भाग ३- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!

 भाग ३- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!


भाग १- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!

भाग २ भाग २- द गेम ऑफ वाइफ स्वॅपिंग!!

सायंकाळी कुणाल घरी पोहोचला. दार उघडताच त्याने मोठ्या आनंदात कणिकाच्या हातात पेढ्यांचा डबा ठेवला. दुसऱ्या हातातून सुगंधी मोगऱ्याचा गजरा तिच्यासमोर धरला. कणिका आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली, “अहो... आज काय विशेष? चक्क पेढे... आणि वर गजरा? आज स्वारी भारीच मूडमध्ये दिसतेय!”
कुणाल मोठ्याने हसला. “अगं, आनंदाची बातमी आहे. अगं प्रोजेक्ट पास झालाय, अनिकेशने मंजूर केला., म्हणजे... आता माझं डायरेक्टरपद जवळजवळ निश्चित झालं. खरं सांगू? मला वाटलंच नव्हतं तो एवढ्या सहज प्रोजेक्ट मंजूर करेल. पण म्हणाला, ‘प्रोजेक्टमध्ये दम आहे. काम चांगलं केलंयस’.”
कणिकाने क्षणाचाही विचार न करता त्याच्या तोंडात पेढा भरवला, “मला माहिती होतं, तुमची मेहनत वाया जाणार नाही. चला, हिऱ्याची पारख आहे तर त्याला, मला वाटलं होत की नुसता दिखावा करतो.”
“नाही गं, आज तुझ्याबद्दलच विचारात होता.”
कणिकाने आश्चर्याने विचारलं, “माझ्याबद्दल... मी कुठे आले इथे?”
“अगं, बोलता बोलता विषय निघाला, म्हणाला, ‘तुझी बायको खूप नैसर्गिक सुंदर आहे. मेकअपशिवायही तिच्या चेहऱ्यावर वेगळीच उठावदार झळाळी आहे. म्हणजे त्याच्या बायकोचं मोठं ज्वेलरी डिझाइनचं काम आहे ना... नवीन कलेक्शनसाठी कधी कधी मॉडेल्सची गरज पडते म्हणे त्यांना. तुझ्याबद्दल सहज बोलत होता. म्हणाला, ‘तिला इच्छा असेल तर एकदा भेटू, बोलू. तिच्यावर आमचे दागिने खूप खुलतील... जॉब करणार काय म्हणून... ' असं नाही का?"
“असं...?” कणिका अनपेक्षितपणे विचारात पडली. ती समोरच्या अलमारीच्या आरशात स्वतःकडे पाहू लागली. नकळत तिने कपाळावर आलेली केसांची बट कानामागे सारली, पुन्हा स्वतःलाच निरखून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित हास्य आलं होतं. तेवढ्यात कुणाल शांतपणे तिच्यामागे आला. अलगद तिच्या खांद्याभोवती हात टाकत आरशात तिच्याच डोळ्यांत पाहत म्हणाला, “खरं सांगू... कोणाला काय वाटतं त्यापेक्षा तुला काय वाटतं, ते महत्त्वाचं... तू म्हणे खूप नेचरल दिसतेस, बघ विचार करून, मला काही हरकत नाही... तुझा आनंद महत्वाचा गं.”
तोच कुणालने तिला मागून मिठी मारली आणि म्हणाला, “मग आहेच आमचं प्रेम नेचरल, अगदी तुझ्यासारखंच. नाही का?”
आता कुणालने ओठ तिच्या माथ्यावर टिपली, आणि हळूहळू तो ओठापर्यंत आला तोच कणिकाने के पेढा परत त्याच्या तोंडात धरला... ती हसत स्वयंपाकघराकडे वळली. पण कुणाल मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. मनात पेढ्याच्या गोडीपेक्षा... अनिकेशसोबत झालेल्या गुप्त व्यवहाराची कडू चव अजूनही रेंगाळत होती.
कानिकाच्या मनात आज अनिकेश बद्दल विचार घुमत होते. आतापर्यंत तिला अनिकेशची नजर विचित्र वाटली होती. किंबहुना, पार्टीत तो ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत होता, त्याची तिला चीडच आली होती. पण आज कुणालच्या बोलण्याने तिच्या मनात एक वेगळाच विचार डोकावून गेला. तिला वाटयला लागलं होतं की उगाच आपण कुणावरही विचार न करता टिप्पणी देतो. एखाद्याच्या बघण्यामागे आपलंच हित असतं. ती गावाकडची होती. घरंदाज वातावरणात जरा धाकातच वाढलेली. पण मनात अनेक इच्छा होत्या तिच्या. पण त्या इच्छा व्यक्त करण्याची सवय आणि मुबाही नव्हती. स्वतःसाठी काहीतरी वेगळं करण्याची, स्वतःला नव्या रूपात पाहण्याची एक सुप्त हुरहूर तिच्या मनात कायम कुठेतरी दडलेली होती. ज्वेलरीचं मॉडेलिंग? हा विचार तिच्या मनाला सुखावून गेला होता. मनाने अलगद होकार दिला होता. पण बुद्धीने लगेच प्रश्न उभा केला, “गरज काय आहे? लोक काय म्हणतील? आणि अनिकेशची नजर... ती खरंच तशीच होती का?”
मन आणि मेंदूचं एक छोटंसं युद्ध तिच्या आत सुरू झालं होतं.
इकडे अनिकेश घरी पोहोचला तेव्हा आकृती तिच्या डिझाइनच्या टेबलावर बसली होती. समोर कागद, पेन्सिल, काही दागिन्यांचे नमुने आणि रंगीत स्केचेस पसरलेली होती.
डार्लिंग काय करतेयस गं तू एवढी मग्न आहेस?
“अरे दसरा दिवाळी समोर आहे... नवीन कलेक्शनचं डिझाइन तयार आहे. आणि एक खास ब्रेसलेटही बनवतेय.”
“खास? कुणासाठी?”
“कणिकासाठी रे.”
अनिकेश क्षणभर थबकला, “कणिकासाठी? ती कुणालची बायको? तू ओळखतेस तिला?”
“अरे असं काय करतोस, कुणालची बायकोना ती... आणि कुणालाने सांगितलं, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणे. तिला काहीतरी खास द्यायचं आहे. बोलला मला काहीतरी नवीन पीस बनव म्हणून.”
....आणि अनिकेश काय हवं होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं होतं. एका संधीच्या शोधात होता आणि संधीही कुणालनेच दिली होती. म्हणजे दार उघडण्याची गरजच नव्हती... दाराची किल्ली कुणालने स्वतःच त्याच्या हातात आणून दिली होती. त्याच्या मनात तर विचारांची जणू आतिषबाजी सुरु झाली होती, “मला आता फारसा घाट घालावा लागणारा नाही....”
तो सोफ्यावर बसला. मोबाईल हातात घेत बसल्या बसल्या परत काणीकाचा फोटो झूम करून करून बघत तिला कवेत घेण्याचे स्वपन बघत होता. जरा आकृतीच लक्ष गेलं आणि ती म्हणाली, “हे बघ ना एकदा. हे कसं वाटतंय?”
अनिकेशने पटकन मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्या जवळ गेला.
स्केचकडे पाहत तो म्हणाला, “अरे वा!! सुंदर रेखाटलंयस...”
स्केच हातात घेत त्याने सहज विचारलं,“ कुणाल बोलला तुला कणिकासाठी हवंय म्हणून?”
“हो रे, त्याला काहीतरी खास द्यायचं म्हणे... मग काहीतरी खास आपल्या मित्रासाठी म्हणून करते आहे आणि मलाही काही वाव मिळेल ना ह्यातून...”
मग अनिकेश तिच्या जवळ येवून बसला आणि हळूच तिच्या केसांना कुरवाळत म्हणाला, “तो बोलला होता मला.”
आकृतीने त्याच्याकडे पाहिलं, “काय बोलला.... तुलाही बोलला का तो... मला बोलला तेवढं पुरे होतं, बनवते मी.”
“ते नाही गं, तो म्हणत होता, तू त्याला पूर्वीपासून आवडायचीस. कॉलेजमध्ये असताना तुला प्रपोज करायचा विचार होता म्हणे त्याचा. पण आपलं लग्न ठरलं.... बिचारा... आताही आवडतेस म्हणे तू त्याला. पण पण आता एक बिझनेसवुमन म्हणून आणि एक चांगली मैत्रीण म्हणून.”
“असेल... मला काही माहित नाही, आणि आता त्याचा काही उपयोगही नाही. माझ्याकडे माझा सॉलिड हँडसम नवरा आहे ना!”
ती आता जरा हसली, “ आणि करायचं होत ना धाडस मग तेव्हाच, आता कशाला बोलतोय आणि जुन्या गोष्टी सांगतोय. काय रे?”
अनिकेशने तिला आता मिठीत घेतल आणि म्हणाला, “त्याचा प्रोजेक्ट पास करतोय मी. तुला काही प्रॉब्लेम नाही ना?”
“छे! मला काय प्रॉब्लेम असणार, तो तुझ्या कंपनीचा प्रश्न आहे.”
“नाही, तसं नाही, त्याचा प्रोजेक्ट आपल्या कंपनीत आला की त्याचं येणं-जाणं वाढेल ना. आणि तुझं शोरूमही त्याच परिसरात आहे.”
आणि मग नजर चोरत बाजूला होत म्हणाला, “त्याला काहीतरी बोलयचं आहे म्हणे तुझ्याशी.”
“हो का? पण मला माहिती आहे काय असणार ते. तो लग्नाच्या वाढदिवसासाठी कणिकासाठी काहीतरी प्लॅन करतोय.”
आकृतीला अनिकेशच्या त्या एका शब्दामागे दडलेला अर्थ अजिबात जाणवला नव्हता.
आणि अनिकेश? त्याच्या मनात आता पुढची चाल अगदी स्पष्ट झाली होती.
कुणाल आणि अनिकेश दोघांनीही आपापला डाव सुरू केला होता. दोघांच्याही लग्नाच्या बायका होत्या. विश्वासाचं नातं होतं. सप्तपदीची वचनं होती. नव्या संसाराच्या सुरुवातीला एकमेकांना दिलेल्या आणाभाका होत्या... पण स्वार्थाच्या या खेळात... हे सारं काही हळूहळू स्वाहा होण्याच्या मार्गावर होतं.
एका बाजूला, कणिका गावातली संस्कारी होती तर आकृती शहरातली प्रेमवेडी होती.
आणि या दोघांच्या आयुष्याभोवती दोन पुरुषांनी एक असा खेळ आखला होता, ज्यात स्वतःचा लोभ, करिअरची महत्त्वाकांक्षा आणि नात्यांमधला विश्वास पणाला लागला होता
पंधरा दिवसांनी कुणालची अनिकेशसोबत परत फायनल मिटिंग होती. आज काय तो निर्णय घ्याचाच ह्या विचारात दोघीही होते. अनिकेशने आधीच सर्व टीम मेम्बर्सला विश्वासात घेत सर्वांकडून मंजुरी घेतली होती. प्रोजेक्ट सर्व मताने पास झाला होता. कुणाला अनिकेशच्या कॅबीनमध्ये पोहोचला.
"काय मग? पार्टी कधी ठरवायची? "
"तू सांग? काय विचार केलाय? मला वाटत नाही मी कणिकाला स्पष्ट सांगू शकेन म्हणून? "
अनिकेश हसला, "ए... स्पष्ट तर मी पण बोलू शकत नाही आकृतीपुढे. पण जाळ्यात ओढुया ना दोघींना... आपण काही त्यांना सोडून तर देणार नाही आहोत. मी विचार केला आहे.’
कुणालने त्याच्याकडे पाहिलं, “आणि तो काय?”
“हे बघ. माझी बायको आकृती तुझ्या बायकोसाठी नवीन जेव्लारी डिझाईन करत आहे. तू तिला भेटायला जा घरी संध्याकाळी. मी येईपर्यंत वाट बघ पण मी घरी येणारच नाही. ती तुला नेहमीप्रमाणे ड्रिंक्स ऑफर करेल, घे. सातपर्यंत घरातले बहुतेक नोकर निघून जातात. बायजा बाई आठ वाजता नोकरांच्या खोलीत बाहेर निघून जाते कारण आकृतीला रात्री घरात कुणीच नको असते. स्टडी रूममध्ये ती मॉडेल्स आणि दागिन्यांची मांडणी करत बसते.”
कुणाल शांतपणे ऐकत होता, “अरे पण... मला निघावं लागेल ना डिझाईन बघितल्यावर.... नाहीतर तिला संशय येणार.”
“म्हणूनच मी आधीच सांगणार आहे की तू माझ्या बोलावण्यावरून येतोयस. तिला ते स्वाभाविक वाटेल.. बाकी काय करायचं ते तू सांभाळ. तिला असल्या गोष्टी माहित आहेत तर कदाचित तुला काही जास्त वेळ लागणार नाही. पण अजूनतरी मी तिला स्वैप केलं नाही कुणासोबत. आता राहिला प्रश्न कणिकाचा तर तू काहीतरी बोलत होतास ना जॉबबद्दल सांग, बघू काय सुचते ते."
"अरे मी मागे तुझी स्तुती केली होती आणि तू तिला आकृतीच्या दागिन्यांची मॉडेल म्हणून बघतोय असं सांगितलं होतं."
"आयला... भारीच आहेस तू! आकृतीकडे असणाऱ्या सर्व मॉडेल एकदम रापचिक आहेत आणि ती स्वतः ही मॉडेलिंग करते...”
तो क्षणभर विचारात पडला.
“बरं, पुढे काय सुचलं?”
"तिला इंटरव्ह्यूसाठी बोलाव. मी जरा तिला पुश करतो. बोलतो, तू माझा प्रोजेक्ट पास करतोय आणि कणीका माझ्यासाठी एवढंसं करू शकत नाहीस, असं काहीतरी... जरा तिखट आहे ती पण बघू ...जरा गोटे मारून बघतो लागला डाव चुकून तर"
"नाही नाही... काय ते फिक्स करूया... मी माझी बायको तुला बिनधास्त देतोय मग तू असा करू नको..."
"अनिकेश, जरा सावकाश जावं लागेल. कणिकाला या सगळ्या गोष्टींची जराही कल्पना नाही. तिच्या लक्षात जर काही आलं ना, तर ती माझ्यासोबतही राहणार नाही. पण एकदा का तिच्या मनात भीती बसली, एकदा का तिला वाटलं की आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही... मग ती कुठे जाणार? आणि मी कुठे तिला सोडून वगैरे देणार... बायको आहे लग्नाची... "
दोघेही जसे हसले...
तेवढ्यात बाहेरून सनईचे मंजुळ सूर कानावर आले. दोघांचं बोलणं क्षणभर थांबलं. अनिकेशच्या कॅबिनच्या अगदी शेजारी असलेल्या मोठ्या बंगल्यात लग्नाची लगबग सुरू झाली होती. दोन दिवसांनी मुलीचा विवाहसोहळा होता. अंगणात मंडप उभारला जात होता. झेंडूच्या फुलांच्या माळा, रंगीबेरंगी सजावट आणि ये-जा करणाऱ्या माणसांची धावपळ सगळीकडे दिसत होती. लग्नाचा मुख्य विधी संध्याकाळी होणार असल्याने अनिकेशने ऑफिसच्या मागच्या बाजूला मंडप उभारायला सुरुवातीला हरकत घेतली नव्हती.
पण आता... त्याला तेच सनईचे सूर खटकू लागले होते. पण नायलाज होता.
सनईचे सूर अजूनही हवेत तरंगत होते. अनिकेशने नकळत त्या सुरांच्या तालावर हात हलवला आणि कुणालकडे पाहत म्हणाला,"चल तर मग... तुझी परवानगी असेल तर मी करतो कणिकाला हँडल. तिला दोन-तीन चांगले फोटो पाठवायला सांग. माझा ई-मेल आयडी दे. मी स्वतः तिच्याशी बोलतो. मॉडेलिंगच्या कामासाठी इंटरव्ह्यूचं कारण पुरेसं आहे.”
दोघेही उठले तसा अनिकेश बोलला, “उद्याच सांग. गोष्ट फार रेंगाळायला नको."
बाहेर पुन्हा सनईचा एक लांब सूर उमटला. अनिकेशने क्षणभर खिडकीबाहेर पाहिलं. मंडपात फुलांची सजावट पूर्ण होत होती. आणि त्याच्या मनात मात्र एका वेगळ्याच खेळाचा मंडप उभा राहत होता.
दुसऱ्या दिवशी काणीकाने उत्सुकतेपोटी तिचे सुंदर सुंदर फोटो अनिकेशला पाठवले. फोटो पाठवल्यानंतर मात्र तिचं मन स्थिर बसेना. सारखं ते इमेल बघणं सुरु होतं तिचं... आणि दोन तासांनी तिला रिप्लाय आलेला, अनिकेशने तिला ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोलावलं होतं. कणिकाचं हृदय धडधडू लागलं. तिने ई-मेलला लगेच उत्तर दिलं नाही. कुणाल घरी येईपर्यंत थांबायचं तिने ठरवलं. मनाची धुकधुक वाढली होती तिच्या, आतल्या स्वप्नांना जणू पंख फुटत होते. भरारी घेण्यासाठी जणू मन पंखांना पसरवत होत. मनांतल्या आनंदाने ती कुणालची वाट बघत आत बाहेर करत होती.
पुढच्या डावाची गणितं सुरू झाली होती. हा आता केवळ दोन पुरुषांचा व्यवहार राहिला नव्हता. दोन संसारांच्या दाराशी उभा केलेला एक धोकादायक खेळ होता... बघूया बायका पुढे काय करतात ते.... पुढील भाग शुक्रवारी... तोवर स्टे connect....
तळटीप- कृपया ही कथा सेक्स कथा नाही ... तेव्हा असा विचार डोक्यात आणून ग्रुप जॉईन करू नये... ही कथा समाजातील नातेसंबंध, विश्वास, स्वार्थ आणि बदलत्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर लिहिली आहे. त्यामुळे कथेचा विषय समजून घेऊनच तिच्याकडे पाहावे, ही विनंती.🙏🙏
माझे वाचक जाणकार आहेत आणि कथेच्या आशयामागचा विचार समजून घेतील, हीच सदिच्छा.🙏🙏
आधीचा भागची लिंग commnetला आहे.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @followers @topfans #उर्मिलादेवेन

Post a Comment

0 Comments