भाग 4 - द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!
भाग १- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!
भाग २ भाग २- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!
भाग ३- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!
आणि भाग 4-
कुणाला घरी आला आणि कणीकाने त्याला विचारलं, "ऐक ना, मी जाऊ का उद्या?”
“कुठे? कुठे जायचं ठरलं आहे?”
“अनिकेशने मला उद्या ऑफिसमध्ये भेटायला बोलावलंय. ज्वेलरीच्या मॉडेलिंगबद्दल."
कुणालच्या मनात क्षणभर धस्स झालं. तो मनातच पुटपुटला, "आयला! ह्याला मोठी घाई सुटली आहे... सेटिंग लावली वाटते, आता मलाही काहीतरी करावं लागेल." जरा स्वतःच आवरत तो कणीकाला म्हणाला, "मग, जा ना, बघ मला काही त्या दागिन्याच्या मॉडेलिंगबद्दल फारसं काही माहित नाही पण बघ, जाऊन ये.”
कणिकाच्या उत्तराने सुखावली होती. मग अगदीच सहजपणे कुणाल म्हणाला, “पण अनिकेशने तुला काही करायला लावलं तर करशील ना... तो ना प्रोफेशनल आहे. तुझं चालणं, बोलणं सारं कसं त्याला बघायचं असणार...”
कणिका रोखून बघत होती तर परत म्हणाला, “म्हणजे, काय आहे ना, उगाच मला तो म्हणायचा की तुझी बायको काही करायला तयार पण नव्हती. म्हणून म्हणतोय... तिथे गेल्यावर संधी मिळाली तर मागे हटू नकोस "
"म्हणजे काय? दागिन्यांच्या मॉडेलिंगसाठी काहीही करेन मी. त्याने तुझा प्रोजेक्ट पास केलाय, म्हणजे तुला ओळखतोच ना तो? मग काय करायला सांगणार मला असं वेगळं... आणि सांगेल तर करेल मी... त्यात काय एवढं.... एवढी पण साधी नाही मी!"
तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह त्याला दिसत होता, "ठीक आहे, ठीक आहे. जा मग. माझीही उद्या महत्त्वाची मीटिंग आहे. मलाही यायला उशीर होईल."
कणिकाने मान हलवली. कुणालने मात्र मनातल्या विचारांना आवर घातला. थोड्याच वेळाने त्याने आकृतीला फोन केला आणि तो उद्या घरी कॅटलॉग बघायला येतोय असं सांगितलं.
ती रात्र कणिकाला काहीशी भयाणच वाटत होती. नभात चंद्राची अगदीच बारीकशी कोर होती. आकाशात चांदण्यांचा मागमूसही नव्हता. काळेकुट्ट ढगांनी चंद्राभोवती जणू ग्रहणच धरलं होतं. तरीही तो चंद्र त्या ढगांच्या आडून अधूनमधून डोकावत होता... जणू नाराज होऊनही कणिकाकडे काहीतरी सांगायच्या आशेने पाहत होता. कदाचित अमावस्येची वाट पाहत...
कणिका मात्र खिडकीत उभी राहून त्या आकाशाकडे एकटक पाहत होती. तिच्या मनात आजवर दडून राहिलेली काही तरी नवीन करण्यासाठीची धडपड एक दिशा घेणार होती. मनाचा कोलाहाल नवीन गोष्ट करण्यासाठीचा वाढला होता. जणू एखाद्या प्रचंड मोठ्या भूकंपाआधी जमिनीच्या आत कुठेतरी सूक्ष्म हालचाली सुरू व्हाव्यात आणि त्यांची चाहूल फक्त जाणवावी, तशी काहीशी हालचाल तिच्या मनात सुरू झाली होती.
मन उत्सुक होतं. स्वप्नांना पंख फुटले होते. पण त्याच वेळी कुठेतरी एक अनामिक धाकही मनाच्या कोपऱ्यात डोकावत होता. मेंदू मात्र त्या सगळ्या शंकेला फोल ठरवत होता. उद्याच्या दिवसाची चाहूल तिच्या मनाला लागत होती.
इकडे आकृती अनिकेशच्या शेजारी बसली होती. डिझाइनच्या कागदांमध्ये गुंतलेली असतानाच तिने सहज विचारलं, "अरे तू उद्या घरी किती वाजता येणार आहेस? कुणाल येतोय मला भेटायला... बोलला तो असं काही."
"हो, माझही काम आहे त्याच्याशी, बोलला तो मला येणार म्हणनू. पण... मी उद्या संध्याकाळी काही मुलाखती ठेवल्या आहेत. त्या संपल्या की येतो, तोपर्यंत थांबव त्याला घरीच. माझं खूप महत्त्वाच काम आहे त्याच्याशी... तो येतच आहे तर इकडेच आम्ही बोलून घेऊ. "
"बर, पण लवकर ये... मला जरा काही मॉडेल फायनल करायच्या आहेत नंतर. मी त्याला जास्त वेळ देणार नाही.”
“अगं, पण बोल ना त्याच्याशी थोडं, बरं वाटणार नाही ते."
"ठीक आहे तू म्हणतोस तर मारेल गप्पा त्याच्याशी... माझ्या कॉलेजच्या दिवसांच्या…"
असं म्हणत तिने अनिकेशची टाय हलकेच ओढली आणि त्याला जवळ खेचलं. जरा खट्याळ मूडमधेच होती ती. म्हणाली, "कशाला येतोस रे घरी... मी घालवते ना वेळ त्याच्यासोबत, मित्र नव्हता आधी पण आता आहे ना.. " अनिकेशनेही तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, "बघ, मला काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्यासारखा नाही हा तो.... तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य करणारा....”
आणि मग मिश्कीलपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, “मी तुझा बिचारा नवरा आहे. जोरूचा गुलाम ठरलो ना..."
आकृती खळखळून हसली, "अरे बिचाऱ्या माणसा.... लवकर ये उद्या ... मला नाही झेलता येत त्या कुणालच्या बावळट गप्पा..." दोघांचं हसणं घरभर पसरलं होतं. काही वेळाने आवरत ती खोलीतून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी कुणालने कणिकाला मुद्दाम थोडं नीटनेटके, उठून दिसेल असं तयार होऊन जायला सांगितलं होतं. आणि बजावलं होतं की त्याची अर्जंट मीटिंग आहे. आणि तो फोन बंद ठेवणार आहे. काम झालं की सरळ टॅक्सी करून घरी यायचं. फोनची वाट बघायची नाही.
शेवटी तो हसत म्हणाला, “तू तुझ्या मर्जीने चालली आहेस ना अनिकेशला भेटायला? मग तिथे परिस्थितीही तुझ्या मर्जीनेच सांभाळ.”
कणिकाने त्याच्याकडे पाहून फक्त हसून मान हलवली.कुणाला ऑफिससाठी निघून गेला होता. कणीका दिवसभर विचार करत आनंदात होती. संध्याकाळी ती सुंदर तयार झाली होती, मनातल्या मनात स्वत:चा आत्मविश्वास वाढवत होती, टॅक्सी ऑफिसच्या इमारतीसमोर येऊन थांबली, मनात धस्स झालं तिच्या. समोरच्या मोठ्या बंगल्यात लग्नाची रोषणाई आणि भरभराट बघून मनाला शांत वाटलं तिच्या. मग स्वतःला सावरत ती ऑफिसमध्ये पोह्चीली. ती आल्याचे अनिकेशला कळलं होतं. त्याने त्याच्या पीएला तिला बाहेरच थांबायला सांगितलं. वेळ सरकत होता कणिकाच्या मनात धाकधुक वाढत होती. साडे सात झाले होते तरीही अनिकेश तिला कॅबीन मध्ये बोलवत नव्हता. ऑफिसचा पूर्ण स्टाफ निघून जात होता. कानिकाने फोन हातात घेतला आणि तिला आठवलं की कुणालचा फोन बंद असणार आहे. मनातच म्हणाली, “इथवर आली आहे ना, आता भेटूनच जाते, खाणार काय तो मला?”
बाहेर बसून ती लग्नाच्या सनईचा आनंद घेत होती. त्या सुरांमध्ये तिला एक विचित्र शांतता जाणवत होती. समोरच्या बंगल्यात सुरू असलेल्या लग्नाच्या गडबडीकडे पाहताना तिच्या मनात क्षणभर घरचं, आपलं आयुष्य तरळून गेलं. तोच अनिकेश स्वतः तिला घ्यायला आला, “माफ कर गं, जरा आज बिझी होतो मी... पण आता पूर्ण वेळ तुझा आहे. चल, आत बसुया आपण...”
कणिका उठली आणि त्याच्यामागे केबिनमध्ये गेली. आत गेल्यावर मात्र ती क्षणभर थबकली.
तिला कॅबीन मध्ये बसायला सांगितल त्याने, आणि पाणी प्यायला दिलं. कणिका ते पाणी गटागट प्यायली. अनिकेश कॅबीनच सर्व सेटअप बदलत होता. कणिकाला कळत नव्हतं पण ती गुमान शांतच होती. समोर असलेल्या मोठ्याश्या सोफ्याचं बेडमध्ये रुपांतर झालं होतं. सगळी रूम क्षणभरात बदलली होती, समोरच्या टेबलवर व्हिस्की आणि शॅम्पेनच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. मंद प्रकाशामुळे संपूर्ण खोलीचं वातावरण अनोळखी आणि अस्वस्थ वाटत होतं. कणिकाच्या मनात धडधड सुरू झाली. ती अजूनही शांत होती. अनिकेश मात्र अगदी सहजपणे तिच्यामागे आला. तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला, “बसं गं निवांत...”
कणिका दचकली होती तोच अनिकेशने समोर ठेवलेल्या दागिन्यांकडे इशारा केला, “हे बघ. नवीन कलेक्शन आहे. तू ते घालून बघ. कसं दिसतंय ते पाहूया.”
कणीका घाबरली होती, धडकी भरली होती तिला, हात दागिन्यांकडे नेत परत मागे घेतले तिने. जरा बाहेर नजर टाकली, अंधार पडला होता. रस्त्यावरचे दिवे लागले होते. बाहेरून लग्नाची गाणी मंद आवाजात तिच्या पर्यंत पोहचत होती. मनातच, ‘मी इथे का आले?’हा प्रश्न आता तिच्या मनाला कुरतडू लागला होता. कालपर्यंत ज्या संधीची ती आतुरतेने वाट पाहत होती, तीच संधी आज अचानक तिला भयावह वाटू लागली होती. तिने दागिन्यांकडे पुन्हा पाहिलं आणि अचानक उठत ठाम आवाजात म्हटलं, “मला नाही करायचं हे काही... नाही जमणार मला. मी निघते.”
अस म्हणतच तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला. दार उघडलंच नाही. कणिका क्षणभर स्तब्ध झाली... तिने परत प्रयत्न केला. पण... आणि मागे वळून पाहिलं... अनिकेश मिश्कील हसत तिथेच उभा होता. आता अनिकेशने तिला सरळ म्हटल, "दार बंद आहे आणि माझ्या शिवाय ते उघडणार नाही...”
कणिका भीत म्हणाली, “दार उघडा, काय प्रकार आहे हा? मला जायचं आहे. नाही करायची मला मॉडेलिंग.”
अनिकेशने तिच्याकडे पाहत हळूच मान हलवली, “तुला खरंच वाटतंय की तू इथे फक्त दागिन्यांचं मॉडेलिंग करायला आली आहेस. तुला माहित आहे तुझ्या नवऱ्याने टेंडर पास करून घेण्यासाठी तुला माझ्याकडे पाठवलं आहे. आणि तू पण तर तयार झालीस ना, दागिन्यांचं काम माझं नाहीच ते तर आकृतीचं आहे, एवढं समजत नाही तुला... नवऱ्यासाठी आलीस की स्वतःसाठी गं... आता आलीस तर हे सगळे दागिने तुझे... अस्सल सोन्याचे आहेत."
"ए निर्लज्ज माणसा!! काहीही काय बोलतो तू... ओरडेल मी, कुणाल असं कधीच करणार नाही, त्याच खूप प्रेम आहे माझ्यावर." कणिकाचा आवाज थरथरत असला तरी त्यात संताप होता. अनिकेश मात्र मिश्कील हसत पुन्हा म्हणाला,
"हो... आहेच ना, मी कुठे नाही म्हणतो, मग त्याच्या प्रेमासाठी, त्याची इच्छा समजून... "
अनिकेश आता तिच्या अगदीच जवळ आला, तिला अगदीच घातक नजरेने बघत हसला, "कशाल त्रास करून घेतेस, हे चालायचं, सगळं तुझ्या कल्पनेइतकं भयानक नाही. त्याला काही प्रोब्लेम नसणार आहे...”
त्याने टेबलवर ठेवलेल्या दागिन्यांकडे पाहिलं, “तुला या चंदेरी दुनियेत घेऊन जायचं आहे मला. तू त्यासाठीच तर आली होतीस ना? फार सुंदर आहेस हा तू ... बघू देत मलाही तुझं सौदर्य. फक्त तुझ्या नवऱ्यानेच बघावं असा नियम नाही... आणि त्याने मला संमती दिली आहे, मग तू का त्रास करून घेतस, घे की जरा दुसरा अनुभव."
कणीकाला एकेक शब्द ऐकणंसुद्धा आता असह्य होत होतं. तिने दोन्ही हात कानांवर ठेवले आणि संतापाने ओरडली, “बसं!! गप्प हो हैवाना... सारखं माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन माझ्यावर दबाव आणू नका. आणि माझ्याबद्दल असं एकही शब्द पुन्हा बोलू नका.”
तिचा आवाज खोलीच्या बंद भिंतींवर आदळून परत आला. मग अचानक... कणिका गप्प झाली... बाहेरून लग्नाचे मंत्र स्पष्टपणे कानावर येऊ लागले होते. तसं तशी ती सुन्न होत गेली.... हळूहळू तिला काहीच कळत नव्हतं... आणि त्याच मंत्रांना बोटांच्या तालावर फिरवत अनिकेश मग्न होत होता. शेजारी सुरु असणाऱ्या लग्नाच्या मंत्राने त्रस्त झालेल्या कणीकाला अनिकेश दिसतही नव्हता. मनाला सर्वीकडे अंधार दिसत होता. डोळ्यांसमोर तिचं लग्न उभं राहिलं.... हातातल्या मेहंदीचा रंग, कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, सप्तपदीच्या वेळी कुणालने धरलेला तिचा हात... आणि लेगच मग ‘कुणाल खरंच असं करू शकतो?’ हा प्रश्न तिला काहीच सुच देत नव्हता. त्या क्षणी तिच्या मनाची झालेली घालमेलच अनिकेशच्या लक्षात आली. तो तिच्या कमकुवत झालेल्या मनाचा फायदा घेण्यासाठी पुढे सरसावला. कणिका स्वतःच्या विचारांमध्ये इतकी गुरफटली होती की तिच्या भोवती काय घडत आहे, याचं भानही तिला उरलं नव्हतं.
शेजारी लग्नाची सप्तपदी सुरु झाली होती आणि अनिकेश तिच्या गोंधळलेल्या शांततेचा चुकीचा अर्थ घेतला होता. हा होकार समजून तिला वेड्यासारखा झोंबला होता. सप्तपदीच प्रत्येक वचन ऐकून कणीका तुटत होती. अनिकेशने तिला पूर्ण स्वतःत सामवून घेतलं होतं. भावनेत आणि स्वतःच्या प्रश्नांमध्ये गुंतून असल्याने तिचे अखंड प्रयत्न कमी पडत होते. सातवं अखंड विश्वासच वचन कणीकाच्या कानावर पडलं आणि ती जोरात कुणालच्या नावाने ओरडली.... अनिकेशला अंगावरून बाजूला ढकललं तिने. तो बाजूला झाला आणि मग हसायला लागला ... कणिका धापा टाकत कुठेतरी शून्यात बघत होती. अनिकेशने शांतपणे स्वतःला सावरलं. टेबलवरची बाटली उचलली, ग्लासमध्ये पेग ओतला आणि खुर्चीत बसून तो कणिकाकडे पाहत जिंकल्याचा आनंद घेत होता... तिची हतबलता त्याला अजूनच विश्वस्त करत होती आणि त्याच्यासाठी अजूनही रात्र तरुण होती... कणिका मात्र स्वतःच्या आत उसळणाऱ्या ज्वालामुखीशी झुंजत होती. तिला कुणालचा राग येत होता. पण त्याहून जास्त... स्वतःचीच चीड येत होती. मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. बाहेर सप्त पदी पूर्ण झाली होती... एका नव्या संसाराची सुरुवात झाली होती. आणि त्याच क्षणी कणिकाच्या मनात तिच्या स्वतःच्या संसाराबद्दलचा विश्वास हादरला होता. तिने डोळे मिटले... एक दीर्घ श्वास घेतला. आता या खोलीतून बाहेर पडण्याआधी तिला एक सत्य जाणून घ्यायचं होतं.... पण पुढे तिच्या हातून काय घडतं वाचूया पुढल्या भागात.... आकृतीचं काय होते... वाचा पुढील अंतिम भागात.
पुढील भाग सोमवारी... तोवर स्टे connect....
तळटीप- कृपया ही कथा सेक्स कथा नाही ... तेव्हा असा विचार डोक्यात आणून ग्रुप जॉईन करू नये... ही कथा समाजातील नातेसंबंध, विश्वास, स्वार्थ आणि बदलत्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर लिहिली आहे. त्यामुळे कथेचा विषय समजून घेऊनच तिच्याकडे पाहावे, ही विनंती.

माझे वाचक जाणकार आहेत आणि कथेच्या आशयामागचा विचार समजून घेतील, हीच सदिच्छा.

आधीचा भागची लिंग commnetला आहे.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @followers @topfans #उर्मिलादेवेन
0 Comments