एक होती भिंगरी.... भाग ८

 भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-

भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ५ पुढे वाचा एक होती भिंगरी.... भाग ५
भाग ६ पुढे वाचा. भिंगरी भाग ६

भाग ७ इथे वाचाभिंगरी...
भाग ८ पुढे वाचा

भाग ८ - एक होती भिंगरी...
ती प्रतीशोधात पेटणारी..
आणि तो कायद्याचा पुजारी...
अँकी तिच्या त्या रूपाकडे पाहतच राहिला. त्याचे हात बांधणारी ती मुलगी जणू संकट नव्हतीच, तर एखादं कोडं होती त्याच्यासाठी. तो आधीच तिच्या सौंदर्याने घायाळ झाला होता. तो निवांत ती म्हणेल तसा खुर्चीवर बसला. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली होती जणू दोघेही विचारात होते. अँकीने तोंडातली सिगार बाजूला फेकली आणि हसत म्हणाला, “एवढं सुंदर रूप समोर असताना मला इथेच बसून मरण आलं तरी चालेल. कोण आहेस तू? काय दिसतेस गं!”

“असं! मग तुझी इच्छा पूर्ण करते मी.” आणि क्षणात तिने बंदूक त्याच्यावर रोखली. अँकीने बंदुकीकडे पाहिलं, मग तिच्याकडे.
“हाय हाय... काय अदा! पण ही बंदूक तुझ्या ह्या गोऱ्या हातामध्ये? काही कळत नाही गं... ह्या हातात तर हिऱ्याने जडलेल्या बांगड्या हव्या... काय म्हणतेस? आवडलीस तू मला.. होशील माझी राणी?”
“ए झम्प्या तुझ्यासारखे छप्पन खिश्यात घेऊन फिरते मी. कोण रे तू चमचा क भड...”
“अरे अरे... असे शब्द आणि ह्या रूपाच्या राणीच्या मुखातून...”
तिने बंदूक त्याच्या कपाळाला टेकवली, “अबे ए फंटर...चूप बे. अन् तू माझा पाठलाग का करत होता? बघतेय मी तुला मागच्या सात दिवसापासून... सारखा माझ्या मागे असतोस.”
“हाय हाय राणी, मला बघूनही तू इथे मौजूद राहिली. माझी वाट बघत होती काय गं, चिकने!”
“भिते काय तुला रे! चल हो तयार मरणाला. टापू साला, टपोरी.”
“हाय हाय...अरे मी तर केव्हाच तयार आहे... पण एक उत्तर दे.”
“हो बोल, मारण्याऱ्याची अंतिम इच्छा पूर्ण केली जाईल.” आणि तिने बंदूक परत ताणली.
“सोना कुठे आहे? वाटलं होतं इथे असेल म्हणून...”
“आहे ना. अजून जिवंत आहे. आणि कही दिवसांपासून इथेच होती, पण आता इथे नाही... तू होतास ना माझ्यावर लक्ष ठेवून मग... गेली ती कुठल्या कुठं. घे आता तिचा शोध.”

अँकी तिच्याकडे एकतार बघत होता, त्याच्या अश्या रूबाबाला बघत ती परत म्हणाली, “अबे ए, खाली बघ, मारून सोडीन ना... तर... हे गावं माझं आहे, माझं! तुला कुणी इथे पाणीही विचारणार नाही विचारायला गेलास तर.”
अलगद तिची एक लट तिच्या गालावर पडली आणि ती सावरताना तिचा तोल गेला आणि ती अँकीच्या अंगावर जरा पडली. तिची आणि अँकीची नयन भेट झाली, एकमेकांना तो अलगद स्पर्श शहारून गेला, अँकी बांधून होता मग तिला हात लावू शकला नाही पण तो पुरता तिच्या त्या खोल घाऱ्या बोलक्या पण गप्प झालेल्या डोळ्यात बुडाला होता. ती रहस्य मय डोळ्यांची खोल दरी त्याला आकर्षित करत होती. तीही काही क्षण मोहात पडली, प्रेमाच्या शोधत असेललं मन जरा वेळेसाठी दस्तक देत होतं पण सर्व भावनांना आवर घालत क्षणात ती भानावर आली, उठली आणि परत बंदूक ताणून उभी राहिली,
“काय रे चमच्या, तो गुण्या आला नाही... त्याच्या मुलीला घ्यायला... तुझ्या सारख्या टपरीला पाठवलं. साला नामर्द... समाजाला पीडून परत त्याच समाजाचा कर्ता बनून फिरतो साला.“
“मी काही त्याचा माणूस नाही... मला कुणी पाठवू शकत नाही... माझा मी आलोय... तुला शोधत.”
“असं! मला शोधात, का? मी कोण लागते तुझी, तुझा माझा संबंध काय बे, छपरी!”
“आता झाला ना संबंध, तू आवडली मला.”
“अबे कुणाशी बोलत आहेस माहित आहे का?”
“एका रूपाच्या राणीशी, जिच्या नयनात खूप काही सामावलं आहे. किती बोलके आहेत हे नयन पण का कुणास ठाऊक चुप्पी धरली आहे त्यांनी.”
ती जरा क्षणासाठी गडबडली, मनात शिरली, आवाज तिला ओळखीचा वाटत होता, पण परत तेवढ्याच ताकतीने तिने परत बंदुक ताणली.
“अबे ए फालतू बोलू नकोस. माझ्याकडे वेळ नाही.”
“माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. मी तुझ्यासाठीच तर आलोय.”
“चल चल, तुझं रे काय नातं त्या सोनाशी...?”
“आणि तुझं काय गं नातं तिच्याशी.”
“तुझं काय ते सांग?”


“माझं काहीच तिच्याशी नातं नाही... पण...”
“पण काय रे टापू आधी नजर खाली कर. माझं तर बदल्याच नातं आहे. बस्स! त्याच्या पोरीशी माझं वैर नाही, बस्स त्याच्याशी आहे. आणि ती भोगेल... मला काही लेणंदेणं नाही. बापाच्या कर्माची फळं मुलीनेच भोगायची असतात ना?
“पण माझं आणि तुझं नातं जन्मोजन्मीच आहे असं वाटतं मला.”
“ए, भंकस नको मारू, वेळ नाही माझ्याजवळ. तुझ्या सारख्याला झेलायला. बोलतोस की.”
“किती वेळची म्हणतेस, दे ना ठोकून, कुणी थांबवलं तुला, मी तर बांधलेला आहे.”
तिला तो मुळीच घाबरत नव्हता हे तिच्या लक्षात आले होते. उलट प्रत्येक वाक्यात तिची फिरकी घेत आहे असे तिला वाटले. त्याच्या त्या बोलण्याला फसली होती ती, मनात नकळत हसूही उमटलं होतं पण तिने ते ओठांपर्यंत येऊ दिलं नाही. जोशात म्हणाली, “अबे ए, फंडे मारू नकोस. उतरवल्या ना तुला, तर इथेच गड्डा करून गाडून टाकीन.”
तिने आता बंदुक त्याच्या डोक्यावर परत ताणली, आणि... तो हसत म्हणाला, “ओळखलं मी तुला... भावना ना तू गं?”
भावना क्षणात चकित झाली, आणी तो गाणं म्हणायला लागला, “ऐक होती भिंगरी... एक होती भिंगरी... तिचं नावं झिंगरी... ए झिंगरे...“
क्षणात गरगरली, तिच्या हातातली बंदूक थरथरली. जणू कुणीतरी वर्षानुवर्षे बंद असलेला दरवाजा उघडून आत शिरलं होतं. ती काही क्षण तशीच उभी राहिली. डोळ्यासमोर ओसाड पडलेलं ते अंगण अचानक तिला हिरवं गार दिसू लागला आणि तिने स्वतःलाच तिथे भावासोबत बसून खिचडी खातांना बघितलं... अश्रू दाटून आले होते... पण तिने झटकन स्वतःला सावरलं. बंदूक अजून घट्ट पकडत ती ओरडली, “कोण रे साल्या तू? मी नाही ओळखत तुला आणि माझं हे नाव तर कुणालाच माहित नाही, साला आपली तर ओळखच ही नाही आता... भावना!”

ती आठवणीत स्मित हसली, “माझ्या भावाची भावना... ”
परत बोलली, “किती वर्ष झाले ह्या नावाने मला कुणी बोललं नाही. आणि हे गाणं? तुला कसं माहीत?”
तो अजूनच ते गाणं गुणगुणत राहिला.
“सांगतोस की देऊ टाकून साऱ्या तुझ्या ह्या स्टाईलवाल्या भेज्यात.”
अँकीने तिच्या थेट डोळ्यांत पाहिलं. पहिल्यांदाच त्याला त्या डोळ्यांत रागापेक्षा जास्त भीती दिसत होती. ती भूतकाळाची भीती होती की ते उघड होण्याची, की विसरलेल्या नात्यांची भीती. त्यालाही आता अति झाल्यासारखे वाटले पण भावना बोलती होत नव्हती अजूनही, तो मिश्कील हसला, “बापरे!!! घाबरलो मी, भावने!”
ती आणखी अस्वस्थ झाली होती, “ए त्रास होतोय आता, सटकवू नको माझं, सांगतो, की सोडू माझा नेम.”
तिने ट्रिगर दाबलं...आणि अँकी ओरडला, “अरुण!!”
अरुणचं नाव ऐकताच भावना कासावीस झाली, बंदूक हातातून खाली पडली तिची, दोन पावलं मागे सरकली, "अरुण दादा, कुठे आहे? कसा आहे... आहे का तो? किती वर्ष झाली मी शोधते आहे पण मला नाही भेटला... तू कोण आहेस. अरुण दादा!"
तिने पडलेली बंदूक परत भांबावल्या अवस्थेत उचलली, “अबे सांग तू कसा ओळखतो. तू अरुण दादा नाहीस हे नक्की... ”
तिने त्याचे हात बघितले, त्यावर भिंगरी कोरलं नव्हतं. तिच्या दादाने तिचं नाव भिंगरी म्हणून लहान असताना कोरलं होतं. कावरीबावरी झाली, अँकीने तिच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव वाचले. तो लगेच शांतपणे म्हणाला, “अरुण नाही राहिला आता... तो कधीच देवाघरी गेलाय. पाच वर्ष होतील...”
आत मात्र भावना खाली बसली... डोळे भरून आले होते आणि ओठ थरथरत होते... आणि तिच्यासमोर तो प्रसंग चित्रफिती सारखा सरकू लागला होता.
<<>>

जवळपास बारा वर्षाआधी
भावना खूप आनंदी होती, आज अरुण ठेला घेवून येणारं होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याने पै-पै साठवले होते ठेल्यासाठी. भावनाने सकाळपासून घर डोक्यावर घेतलं होतं. तिने त्या ठेल्याच स्वागत म्हणून आरती सजवली होती. नाही सांगूनही तिने दादाची आवडती खिचडी केली होती. आणि घरात अरुणची वाट बघत अभ्यास करत होती, पंधराचा पाढा जोरात म्हणत होती. तोच घरात दार फोडून काही माणसं शिरली, तिला ओढलं, तिने तिच्या लहान हाताने तिथेच असलेलं बेलन घेतलं पण काही फरक पडला नाही, काका कोण तुम्ही, कोण तुम्ही ती म्हणत राहिली पण त्या लोकांनी घरातल्या सामानाची फेका फेकी केली. तिच्या किंकाळ्यांचा कुणावरच परिणाम होत नव्हता. त्याच वेळी एका गुंडाची नजर खिचडीच्या पातेल्याकडे गेली. उपहासाने हसत पुढच्याच क्षणी त्याने पातेल्याला जोरात लाथ मारली. गरम खिचडी सगळीकडे सांडली. एकाने तिचे पुस्तक तिच्या हातून ओढून चुलीत टाकलं आणि तिला उचलून बाहेर आणलं. बाहेर येताच भानू काकाने तिला त्यांच्या हातून ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी भानू काकावर गोळ्या झाडल्या आणि ते कोसळले. बटाटा भाईने तिला गाडीत कोंबलं.
गुण्या भाईच्या गाडीतून जातांना तिला दुरून अरुण दादा ठेला घेऊन येतांना दिसला होता. आणि ती अरुण दादाच्या नावाने ओरडत गुण्या भाईच्या शेतातल्या वाड्यावर पोहचली होती. वाड्यावर येताच गुण्या भाईने तिच्या एक जोरात थोबकडीत लावली, ती बेशध्द झाली, नंतर तिला बटाटा भाईने गुण्याच्या खोलीत सोडलं.


गुण्या भाई तिला बघताच तिच्यावर जनावरासारखा तुटून पडला. त्यातच ती शुद्धीवर आली आणि ओरडून ओरडून परत बेशुद्ध झाली, कोवळ्या कायेवर जखमा पडल्या होत्या. होती ती वस्त्र लाल झाली होती. पण गुण्या भाई काही थांबत नव्हता. त्याने त्याची पूर्ण मनाची कुइच्छा शांत होईपर्यंत तिला सोडलं नाही. ती ओरडून परत बेसुध पडून रहिली.
लहानश्या जीवावर नामर्द तुटून पडला होता आणि मग तिला नग्न सोडून बाहेर आला. मोकळ्या हवेत त्याने स्वतःला मोकळं केलं, मानेला झटका दिला तोच त्याच्या मानेवर अरुणने मागून येऊन दंड्याने वार केला, सावरतच गुण्या भाईने त्याच दंड्याने अरुणला मारणं सुरु केलं. मार खाता खाता काही वेळाने अरुणच लक्ष खोलीत पडून असलेल्या नग्न त्याच्या बहिणीवर पडलं, तो धावत तिथे आला आणि अंगातलं शर्ट काढू त्याने तिला झाकलं, आवाज देत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता तोच गुण्या भाईने त्याला ओढत बाहेर नेलं. त्याला तो लाथा बुक्या मारत होता.
दुरून पोलिसांच्या सायरनचा आवाज येत होता. बटाटा भाई धावत आला, “भाई जाने दो ना. मई संभालता इसको. आप निकलो भाई.”
बटाटा भाईने प्रकरण सांभाळण्यासाठी गुण्या भाईला तिथून निघण्याची विनंती केली, गुण्या भाई जोरात ओरडला, “ए चिंध्या, अपुन को जो पसंत ओ किसीकी मा बहेन नाही होती सिर्फ अपुनकी....” आणि त्याने जोरात अरुणला लाथ मारली.

अरुण एका कोपऱ्यात असाह्य पडला होता, नजर बहिणीवर होती आणि मन रागाने लाल झालं होतं. स्वतःला सावरत तो उठ्याचा प्रयत्न करत होता. गुण्या भाई जोशात खोलीत आला, त्याने भावनाच्या नाकाजवळ हात लावला आणि अरुणकडे बघत म्हणाला, “हाय अजून जीती हाय... अजून कामाची हाय माह्या... ये तू तिला घ्यायले, जिता राहिला तर...”


म्हणत त्याने तिला तसंच उचललं, खांद्यावर टाकलं आणि अरुण समोर गाडीत टाकलं. अरुण जखमी होता तरीही गाडीवर धावला. त्याला तसं बघून आणि भावाच्या नावाचा टाहो फोडत परत भावना शुद्धीवर आली, आणि अरुणच्या नावाने ओरडायला लागली, परत गुण्या भाईने तिच्या गालावर जोरत लावली आणि भावना, हुंदके देत देत, सीटवरच कोलमडून पडली.. गुण्या भाईने गाडी जोरात काढली, अरुण दूर पर्यंत धावत राहिला आणि म्हणत राहिला,
“भावने, भिंगरे, ये झिंगरे... मी येईल वं, तुले नक्की घ्यायले येईल. काळजी घे वं भावने... भिंगरी आहेस तू माही वाली, येयेल मी.”
तोच गुण्या भाईने बंदूक काढली आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या, अरुण जखमी झाला होता. एक गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली होती तर दुसरी पायाला लागली होती. भावनाला तो अंधुक अंधुक खाली कोलमडून पडतांना दिसत होता. गाडी दूर निघून गेली आणि दोन भावंडांना दूर करून गेली होती...
पुढील भाग लवकरच...

सादर कथा ही गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा आहे. कथानकातील पात्रे, प्रसंग, भाषा आणि घटना यांचा उद्देश त्या जगातील वास्तववादी वातावरण उभे करणे हा आहे.
कथेतील काही संवाद, व्यक्तिमत्त्वे किंवा घटना वाचकांना अस्वस्थ वाटू शकतात. कृपया त्याकडे त्या पात्रांच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात पाहावे. लेखक कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, हिंसा किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करत नाही.
कथेचा आस्वाद घेताना तिच्या कथानकाला आणि पार्श्वभूमीला समोर ठेवून वाचन करावे, ही विनंती.
--
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers @topfans
फोटो साभार ai
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७
See less

Post a Comment

0 Comments