एक होती भिंगरी - भाग ६

 भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-

भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ५ पुढे वाचा एक होती भिंगरी.... भाग ५
भाग ६ पुढे वाचा....


भाग ६- 'द कमबॅक'
गुणवंतरावांच्या मुलीच्या अपहरणाची बातमी संपूर्ण न्यूजमध्ये होती. तोही आता भांबावला होता, नेपालकडे स्वतः रवाना होण्याआधी त्याने विश्वासू लोकांची गुप्त सभा बोलावली ज्यात त्याचे जुने सोबती होते. बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या खास खोलीत फक्त पाच जण बसले होते. बाहेर कडेकोट सुरक्षा होती. मोबाईल फोन आधीच जमा करून घेण्यात आले होते. खोलीत तणाव दाटून बसला होता. गुणवंतराव समोरच्या टेबलावर मुठी आपटत येरझाऱ्या घालत होता. तसा तो त्याच्या विश्वासू बबनरावला ओरडत म्हणाला,


“अबे बटाट्या, लाव ना बे दिमाक, माझं तर चालुनच नाय राहिलं यार, गुण्या भाईच्या मुलीवर नजर टाकायची हिंमत झाली कुणाची? गुण्या भाई हाय मी! कोण साला पैदा झाला आता नवीन बे, कोणाची शामत आली रे बटाट्या. कोण असू शकतो बे?”
खोलीत शांतात होती. कुणीच बोलत नव्हतं, तसा तो परत दहाडला, “ मी तरी सोनाला किती लपून बाहेर ठेवलं, सोना कुठे शिकते, कधी येते कधी जाते... हे तर साल्या लयच कमी लोकायले माहित हाय ना बे! मंग जे नाही घडायला पाहिजे होतं ते कसं झालं बे?”
त्याच्या आवाजात आता मुलीसाठी वेदनाही होती. तसा तो रागात फणफणत ओरडला, “कुणाकडून तरी आपल्या सोनाची खबर सुटली हाय. इथे आपुन पाचच लोकं, मंग कोण फुटलं?“
म्हणत त्याने त्याची पिस्तोल बाहेर काढली, रागात त्याने त्याच्या जिगरी बटाट्याला बंदुकाच्या नोकीने मारणं सुरु केलं, “अबे माजलास साल्या तू? कुठ लक्ष हाय बे तुव...? अबे पत्ता लावतस क देवू ठोकून सहाच्या सहा?”
आणि त्याने उलट्या हाताने बटाटा भाईच्या गळ्याला जोरात आवरलं. त्याला असं बघून बाकीचेही घाबरले. पण हिंमत कुणाची नव्हती गुण्या भाईला थांबवण्याची.


आता त्याने बटाट्या भाईला सोडलं, स्वतः शरीर मोडलं, गुणवंतरावांनी एकेकाकडे नजर फिरवली. त्या नजरेत संशय होता.
“म्हणजे गद्दार आपल्यातच हाय?”
कुणी काहीच बोललं नाही. खोलीत जशी मृत शांतता पसरली होती. गुण्या भाईच्या डोळ्यांत संताप धगधगत होता. त्याने मानेला जोरात झटका दिला. बोटं मोडली. मुठी आवळल्या. आणि पुढच्या क्षणी त्याचा राग फुटला. समोर बसलेल्या माणसांवर तो अक्षरशः तुटून पडला.
लाथा, बुक्के, शिव्यांचा वर्षाव... सारं काही एकाच वेळी सुरु झालं. समोर जो दिसेल त्याच्यावर तो हात उचलत होता. वर्षानुवर्षे त्याच्यासोबत काम करणारे त्याचे विश्वासू साथीदार आज त्याच्या संतापाचे बळी ठरले होते. कुणाच्या ओठातून रक्त वाहत होतं, कुणाच्या भुवया फुटल्या होत्या, तर कुणी वेदनेने जमिनीवर लोळत होतं. पण त्या क्षणी गुण्या भाईला काहीच दिसत नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सोनाचा चेहरा होता. मारून मारून अखेर तो स्वतःही दमला. खबर कुठून फुटली? कोण गद्दार निघालं? हे काही कुणाला माहित नव्हत आणि कुणी खबर बाहेर सोडलीही नव्हती तरीही गुण्या ‘द अंडरवर्ड डॉन’ ची मुलगी किडनॅप झाली होती. आणि हा खेळच कुणा अशा माणसाचा होता ज्याची कल्पना त्याने कधी केली नव्हती... कदाचित!!
गालावरून वाहणारं रक्त हाताच्या मागच्या बाजूने पुसत बटाटा भाई हळूहळू त्याच्या जवळ आला.
“भाई...”
गुण्या भाईने लालबुंद डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. बटाटा भाई जरा घाबरतच बोलला, “भाई, हममेंसे कोई भी नाही. सोना आमची बी जान हाय. माझी डॉली तशी सोना बेबी मले. अन् भाभीला वचन देलं होतं मी. आम्ही नाय भाई... माझा तर जीव बसतो तिच्यात.”
गुण्या भाईने परत बटाटा भाईची कॉलर पकडली, तो डरकाळी फोडत ओरडला.
“मग कोण हाय तो? कोण हाय तो ज्याने गुण्या भाईला आव्हान दिलं? ज्याने त्याची मौत लिहिली हाय ह्या यमाच्या हातून...”
खोलीतील सगळे स्तब्ध झाले. गुण्या भाईचा चेहरा विक्राळ दिसत होता. त्याने बटाटा भाईला भिंतीवर ढकललं आणि टेबलावर मुठ आपटली.
“आता पैसा बघायचा नाय. कोणताच नियम बघायचे नाय. नेपाळच्या प्रत्येक गल्लीमध्ये आपली माणसं उतरली पाहिजेत. प्रत्येक हॉस्पिटल, हॉटेल, रस्ता, बॉर्डर साला सगळा नेपाळ पिंजून काढा, नाहीतर पेटवा.”
आणि त्याने परत मान मोडली, आणि त्याचा आवाज मंद झाला, “माझी सोना समोर पाहिजे मला, अन् तिच्या नखालाबी धक्का लागला असेल ना...”
वाक्य अर्धवट सोडून त्याने समोरच्या काचेच्या टेबलावर जोरात घाव घातला. काचांचा चुराडा झाला. गुण्या भाईचा राग सगळ्यांनी यापूर्वी अनेकदा पाहिला होता. पण आज तो फक्त अंडरवर्ल्डचा डॉन नव्हता. आज तो एका बापाच्या रूपात उभा होता. बटाटा भाईस्वतःला सावरत पुढे आला,
“हो भाई, तसचं होईल, मई काय बोलतो, भाई अभी आपल्याला अजून आपलं जाळं परत विणाव लागल, कुठून फाटलं माहित नाही... पण आता ते म्हत्वाच नाय... आपली पोरगी आपल्या जवळ पाहिजे. ते बी...”
“अबे साल्या, गुण्या भाईची पोरं, शेर का बच्चा है ओ. जिथं असल ना त्याले कच्च खाईल ते... अन् तू असा बोलतस जसा क ती कुण्या सध्या माणसाची पोरगी हाय... साल्या बटाट्या चूप राय.”
“भाई मी काय बोलतो, ती साबूत येयील... तुम्ही जरा थंड ठेवा भेजा.”
“अन् ती कशी येईल बटाट्या? सांगशिण काय बे.”
‘भाई एक बात बोलू क्या?”
“अबे बोल, नही तो इथंच खोचपतो तुले... साला, ‘भाभीको वचन दिया था’ म्हणे.”
बटाटा भाईने गालावरचं सुकलेलं रक्त पुसलं. मग हळूच खुर्ची ओढून बसण्याची परवानगी मागत तो बसला.
“भाई अभि आपुन सारे खादीवाले वाले लोग है. सिधा बंदूक तानके किसीको मार नाही सकते. म्हणजे आपली समाजात एक इमेज हाय ना भाई आता... बोले तो स्टँडरेड भाई. “
“मग काय करू त्याचं, मालेही समजते, किती मेहनत केली मी हे राज्य आणि हा दरारा बसवाले... पण कोण असा पैदा झाला बे. लय दिमाकात चालल सारं आता.”
“भाई शांत, मई क्या बोलता?”
“अबे बोल नाही तो ठोकता तुझे.”
“भाई, एक नया छोकरा है, म्हणजे तो मछली भाई आहे ना त्याच्यासाठी काम करतो.”
“अरे भोकू का साल्या. माझ्या कट्टर दुश्मन आहे तो... साल्या त्यान तर केलं नसलं ना.. त्याची त... साल्याच्या जाऊन पिछवाड्यात ठोकतो माहीत झालं त.”
“भाई, सुनो ना. तो पोरगा त्याच्या साठी काम करतो पण पैस्या साठी काहीही करतो... काम बोलतो त्याले, आपलं काम झालं का देऊ उडवून...”
“तुले वाटते, तो करल म्हणून?”
“११०% भाई.”
“पण विश्वास कसा ठेवायचा तो तर माझ्या दुष्मनाचा माणूस हाय...”
“तो कोणाचा नाही... मछली भाईपण त्याचा वापर करून घेते. ती आपली मागच्या महिन्याची ड्रग्स डील त्यानंच आपल्याकडून हुशारीने काढून मछली भाईला दिली होती. पोरगा लय चाम्पर आहे. माग पुढं कोणीबी नाय त्याच्या. म्हणून मरणाले भेत नाय.”
“त्याची हिस्ट्री काय बे? ते पता हाय का तुले. मले सारां त्याचा इतिहास अन् भूगोल पाहिजे बे.”
“मागच्या घणी म्या स्वता त्याची हिस्टरी काढली होती. तरीबी खूप काही कोणालेबी माहित नाही पण दहा वर्ष जेलमंदी काढले त्यान, त्याच्या बापाने त्याच्या मायले विकलं होतं अन् रागात ह्याने बापाचा खून केला होता म्हणे. माय सदमा बरदाश नाय करू शकली अन् मेली. जयलातून बाहेर निघाल्यावर सुपारी घ्यायला लागला म्हणून मछली भाईने त्याला हाताशी ठेवला हाय. मागच्या वेळी इलेक्शन मंदी त्या सुदामला माह्या सांगण्या वरून गचकवलं त्यानं. छोकरा कामाचा ह्या तसा.”

“बोलावं त्याले आताच... म्हणणं ते किंमत देऊ म्हणा, पण माझी पोरगी जशी च्या तशी परतली पाहिजे. अन दे सुपारी माझ्या पोरीच्या किडन्याप करणाऱ्याची.”
गुण्या भाईने जोरात समोरच्या खोक्यांना लात मारली आणि ओरडला, नंतर शांत झाला, म्हाणाला, “साहेबजीच्या सेक्रेटरी मॅडमजीले लाव फोन जरा, मदत मागतो.”
बटाट्याने फोन लावला, आणि गुण्या भाईच्या हातात दिला,
“मॅडमजी मी गुणवंतरावं बोलतो.”
“गुणवंतराव? कोण? मी तर गुण्या नावाने सेव्ह केलाय.”
“हो हो म्या गुण्याचं बोलतो मॅडमजी.”
“असं... आता कसं आपलंपण वाटते. बोला काय म्हणता... अरे गुण्या भाई न्यूज आलीय, तुझ्या पोरीला उचलून नेलं म्हणे... आणि तू गुमान गुप... अर अर... गुण्यान कण्या खाल्या काय रे.” आणि ती हसायला लागली.
“म्हणूनच फोन केला मॅडमजी, साहेबजीला सांगून जरा मदत मिळेल काय... पोरीचा काहीच पत्ता लागत नाही हाय.”
“साहबेजी समोर आहेत आणि विचारात आहेत की आज १००० बंदुका येणार होत्या इकडे त्याचं काय झालं?”


“अरे मॅडमजी भारी टेन्शन मदी हाय मी, करतो काही तरी म्हणजे अजून आल्या नाही का जहाजावर?”
“आधी ते करा, आमचं किती नुकसान होईल, आणि पकडल्या गेल्या तर तू जवाबदार राह्शीर, पैसा घेतला आहे तू...” आणि परत भिंगरीचा तो कर्कश आवाज ऐकायला आला. तसा गुण्याने रागात फोन फेकला, “आयला समजते काय ही स्वतःला, समोर आली ना की असा चिरतो... साली ले उघडं करतो. बाईची जात साली... गवसू दे एकटी. मले मले... ह्या गुण्या भाईले...”
आज दुपारी गुण्या भाईच्या हातून मोठा सौदा सुटला होता... करोडोचा लॉस झाला होता. त्याचा माणूस त्याला सांगत आला, “भाई वो मछली भाई ने अपुनका माल दुबई भेज दिया. आपले लय माणसं मारले त्यान... लोचा झाला भाई.”
आत मात्र गुण्या भाईचा राग अनावर झाला, आणि त्याने त्याला गोळ्यांनी भाजून काढलं.
बटाटा भाईचा फोन वाजला आणि तो फोनवर म्हणाला, “अबे रख, पायतो मी.”


तो धावत बाहेर गेला आणि हातात पेनड्राईव्ह घेऊन आला. गुण्या भाईकडे बघत त्याने तो टीव्हीशी कनेक्ट केला. गुण्या भाईने समोरच्या टेबल वरचं रिमोट उचलून टीव्ही लावली. गुण्या भाईच्या पोरीचा ओरडण्याचा आवाज येत होता आणि पाच सहा मोठी मोठी माणसं तिच्याकडे वळत होती. व्हिडीओ मध्ये सर्व माणसं फक्त मागून दिसत होते. आणि गुण्या भाईची सोना जोरात ओरडत होती. नंतर व्हिडीओत सोनाचे नग्न फोटो होते, अंगावर नुसता शर्ट होता तिच्या आणि ती निपचित पडून होती. कुणीतरी तिच्यासमोर आलं आणि नाकासमोर हात लावत म्हणालं,
“गुण्या काही आठवते का... नाय नाय मेली नाय... आणि आमी फेकणार नाय तिला… पोरगी अजून जिवंत हाय रे. आणि मग तिच्या गालाला हात लावत म्हणाला, काय चीज आहे यार, साल्यानं सात समुद्रापार लपून ठेवली होती... पाहिजे असेल तर स्वतःला माझ्या हवाले कर. नाहीतर राय बिडात घुसून. उंदीर साला. सांर रान पोकळून लोणी खाते अन बिळात जावून लपते, असल दम तर ये.”

आणि व्हिडीओ संपला. गुण्या भाई रागाने लाल झाला, “कोण हाय बे हा साला... माझी सोना... काय केलं काय बे ह्यान सोनासोबत?”
म्हणत आता तो रडायला आला पण लगेच सावरत म्हणाला,
“अबे… बटाटा व्हिडीओ अजून लाव.”
नंतर त्याने मोठ्या हिमतीने अजून व्हिडीओ बघितला आणि ओरडला,
“अबे हा भारत हाय, नेपाळ नाय... अबे, आपुन तिकडे शोधत आहो पण पोरगी इथं हाय साल्या. अन् तिथं कोणतरी भिंगरी फिरवत होतं. दूर कुठतरी बसून, म्हणजे जो बोलत हाय तो तो नाय रे... कोणीतरी दुसरा हाय. साला आता इलेक्शनच्या वेळेवर कोण नवीन पैदा झाला अन् तोबी येवढ्या लवकर मराले. साला अख्खा एरिया फुक रे, पोरं इथचं हाय माही.”

गुण्या भाईने सर्वीकडे स्वतःचे माणसं पसरवले होते. दोन दिवस तसेच निघून गेले पण काही हाती लागलं नाही. गुण्या उर्फ गुणवंत रावांना तर मुलीचे अपहरण झाल्याने सहानुभूतीही मिळायला लागली होती, कुणी हसत होतं तर कुणी बरी जिरली म्हणून चिडवत होतं. तर कुणी नुसतं फोन करून काळजी घ्यायला बोलत होतं. मिडियाला नवीन अन्न मिळालं होतं आणि ते तुटून पडले होते, आता गुणवंत रावं काय करेल ह्यावर सर्वांच लक्ष होतं. भला मोठा डोंगर चढून ताडकन खाली पडला अशी त्याची परिस्थिती झाली होती.
->सादर कथा ही गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा आहे. कथानकातील पात्रे, प्रसंग, भाषा आणि घटना यांचा उद्देश त्या जगातील वास्तववादी वातावरण उभे करणे हा आहे.
कथेतील काही संवाद, व्यक्तिमत्त्वे किंवा घटना वाचकांना अस्वस्थ वाटू शकतात. कृपया त्याकडे त्या पात्रांच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात पाहावे. मी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, हिंसा किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करत नाही.
कथेचा आस्वाद घेताना तिच्या कथानकाला आणि पार्श्वभूमीला समोर ठेवून वाचन करावे, ही विनंती.
कथा समजायला कठीण वाटत असेल तर पहिल्या भागापासून वाचा!
पुढचा भाग लवकरच...
---
सादर कथा ही गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा आहे. कथानकातील पात्रे, प्रसंग, भाषा आणि घटना यांचा उद्देश त्या जगातील वास्तववादी वातावरण उभे करणे हा आहे.
कथेतील काही संवाद, व्यक्तिमत्त्वे किंवा घटना वाचकांना अस्वस्थ वाटू शकतात. कृपया त्याकडे त्या पात्रांच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात पाहावे. लेखक कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, हिंसा किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करत नाही.
कथेचा आस्वाद घेताना तिच्या कथानकाला आणि पार्श्वभूमीला समोर ठेवून वाचन करावे, ही विनंती.
--
कृपया कथा C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@topfans @followers #मराठी
फोटो साभार ai
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७

Post a Comment

0 Comments