसांना. साले आयुष्यभर परत असं काही करण्याची हिंमत करणार नाहीत.”

तिच्या प्रत्येक शब्दात धग होती. कणिका मात्र अजूनही हरवलेली होती. आकृती अनिकेशकडे पाहिलं,   “अनिकेश तर संपला...  जिवंत असता तर अजुनीही कही कणीका स्वाह झाल्या असत्या. विश्वासघाताची चव लागली की माणूस काही केल्या सुधारत नाही... आणि मी स्वतःच्या नजरेत कितीदा मेले असते, कोण जाणे.”

कणिका तिच्याकडे बघत होती पण अजूनही थरथर कपात होती, आकृतीने तिचा हात घट्ट धरला, “तू घाबरू नको.. तू काहीच केलं नाहीस.... समज... स्वॅपिंग आपण केलंय... आणि रडू नकोस. अश्रू जपून ठेव .. ढोंग करायला लागतील, फसवलंय ना तुला मला ह्यांनी, आपल्या विश्वासाशी खेळलेत. फसवणूक कशी असते ते आपण सांगू..."

------- 

काही तसाआधी...  

कानिका... अनिकेश तिच्यावर हसत होता, तेव्हा ती संतप्त ज्वालामुखीसारखी आतून धगधगत बसली होती. आणि शेजारच्या बंगल्यातलं  लग्न लग्न अखेर संपलं होतं. मंगलाष्टकांचे स्वर थांबले होते. सप्तपदीची वचने पूर्ण झाली होती... आणि कणीकाच्या मनातील तिच्या स्वतःच्या लग्नाची बंधनं मात्र त्याच क्षणी तुटून पडली होती. अनिकेश खूप काही जिंकल्या सरखा ड्रिंक्स वर ड्रिंक्स घेत हसत तिला पाहत होता. त्याचं ते पाहणं आणि ते हसू... त्या क्षणी कणिकाच्या मनातला शेवटचा बांधही फुटला. ती उठली, टेबलावरची विस्कीची बाटली संतापाने फोडली आणि पुढच्याच क्षणी अनिकेशच्या पोटात पूर्ण ताकतीने भोसकली होती.  काही क्षणात सगळं घडलं... तो मदतीसाठी तडफडत नि:शब्द झाला आणि कणीका त्याला संपवून स्वतःसाठी  निरूत्तर झाली होती....

कणीकाचा कुणालवरचा राग अधिकच तप्प्त झाला होता. पण आता आकृतीला बघताच तिच्या अश्रुनी वाट मोकळी केली होती. नकळत तिच्या पायावर डोकं ठेवलं होतं तिने. आकृतीची माफी मागत परत ओक्साबोक्शी रडत होती. आकृती... मला माफ कर... मी... मी काय केलं हे मलाच कळत नाहीये...”

कणिकाने तिला अलगद उठवलं, “माफी मागू नको... तुझी चूक आहे, हे मी मान्य करणार नाहीच... तू जे केलं ते त्या वेळेवर झालेलं कृत्य आहे तुझ्याकडून... पण ह्यांनी जे केलं ते पूर्ण तयारीने केलं आहे. आणि त्याला क्षमा नाही.”

आकृतीने कणीकाला अनिकेश पासून दूर करत सगळं तिला समजावून सांगितलं आणि तिचंही ऐकून घेतलं. तिला धीर देत तिच्या त्या ग्लानितून बाहेर काढलं, “हे बघ आता जे घडलं ते बदलू शकत नाही, पण ह्यातून बाहेर कसं निघायचं हे मी बघते. तू इथे सांभाळ सगळं. मी आलेच कुणालला घेऊन.”

आकृती घरी पोहोचली तेव्हा कुणाल अजूनही गाढ झोपेत होता. दारूच्या नशेने त्याला काहीच भान उरलं नव्हतं. त्याच्या त्याच अवस्थेत त्याच्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावून तिने कुणालला शुद्धीवर येण्याची संधी न देता त्याला बेशुद्ध केलं आणि गाडीत बसवून थेट ऑफिसच्या दिशेने निघाली. रस्ताभर तिचे हात स्टेअरिंगवर घट्ट होते. मनात हजारो विचारांची गर्दी होती. मन घाबरत होतं पण खंबीरही होतं. आपण जे करतो आहे तेच योग्य आहे ह्या विचारावर ती घट्ट होती. मोठ्या हुशारीने तिने कुणाला कॉरिडॉरमधून कॅबीन पर्यंत आणलं. ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत कणिका सावरली होती. अनिकेशभोवती असलेले जे काही पुरावे तिच्या हातून नष्ट होऊ शकतील, ते तिने शक्य तितके बाजूला केले होते. आता तिथे उरला होता तो फक्त त्या रात्रीचा काळा ठसा... जो तिच्या मनात उरला होता.

कुणालला पाहताच कणिकाच्या डोळ्यांत अचानक एक वेगळीच आग पेटली. ती बेभान झाली... “आकृती, मला माफ कर मी नाही सांभाळू शकत स्वतःला, ह्याने विश्वश्घात केलाय माझा... ह्याला संपवायला हवं मी... कुणाल...!”

आणि ती परत कुणालकडे झेपावली. आकृतीने परत तिला कसंबसं धरून मागे ओढलं, "कणिका थांब... उगाच उठेल तो आणि मग सगळा डाव बिघडेल.”

अगं पण मी या माणसाला आता माझ्या डोळ्यांसमोरही पाहू शकत नाही.”

कणिकाचा आवाज रागाने आणि मन वेदनेने थरथरत होतं. आकृतीने तिचे खांदे घट्ट पकडले, “हो... तुला बघायचंही नाही आहे त्याला. तो आयुष्यभर शिक्षेत असणार आहे, सोडणार नाहीच मी त्याला... माझ्या मैत्रीचा अपमान आणि तुझ्याशी गद्दारी भारी पडेल त्याला. स्वॅपिंग करतात काय... त्यांनी आपल्याला त्यांच्या खेळात प्यादं समजलं होतं ना? बघ आता कसा बदलते मी गेम..."

अस म्हणंत तिने हळूच पुढे होत टेबलवर पडलेली ती तुटलेली विस्कीची बाटली उचलली आणि कुणालच्या हातात दिली. सगळे पुरावे कुणालच्या बाजूने वळवले. समोर कनिका सगळं अवाक होऊन पाहत होती, आकृतीने मोठ्या चालाकीने सर्व रूम बदलली होती. काही वेळापूर्वी जिथे दोन स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, तिथे आता ती नव्या वास्तवाची चौकट उभी करत होत्या. सर्व आटोपल्यावर तिने कणीकाला  जवळ बसवलं. काही क्षण दोघीही शांत होत्या. मग आकृती हळूच म्हणाली,  "कनिका, तू मोकळी आहेस आजपासून. स्वतःसाठी जग. नवीन आयुष्य सुरू कर. असल्या नवऱ्यापेक्षा नवरा नसलेला बरा...”

आकृतीच्या डोळ्यात अश्रु होते पण अडकले अजूनही पापण्यांमध्ये. आकृती तिच्याकडे अजूनही अवाक बघत होती... आकृतीच्या आवाजात नवरा गमावल्याचं दु:ख होतं पण तिने कशी त्यावर मात केली होती हेच जणू कणीकाला समजणे अवघड होते. पुढे म्हणाली, “भोगू दे त्याला आता स्वॅपिंगच्या  खेळाचे परिणाम.”

बोलताना अश्रु आता अलगद खाली आले, तिने ते सहज पुसले, कणिकाचा हात धरत म्हणाली, “आजपासून आपण एकमेकींना फारसं ओळखत नाही, असंच समज.  निदान काही हे प्रकरण संपेपर्यंत माझी तुझी काही खूप ओळख नाही. पण  पुढे आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुला माझी गरज पडली तर... सरळ माझ्याकडे ये... बिनधास्त! आणि आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव... तू कुणाची खुनी नाहीस... कुणाल आहे... बाकी मी कसं करायचं सर्व बघते. कायदा समजतो मला आणि डावपेच कळतात. विश्वास ठेव... आपल्यावर कुणाला संशयही येणार नाही...

दोघींनी हाताची घडी घट्ट केली, “तू फक्त फसवणुकीची बळी आहेस... घडलं आता सगळं आणि तू मी मोकळ्या झालो...”

कणिका काही बोलणार इतक्यात आकृतीने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. “हे बघ, कुणालला जवळ करू नकोस कुठल्याही परिस्थितीत. तू आज त्याची मदत केलीस ना तर पुढे तुला तो वेशेपेक्षाही अपमानच आयुष्य देईल. असलं बंधन तुटलेलं बरं, ज्या बंधनात आपण असं कृत्य करण्यासाठीही बांधील असतो.”

तिने एक खोल श्वास घेतला... नजर आता कुठेतरी दूरू हरवली, हळूच म्हणाली, “मी सुटले आज अनिकेशच्या खोट्या प्रेमातून, माहित होतं मला जरा तो फितूर स्वभावाचा आहे पण मलाच  स्वॅप करेल हे मी पचवू शकत नाही. तुही फेक ह्या असल्या नात्याचं उपरण, ज्याला सप्तपदीची लाज नाही आणि विश्वासाचा वास नाही... तुझ्या लायकीचा नाहीच कुणाल...”

बाहेर पूर्वेकडचं आभाळ फिकट व्हायला लागलं होतं. पहाट जवळ येत होती. आकृती उठली.

“चल... सकाळ होण्याआधी आपल्याला घरी पोहोचायचं आहे... द लाईफ इज वेटिंग फोर अस ... अंड थिस इज कॉल्ड ‘द गेम ऑफ वाईफ...’”

कानिकाने तिला गच्च मिठी मारली... ‘रात गई, बात गई...’ म्हणत दोघींनीही स्वतःला सावरलं. दोघींनीही आपापले अश्रु पुसले.  एका घाणेरड्या खेळाचे... खोट्या नात्यांचे... आणि विश्वासघाताने भरलेल्या आयुष्याचे अवशेष मागे सोडून त्या दोघी पुढे निघाल्या.  ‘द गेम ऑफ लाइफ’ची नवीन बाजी सुरू करायला....

शेवटी  हा खेळ ‘गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग’ म्हणून सुरु झाला असला तरीही तो ‘गेम ऑफ लाइफ’ ठरला होता... जो खेळ संपवला होता दोन बायकांनी.

कथा कशी वाटली नक्की कळवा... लवकरच भेटूया नवीन कथेसोबत... तोवर स्टे connect... to 

https://www.facebook.com/manatlyatalyat

मनातल्या तळ्यात

 

 तळटीप- कृपया ही कथा सेक्स कथा नाही ... तेव्हा असा विचार डोक्यात आणून ग्रुप जॉईन करू नये... ही कथा समाजातील नातेसंबंध, विश्वास, स्वार्थ आणि बदलत्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर लिहिली आहे. त्यामुळे कथेचा विषय समजून घेऊनच तिच्याकडे पाहावे, ही विनंती.

🙏🙏
माझे वाचक जाणकार आहेत आणि कथेच्या आशयामागचा विचार समजून घेतील, हीच सदिच्छा.🙏🙏
आधीचा भागची लिंग commnetला आहे.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @followers @topfans #उर्मिलादेवेन




Post a Comment

0 Comments