एक होती भिंगरी .. अंतिम भाग

 आधीचे भाग



भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-

भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ५ पुढे वाचा एक होती भिंगरी.... भाग ५
भाग ६ पुढे वाचा. भिंगरी भाग ६
भाग ७ इथे वाचाभिंगरी...
भाग ८ इथे वाचा एक होती भिंगरी भाग ८
भाग 9 इथे वाचा  एक होती भिंगरी भाग


द कमबॅक... एक होती भिंगरी...अंतिम भाग
अंकित भावनाला मागच्या कही वर्षापासून शोधत होता... त्याचं अंडरवर्डमध्ये ओळख बदलून शिरणं, लोकांचा विश्वास जिंकण आणि गुण्याभाईपर्यंत पोहचण हे सारं काही ठरवून केलेलं होतं... आणि आज भावना त्याच्यासमोर उभी होती. अंकित काही क्षण शांत राहिला. इतक्या वर्षांनी सत्य सांगताना त्याचाही आवाज जड झाला होता. तिच्या डोळ्यात डोळे टाकत अंकित तिला काय घडलं सांगू लागला,

“त्या दिवशी तुला गुण्या भाई घेऊन गेला आणि काही तासांतच पोलिस वाड्यावर पोहोचले होते. पण तोपर्यंत बटाटा भाईने सगळा डाव फिरवला होता. पुरावे बदलले गेले. साक्षीदार उभे केले. आणि शहरातून आणलेल्या मुलींचा धंदा अरुण चालवतो, हे पोलिसांच्या गळ्यात उतरवलं गेलं. आणि अरुणला अटक झाली सगळे पुरावे त्याच्याविरुद्ध होते. कोर्टातही तेच सिद्ध झालं आणि त्याला शिक्षा झाली.”
भावनाच्या छातीत धस्स झालं, ती निशब्द बघत होती. मन जणू ‘दादा असं कधीच करू शकत नाही... असं मनातच पुटपुटलं तिने.
अंकित पुढे म्हणाला, “मी पोलीस खात्यात नव्याने रुजू झालो तेव्हा, गुण्याभाईची केस आणि मुली सप्लाय करण्याची केस माझ्याकडे आली होती. त्याचं केसच्या संदर्भात माझी भेट अरुणशी झाली होती. मी खूप विचारपूस केली पण तो काहीच बोलायचा नाही. मी त्याची केस स्टडी करायला घेतली, कागदपत्रं पाहिली तर सगळे पुरावे त्याच्याविरूद्ध होते पण मन तरीही मानायला तयार नव्हतं. आणि हळूहळू तो इनोसंट आहे हे माझ्या लक्षात आलं.
अंकितची नजर खिडकीबाहेर गेली. जणू त्या दिवसांमध्ये तो पुन्हा हरवला होता... दीर्घ श्वास घेत म्हणाला,
“अल्पवयीन मुलींची तस्करी ही हायप्रोफाईल केस होती... आणि अरुण त्यात अडकला होता... मग पोलिस कोठडीत त्याचा खूप छळ झाला. गुण्या भाईचे लोक सर्वत्र पसरले होते... आणि गुण्याभाईने नवीन राजकारणाचा उद्यौग सुरु केला असल्याने त्याला कुठलीही केस परत उघडू द्यायची नव्हती. पण मला अरुणशी बोलायचे होते, मी तासतास त्याच्या कोठडीबाहेर बसून त्याला नुसता बघत राहायचो... त्याचं आणि भिंगरीशी काय नातं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचो.... त्याचं ते भिंगरी गाणं मी त्याच्याकडून शिकलो आणि मग हळूहळू अरुण माझ्याशी थोडंफार बोलायला लागला होता. त्याला सर्व खोदून विचारलं तर त्याने सर्व मला सांगितलं. आणि मला माझ्या तपासाला नवीन दिशा मिळाली, तशात मी त्याची मदत करणार हे पोलिसात कुणालातरी माहित झालं. अरुणला त्याची काळजी नव्हती तो मला तुझ्यासाठी विनंती करू लागला होता, मग मी अरुणच्या आग्रहाने तुझ्या शोधत निघालो. तब्बल आठ महिने अक्खी मुंबई पिंजून काढल्यावर मला झारा जान भेटली होती... आणि झारा जानचं अरुणची भिंगरी आणि भावना आहे ह्या शोधात मी तुझ्याकडे आकर्षित झालो होतो... मध्ये अरुणला भेटलो होतो त्यालाही सांगितलं होतं की मी भावनाच्या जवळ आहे... आणि लवकरच तिला सोडवून त्याच्यासोमर उभं करणार म्हणून... पण तुझ्या मार्गावरअसणं म्हणजे पोलीस खात्यात राहणं कमी झालं, अरुणवर लक्ष कमी झालं आणि अरुणला मारण्याचा प्रयत्न सुरु झाला. तुरुंगात अन्य कैद्यांकडून त्याला मारहाण झाली. त्याला वेडा ठरवण्याचा प्रयत्न झाला... आणि मग एक दिवस तो त्याच्या कोठडीत लटकलेला सापडला.”
भावनाच्या पायाखालची जमीन सरकली, ती भिंतीचा आधार घेत खाली बसली. अजूनही ती नि:शब्द अरुणकडे बघत होती. अंकितने मुठ आवळली. हळूच म्हणाला, “मला माहित होतं त्याला मारल्या गेलं होतं पण पुरावे काही वेगळेच होते. तो एकटाच राहत होता आणि मग त्याने स्वतःच्या नादात आत्महत्या केली अशीच रिपोर्ट तयार झाली. त्या दिवशीच मी तुला सर्व सांगण्यासाठी आलो होतो. माझं काम सुरु झालं होतं, पण तूच अचानक निघून गेलीस... तुझ्या आपाला अटक केली होती मी पण तिने एक शब्द बाहेर काढला नाही... उलट राजकीय दबावामुळे मला तिला सोडावं लागलं.... तुझी आपा जान पण ना... तुझ्याबद्दल पोलिसांनी विचारू नये म्हणून स्वतःला काय खाऊन मुकं केलं तिने काय माहित... मलाच तिलाबाद्द्ल आदर वाटला आणि मी तिला त्रास देणं सोडून दिलं ... आणि मी परत तुला शोधण्याचा निर्णय घेतला, मागच्या कही वर्षापासून मी ह्या केसच्या संदर्भात काम करत आहे. आणि माझ्या विनंतीवरून मला क्राइम ब्रांच दिल्या गेली. जेव्हा गुण्या भाईच्या मुलीचं अपहरण झालं तेव्हा माझ्या सर्व लक्षात आलं होतं पण मी गुमान शांत होता आणि आजही आहे... पुढेही राहिल गं.. पण तू थांब आता.”
तो भावनाच्या नजीक आला, खाली बसला, नकळत भावना त्याला बिलगली, तिच्या अश्रुनी त्याचा खांदा भिजला होता. काही वेळ नुसती शांतता होती दोघात... आणि अचानक भावनाने परत बंदूक त्याच्यावर ताणली आणि त्याला ढकललं. लगेच कुणालातरी फोन केला, “तिसरा पेनड्राइव्ह भेज तो गुण्या भाईको, साल्याला अक्कल नाही... निदान गावातला वाडा दिसल्यावर तरी इथे येईल... "
तिने फोन ठेवला आणि बंदूकीच्या नोकवर तिने अंकितला उभ केलं. भावना अंकिताला घेऊन गावच्या वाड्यावर पोहचली होती. अंकिताला तिने बांधून ठेवलं होतं.
इकडे भावनाच्या सांगण्यावरून गुण्या भाईकडे तिसरा पेनड्राइव्ह पाठवला गेला होता, गुण्या आणि त्याची सर्व माणसं आता निघणार होती तोच बटाटा भाईने अंगणात पडलेला पेनड्राईव उचलला, गुण्या आणि त्याची नजरा नजर झाली आणि दोघेही घरात धावत शिरले, टीव्ही लावली, वाड्याच्या अंगणात सोनाला पांढऱ्या कपड्यात गड्ड्यात ठेवल्या जात होतं आणि सर्व माती टाकत होते. गड्डा बुजला होता. आणि समोरून आवाज आला, “भाई काम खल्लास झालं. ये अन् वाचव पोरीला हिम्मत असेल तर... "
गुण्या आणि बटाटा भाई धावत गाडीकडे निघाले, सुसाट गाड्या गावाच्या दिशेने निघाल्या. भावनाने वाडा आधीच काबीज केलेला होता, वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात तिची माणसं दबा धरून बसली होती. बंदुका रोखलेल्या होत्या. बाहेरचे सर्व रस्ते बंद केले गेले होते. समोर ती त्या जागेवर खुर्चीत मागे रेलून बसली होती. अंकीत तिला विनवणी करत होता, कायद्याने सर्व काही बदलू म्हणून बोलत होता.

“भावना, प्लीज... अजून वेळ गेली नाही. आपण हे कायद्याच्या मार्गाने करू शकतो. मी तुझ्या सोबत आहे. गुण्या भाई आणि त्याच्या लोकांविरुद्ध पुरावे आहेत आपल्याकडे. आपण त्यांना वाचू देणार नाही.”
भावना कटू हसली, हातातल्या बंदुकीच्या तोंडावर तिने फुक माराली, आणि हळहळू त्याच्याकडे गेली, “कायद्याच्या मार्गाने? किती गोड वाटतं ना हे ऐकायला इन्स्पेक्टर?”
ती जवळ येताच अंकित तिला परत म्हणाला,”काय सुरु आहे तुझं, सोड मला, कायदा नको हातात घेऊ, अगं, माझ्या वडिलांना ह्याच कायद्याने न्याय मिळाला, मी मिळवून दिला, त्यांची हत्या करणाऱ्या गुंडाला सजा झाली. प्लीज कायदा हातात घेऊ नकोस.”
“काय? कधी मिळाला तुझ्या वडिलांना न्याय? सजा झाली ना त्या गुंडाला? मग काय झालं? तुझं बालपण परत आलं? तुझे आई-बाप परत आले? तुझे वडील मेले तेव्हा तू किती वर्षांचा होतास? आठ? नऊ? तुझी आईपण लेगेच गेली नाही! तुला कुठल्यातरी काकीनं का मामीनं घरकामाला ठेवून घेतलं होतं ना? सकाळी पेपर टाकत फिरायचास तू आणि शाळा झाल्यावर दुकानात कामाला होता. तुझ्या बापाच्या मृत्यूनंतर जी वर्षं गेली... ती परत दिली का कायद्याने तुला? साला सांगतो मला तुझी खरी हिस्ट्री केव्हाच काढली मी जेव्हा तू ह्या गावात सोनाचा फोटो घेऊन फिरत होतास.... तू ना अंडरवर्ल्डला फसवू शकला, त्याच्या बॉसला नाही...”
अंकितच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती तिला, पण भावना थांबली नाही, त्याच्याजवळून ती परत तिच्या जागेवर बोलतच निघाली, “ये इन्स्पेक्टर इथे माझा कायदा चालेल, तुझा कायदा तू गुंडाळून ठेव काही वेळेसाठी.... साला कायद्याचा पुजारी म्हणे...देते तुलाही चान्स थांब..”

अंकित बोलता राहिला, तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला पण भावना कुठे ऐकणार होती... वर्षानुवर्षे छातीत साचलेली राख आज पुन्हा धगधगत होती. बदल्याचा ज्वालामुखी तिच्या आत उठला होता. तो तिला जाळत होता, आणि जितकी ती जळत होती तितकीच अधिक शांत दिसत होती... कारण आज ती गुण्याभाईच्या पुढे उभी राहणार होती..
आज कही वर्षाने परत गुण्या भाईच्या गाड्या वाड्याकडे निघाल्या होत्या, गाड्या बदलल्या होत्या पण गावं तसंच होतं, मग धूळ तशीच उडत होती आणि गुण्या भाईला दुरूनच धुळात भावना दिसली.
तो गाडीतून उतरला आणि सोनाला गाडलेल्या जागेवर भावनाला बसलेलं बघून तिच्याकडे सरसावला, पण पुढच्याच क्षणी जमिनीखालचा सापळा सक्रिय झाला. धाडकन आवाज झाला आणि गुण्या भाई उलटा झाडाला लटकला. त्याच्या हातातून बंदूक खाली पडली. त्याचे अंगरक्षक चारही बाजूंनी बाहेर आलेल्या भावनाच्या माणसांनी वेढले गेले. तो तडफडत ओरडत होता,
“सोना कुठे आहे, तू कोण आहेस?”
तोच त्याचा फोन वाजला, भावनाच्या माणसानी तो फोन त्याच्या खिश्यातुन काढून त्याच्या कानाला लावला, आवाज समोरून येत होता की फोनमधून गुण्या भाईला समजलं नाही, मॅडमजी बोलत होत्या,
“अबे किती वर्षा आधी तू ह्याच वाड्यावर काय केलं होतं, आठवं... “
गुण्याभाईचा चेहरा फटकन पांढरा पडला. त्याला काही सुचत नव्हतं, माहित तर होतं त्याला की सोनाला साहेवजीने उठवलं आहे ते पण मॅडमजी अशी समोर उभी राहील हे काही केल्या समजत नव्हतं... घाबरला होता, “मॅडमजी माफ करा, काय चुकलं, आपण बसून बोलू, माझी सोना... आधी काढा तिला...”
भावनाला आज हृदय नव्हतं, त्याच्या मॅडमजी पुढे म्हणाल्या, ”जा जरा भूतकाळात, तेच तुझ्या सोनासोबत झालंय एवढंच... बस मी जरा एक स्टेप पुढे गेले... ह्या ह्या ठिकाणी दाबलं मी... श्वास चालत होते पण तू उशीरा आलास रे... आतापर्यत तर मेली असेल ती... बिचारी. खूप त्रासली होती. बापाचं भोगलं तिने.”
गुण्या भाईच्या डोळ्यांत पाणी आलं होतं, तो किंचाळला, "नाही... माझ्या सोनाला काही होऊ शकत नाही."
भावना मिश्कील हसली,” असं... तुझी सोना तर गेली भुर्र... उडून... तू कसा काही क्षणात सगळं संपवून टाकतो लोकांच.... मी आज तुझं संपवलं... तू ना हिशोब ठेवत नाहीस....”

आता तिने जवळ येऊन केस ओढले, “मी माझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला आहे.”आणि मग बटाटा भाईला म्हणाली, “ए बटाट्या काय मुबई पाहिजे ना तुला? घाल ह्याच्या त्या भागावर गोळ्या जो लहान मुलींमधेही घालतांना लहान होत नाही...”
असं म्हणताच गुण्या बटाटा भाईकडे बघत राहिला. आणि मग परत भावना ओरडली, “अबे साल्या चिंद्या करिन मी तुझ्या, तू नाही ह्याला मारलं तर...जाऊदे तुझ्यात कुठं दम राहिला आता...”
आणि तिने तिच्या माणसांनां गड्डा करण्याचा इशारा केला. अंकित तिला थांबवत होता पण तिने त्याच्याही पायाजवळ गोळ्या झाडल्या आणि त्याला गप्प केलं, म्हणाली, “माझ्या मागे पुढे कुणी नाही.... पण ह्या गुण्याला संपवल्या शिवाय मी तुला सोडणार नाही.”
भावनाने तिच्या जवळ असलेली भिंगरी काढली आणि ती फिरवत होती, दोरा बांधत होती आणि फेकत होती... भावनाच्या माणसांनी खोदलेला गड्डा पूर्ण झाला होता. आणि भावना थांबली, गुण्या भाईजवळ आली, “ओळखलं का मला? साल्या ह्या इथेच, ह्या समोरच्या खोलीत तू माझ्यावर बसला होता... त्या दिवशी मी किंचाळत होते. दया मागत होते. पण तुला काहीच ऐकू येत नव्हतं... पण...”
गुण्या भाई तडफडत परत विनंती करत म्हणाला, “मॅडमजी, सोनाचा ह्यात काही दोष नाही...”
“दोष? दोष??”
ती त्याच्याकडे रोखून बघत होती, "माझ्या बापूला विहिरीत फेकलं, माझा भाऊ मारलास. माझं जगणं मारलंस. माझ्या आईचा जीव घेतलास. किती आयुष्यं उद्ध्वस्त केलीस, मोजली आहेत कधी? का त्यांचा काय दोष होता ह्याची मोजणी केली आहे कधी...”
आता कुठे गुण्याभाईच्या मॅडमजी कोण आहे हे यायला लागलं होतं, तो बटाटा भाईकडे बघत होता. आणि बटाटा भाई मॅडमजीच्या मागे जाऊन उभा राहिला. तशी भावना किंचाळत म्हणाली,
“काही आठवलं असेल तर... मी तेच तुझ्या मुलीसोबत करायला लावलं…”
ती हसत तिच्या माणसांना म्हणाली, “काय रे पार्टी कशी होती... मजा आली ना?”
एकाने उत्तर दिलं, “मॅडमजी भारी होती, मानतच नव्हती, दिल्या दोन अन्... केलं काम... ह्या सुजीतने तर ती अर्धमेली झाली होती तरी परत एकदा चान्स घेतला.”
गुण्या भाई चौथाळुन उठला होता. पण माफी मागत होता, त्याने तिला ओळखलं होतं. भावनाने चवताळून त्याच्या खालच्या भागावर बंदुकीतल्या पाच गोळ्या झाडल्या... आणि एक गोळी तिने तो लटकलेल्या दोरीला मारली, तो खाली पडताच तिने त्याच्यावर पावडयाने माती टाकून त्याला गाडलं. घामाने थर्र झाली होती, अंगाची लाहीलाही होत होती. सर्व अंग अश्रू ढाळत होतं, सारा आसमंत तिच्याकडे बघून शांत झाला होता. खूप रडली, ओरडून ओरडून शांत झाली आणि मग बटाटा भाई जवळ आली, तिला जवळ बघताच तो घाबरला, म्हणाला, “मॅडमजी मला माफ करा. मुंबई नको मला... सारं आयुष्य आपला गुलाम म्हणून राहिल. जाऊ द्या मला.”
“तू कसा सुटू शकतोस चमच्या, तूच होतास ना ज्याने माझ्या दादाला फसवलं आणि मग त्याला मारलं पण...”

तिने बंदूक ताणली, “साल्या तुचं होतास ज्याने माझ्या आईला गुण्या भाईच्या समोर उभ केलं आणि मलाही ह्या तुझ्या घाणेरड्या हाताने उचललं होतं ना?”
तिने त्याच्या हातावर गोळ्या झाळल्या. आणि ती बंदूक फेकून त्याला मारली, तो खाली पडला, आणि तिने तिच्या माणसाच्या हातून पिस्तूल ओढून त्यालाही खल्लास केलं... शांत झाली होती.
तिच्या माणसाने तिच्याजवळ पाण्याची बॉटल आणुन दिली, तिने पाणी तोंडावर फेकलं, उठली, अंकित जवळ आली आणि तिने त्याला सोडलं, म्हणाली, “माय, बापू जेव्हां गेले तेव्हा मला काहीच समजत नव्हतं. पण माझा दादा माझं सर्वस्व होता, त्याच्या आत्म्याला आता कुठे शांती पडली असेल. मला त्याला मुक्त करायचं आहे. तू त्याच्या सहवासात होतास म्हणून...”
“तुला खरच वाटते त्याला शांती मिळाली असेल. मी त्याला जेवढा ओळखत होतो त्यावरून सांगतो, शांतीप्रिय होता तो, मला म्हणायचा कायदा त्याला नक्कीच न्याय देईल, शेवटीपर्यंत त्याने माझ्यावर विश्वास ठेवला...”
“मग वाचवू शकला नाहीस ना तू त्याला...”

अंकित गप्प झाला, भावनाने त्याचा हात धरला, आणि त्याला घेऊन ती अग्नि संस्कारासाठी आली, चंदनाच्या लाकडांवर तिने तिच्या दादाचा शर्ट ठेवला, अग्नि दिली. परत रडली, अंकित तिला सांभाळत उभा होता. काही वेळाने शांत झाली, अंकित पुढे हात करत म्हणाली, “आता तुला जे करायचं ते कर... मोकळा आहेस.” आणि तिने एक फोन केला.
अंकित म्हणाला, “मला काहीच करायचं नाही... तू सर्वच केलसं. तू मोकळी आहेस.” त्याने पोलिसांना फोन केला आणि तिकडे बोलावून घेतलं.
तिला म्हणाला, “ इट्स युअर कमबॅक फॉर युअर रिव्हेंज... अँड माय वर्क... माझं कामं फक्त ह्या गुंडांना पकडणं नव्हतं. मी तर अरुणसाठी ही खटपट केली होती, त्याला शब्द दिला होता, तुला शोधण्याचा... शोधलंय... तुझी इच्छा, तुला माझ्यासोबत यायचं आहे की... परत ह्याच विश्वात शिरायच आहे.”
तिने काहीच उत्तर दिलं नाही... तीने तिच्या सर्व माणसांना गाड्यात बसल्याला सांगितलं, तीही गाडीत बसायला लागली, वळून म्हणाली, “तुला एक चान्स दिला होता, हातात बेड्या टाकू शकला असतास... ह्या कायद्याचा अधिकारी होतास तू. मला थांबवू शकला असतास... पण तू सोडलं मला आणि मी सुटले आता...” अंकित स्मित हसत तिला परत म्हणाला,
“अरुणने मला तुझी काळजी घ्यायलाही सांगितलं होतं.”
ती गाडीत पाय ठेवून बसलीही आणि म्हणाली, “आता त्याची गरज राहिली नाही, मी समर्थ आहे. माझ्या दादाची त्या काळात काळजी घेतल्याबद्दल मी आभारी आहे. मला असंच त्यासाठी ऋणी राहू दे.”
“अगं पण.... मी...”
“इन्स्पेक्टर अंकित जाधव, आपल्यासाठी मी नाही...”
“पण तू माझ्यासाठीच आहेस, लक्षात ठेव...”
“तुला भेटलेली कधीच मेली. माझे कही नावं होती त्यातली मी कुठली तुमच्यासाठी ते तरी शोध आधी.”
“त्याची गरज नाही मला... मी नावावर प्रेम नाही केलं, तुझी गरज आहे मला...”
“पण मला इन्स्पेक्टर अंकित जाधव गरज नाही.”
तिने गाडीचा काच वर घेतली, आणि ती तिच्या माणसांसोबत तिथून निघून गेली.
गाड्या धूळ उधळत निघून गेल्या, अंकित दूरवर बघत राहिला. पण भावना परतली नाही. काही वेळात तिथे पोलिसांचा ताफा पोहचला. दुसऱ्या दिवशी न्यूज होती, गुणवंत रावांच्या पोरीचं अपहरण त्याच्याच खास माणसाने केलं होतं आणि त्यांच्या एकमेकांच्या वादात दोघेही मारल्या गेले... दोन गुंडांचा अंत आणि मुंबई शांत! तेंडोलीची केस कायमची बंद झाली होती.
सोनाला पोलिसांनी आपाकडून आणलं होतं आणि ती सुखरूप अमेरिकेला निघून गेली होती... तिच्या आयुष्यावर आलेलं वादळ मागे पडलं होतं, पण त्या वादळाने अनेक मुखवटे फाडून टाकले होते.
साहेबजी... ज्याचं नाव अंडरवर्ल्डमध्ये भीतीने घेतलं जायचं. ज्याच्या अस्तित्वावर लोकांचा विश्वास होता. तो प्रत्यक्षात आता अस्तित्वातच नव्हता. पण तरीही साहेबजीच वर्चस्व वाढत होतं राहिलं.. आणि त्या सावलीमागे उभी होती भावना. पण आता तीही हळूहळू तिची जुनी कात टाकत होती. भावना तिच्या खऱ्या नावाने पुढे येत होती. तेंडोली आणि आसपासची अनेक गावं तिने दत्तक घेतली होती. अरुणच्या नावाने शाळा उभी राहिली होती. जिथे कधीकाळी भुकेने व्याकूळ होऊन दोन भावंडं शाळेच्या खिचडीवर जगत होती, तिथे आता शेकडो मुलांच्या ताटात भरभरून अन्न वाढलं जात होतं.
स्वतःच राहतं घर तिने आता महिलांसाठी स्वावलंबन केंद्र म्हणून उभं केलं होतं. आणि आता तो वाडा... जिथे असंख्य आयुष्यं उद्ध्वस्त झाली होती. जिथे अनेक किंकाळ्या भिंतींमध्ये अडकून राहिल्या होत्या. तो जमीनदोस्त करण्यात आला. त्या जागी भव्य निवासी वसतिगृह बांधल्या गेलं होतं... हळूहळू भावना समाजसेवक म्हणून नावा रुपाला आली होती... आणि अलगद तिने दुबईच्या डॉनची कात टाकली.

दहा वर्षाने परत मुबई तिच्या हातात होती पण अंडरवर्ड डॉन म्हणून नाही तर समाज सेवक म्हणून... तिचा हा कमबॅक आता तिच्यासाठी नव्हता... आणि आज तिची सभा होती. कार्यक्रम संपल्यानंतर ती खाली उतरत होती. आणि परत तिची नजर भेट अंकितशी झाली, तो नेहमीसारखाच उभा होता, खाकी वर्दीत... ती थबकली, दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले, ती स्वतःहून जवळ आली, अभिवादन करत म्हणाली,
“तू साथ दिली नसती तर मी आज इथे नसते. खूप धन्यवाद...”
अंकित हसला आणि म्हणाला, “मी आजही तुला साथ द्यायला तयार आहे जन्मभराची... बस तू हो म्हण.”
भावना परत काहीही न बोलता निघून गेली, अंकितने त्याची कॅप घातली आणि तिला एक कडक सॅल्यूट ठोकला… भावना पुढे जाऊन जरा थांबली, मागे वळून पाहिलं तिने, क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं... मग तिनेही मान झुकवली. आणि पुढे निघून गेली. अंकित तिथेच उभा राहिला...
काही प्रेमकथा एकत्र येऊन पूर्ण होत नाहीत. त्या एकमेकांचा आदर करत पूर्ण होतात. आणि काही नाती... नावाशिवायही आयुष्यभर टिकतात... त्यांचा कमबॅक नसतो...
समाप्त...
कथेच्या सर्व भागांची लिंक comment मध्ये आहे.
कथा कशी वाटली अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवीन मराठी कथा सिरीजसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा...
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे कायद्याने राखीव!
सादर कथा ही गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा आहे. कथानकातील पात्रे, प्रसंग, भाषा आणि घटना यांचा उद्देश त्या जगातील वास्तववादी वातावरण उभे करणे हा आहे.
कथेतील काही संवाद, व्यक्तिमत्त्वे किंवा घटना वाचकांना अस्वस्थ वाटू शकतात. कृपया त्याकडे त्या पात्रांच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात पाहावे. लेखक कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, हिंसा किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करत नाही.
कथेचा आस्वाद घेताना तिच्या कथानकाला आणि पार्श्वभूमीला समोर ठेवून वाचन करावे, ही विनंती.
--
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai

Post a Comment

0 Comments